महालक्ष्मी येथे लहान प्राणी, पक्ष्यांच्या मृतदेहांवर अंत्यविधीची सुविधा; लहान पाळीव प्राण्यांचे रुग्णालय लवकरच होणार सुरू

मुंबई: मुंबई महानगरपालिका आणि टाटा ट्रस्ट संचालित लहान प्राण्यांच्या रुग्णालयात लहान प्राणी व पक्ष्यांच्या मृतदेहांच्या अंत्यसंस्कारासाठी ताशी ५० किलो क्षमतेची इन्सिनरेटर यंत्रणा उभारण्यात आली असून ती आता लवकरच कार्यान्वित होणार आहे. या सुविधेमुळे प्राण्यांच्या मृतदेहांची सुरक्षित व पर्यावरणपूरक विल्हेवाट लावणे शक्य होणार आहे. देशातील हे अग्रगण्य असेल रुग्णालय आहे.


मुंबई महानगरपालिका आणि टाटा ट्रस्ट यांच्याद्वारा संचालित आणि महालक्ष्मी परिसरात स्थित, लहान पाळीव प्राण्यांच्या अत्याधुनिक रुग्णालयास अतिरिक्त आयुक्त डॉ. अश्विनी जोशी यांनी शुक्रवारी १३ मार्च २०२६ रोजी भेट देवून पाहणी केली. याप्रसंगी सहायक आयुक्त (जी दक्षिण) l स्वप्नजा क्षीरसागर, पशुवैद्यकीय आरोग्य विभागाचे प्रमुख डॉ. कलिमपाशा पठाण, रुग्णालयाचे संचालक मेहेरनोश कपाडिया, रुग्णालय प्रशासन आणि सेवा प्रमुख मेजर जनरल प्रमोद बत्रा आदींची यावेळी उपस्थिती होती.


मुंबई महानगरपालिकेचा पशुवैद्यकीय आरोग्य विभागाकडून प्राणी कल्याण सेवा अधिक सक्षम करण्यासाठी विविध उपक्रम राबविले जातात. याच उद्देशाने महानगरपालिकेच्या सहकार्याने टाटा ट्रस्टच्या वतीने महालक्ष्मी येथे लहान प्राण्यांचे रुग्णालय कार्यरत आहे.


अतिरिक्त आयुक्त (शहर) डॉ. अश्विनी जोशी यावेळी म्हणाल्या की, लहान प्राण्यांसाठी एकाच छताखाली बहुउद्देशीय सेवा-सुविधा, अत्याधुनिक निदान आणि उपचार सुविधांनी सुसज्ज असलेले हे देशातील अग्रगण्य रुग्णालय आहे. अशा अत्याधुनिक पशुवैद्यकीय सुविधांमुळे मुंबईतील पशुवैद्यकीय आरोग्य व्यवस्थेला मोठी चालना मिळाली आहे. पाळीव प्राणी व लहान प्राण्यांसाठी दर्जेदार उपचार सुविधा उपलब्ध झाल्या आहेत. प्राण्यांच्या मृतदेह व जैववैद्यकीय कचऱ्याच्या शास्त्रोक्त विल्हेवाटीसाठीही रुग्णालयाकडून व्यवस्था करण्यात आली आहे. लहान प्राणी व पक्ष्यांच्या मृतदेहांच्या अंत्यसंस्कारासाठी ताशी ५० किलो क्षमतेची इन्सिनरेटर यंत्रणा उभारण्यात आली असून ती आता कार्यान्वित होण्यास सज्ज आहे. या सुविधेमुळे प्राण्यांच्या मृतदेहांची सुरक्षित व पर्यावरणपूरक विल्हेवाट लावणे शक्य होणार आहे. सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीनेही त्याचा महत्त्वपूर्ण फायदा होणार आहे, असेही जोशी यांनी सांगितले.



प्राण्यांच्या रुग्णालयात काय असेल


चार मजली इमारतीतील या रुग्णालयात चार सुसज्ज शस्त्रक्रियागृह,


तज्ज्ञ पशुवैद्यकीय शल्यचिकित्सकांसह स्वतंत्र शस्त्रक्रिया विभाग,


सुमारे २०० प्राण्यांची उपचार क्षमता,


जनरल वॉर्ड, आयसीयू आणि हाय डेपेंडन्सी युनिट, एमआरआय, सीटी स्कॅन, एक्स-रे, अल्ट्रासोनोग्राफी, पॅथॉलॉजी लॅब आणि २डी इको यासारख्या अत्याधुनिक निदान सुविधा...


तसेच, प्राण्यांसाठी रक्तपेढी, दंत उपचार, त्वचारोग, नेत्रचिकित्सा, एंडोस्कोपी, फिजिओथेरपी आणि हायड्रोथेरपी यासारख्या विशेष उपचार सुविधाही... महानगरपालिका सचिव मंजिरी देशपांडे आदी उपस्थित होते.

Comments
Add Comment

MahaIT : महाआयटीच्या प्रणाली अद्ययावतीकरणामुळे शासकीय ऑनलाइन सेवा १६ ते २० ऑक्टोबरदरम्यान तात्पुरत्या बंद

मुंबई : महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ मर्यादित (महाआयटी) मार्फत विकसित आणि देखरेख करण्यात येणाऱ्या राज्य

महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा २०२६ जाहीर; हाँगकाँग, उत्तराखंड आणि सांगलीच्या मंडळांची बाजी!

मुंबई : राज्यात उत्साहात पार पडलेल्या ‘म

Ram Mansion Purchase : सिद्धिविनायक मंदिराजवळीम राम मेन्शनच्या खरेदी व्यवहाराला परवानगी

मुंबई : प्रभादेवी येथील श्री सिद्धिविनायक गणपती मंदिराला लागून असलेल्या राम मेन्शन सहकारी गृहनिर्माण

मतदार यादीत नाव नोंदणीसाठी राज्यात विशेष मोहीम; 17, 18 आणि 24, 25 ऑक्टोबर रोजी मतदान केंद्रांवर शिबिरे

मुंबई : राज्यातील एकाही पात्र नागरिकाचे नाव मतदार यादीत समाविष्ट होण्यापासून वंचित राहू नये, या महत्त्वाच्या

BMC News : वरळीतील सांडपाण्यावर बायोगॅसपासून वीज निर्मिती; प्रकल्प काम 63 टक्के पूर्ण

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई मलनिस्सारण प्रकल्पांतर्गत वरळी येथे उभारण्यात येत असलेल्या 500 दशलक्ष लीटर

मुंबई उपनगरातील तीन नवीन कोळीवाड्यांचे होणार सीमांकन; राज्य सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय

मुंबई शहर व उपनगरातील कोळीवाड्यांचे सीमांकन अधिक स्पष्ट व सर्वसमावेशक करण्याच्या दृष्टीने फडणवीस सरकारने