येत्या ३१ मार्च २०२६ पूर्वी पाण्याचे बिल न भरल्यास पाण्याची लाइन कापणार

मुंबई: महानगरपालिकेमार्फत नागरिकांना नियमित पाणीपुरवठा करण्यात येत असून सर्व जलजोडणीधारकांनी प्रलंबित जलदेयकाचा भरणा येत्या ३१ मार्च २०२६ पूर्वी करावा, असे आवाहन महानगरपालिका प्रशासनातर्फे करण्‍यात येत आहे. निर्धारित मुदतीत प्रलंबित जल देयकाचा भरणा न केल्यास जलजोडणी खंडित करण्याची कार्यवाही करण्यात येईल, असा इशारा देण्‍यात आला आहे.


महानगरपालिका जल अभियंता खात्याने थकीत जल देयकांच्या वसुलीच्या दृष्टीने व्यापक मोहीम हाती घेतली आहे. नागरिकांना जल देयकांचा भरणा करणे सुलभ व्हावे, ह्या दृष्टीकोनातून नजीकच्या विभाग कार्यालयातील नागरी सुविधा केंद्रावर सुविधा करून देण्‍यात आली आहे. तसेच, महानगरपालिकेच्या https://aquaptax.mcgm.gov.in या संकेतस्थळावरही जल देयक भरणा करता येणार आहे. या संकेतस्थळावर जाऊन नागरिकांकरिता → लॉग इन → पाणी विभाग या मार्गाने जलदेयकाची माहिती पाहून भरणा करण्याची सुविधा उपलब्ध आहे.


याखेरीज, एनईएफटी (NEFT), ऑनलाईन पेमेंट (Online Payment), मोबाईल ऍप (Mobile App) यांसारख्या डिजिटल माध्यमांतून जल देयके भरण्‍याची सुविधा उपलब्‍ध आहे.


निर्धारित मुदतीत म्‍हणजेच ३१ मार्च २०२६ पूर्वी प्रलंबित जलदेयकाचा भरणा न केल्यास संबंधित जलजोडणी खंडित करण्याची कार्यवाही करण्यात येऊ शकते. त्यामुळे सर्व जलजोडणीधारकांनी ही बाब लक्षात घेऊन वेळेत जलदेयक भरावे, असे आवाहन करण्यात येत आहे.


ज्या जलजोडणीधारकांना जलदेयके प्राप्त झाली नसतील त्यांनी आपल्या प्रशासकीय विभाग कार्यालयात (वॉर्ड ऑफिस) संपर्क साधावा. नागरिकांना महानगरपालिकेच्या ऍक्‍वा संकेतस्थळावरून किंवा संबंधित सहाय्यक अभियंता (जलकामे) कार्यालयातून जलदेयकाची प्रत उपलब्ध करून घेता येईल, अशी माहितीही महानगरपालिका प्रशानाकडून देण्यात येत आहे.

Comments
Add Comment

Mumbai Local Train : रेल्वे प्रवासी कृपया लक्ष द्या, रविवारी कुठे मेगाब्लॉक आहे ते जाणून घ्या

मध्य रेल्वेवर मेगा ब्लॉक मुंबई: मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाद्वारे विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे

Prakash Abitkar : 'अवयवदानाबाबत राज्यभर व्यापक प्रबोधन मोहीम राबवा'

मुंबई : महाराष्ट्रात मानवी अवयव प्रत्यारोपण कायदा अंमलात आल्यापासून आणि २०११ व २०१४ मधील सुधारित कायद्यांनुसार

BARTI : एमपीएससी मुख्य परीक्षा उत्तीर्ण अनुसूचित जातीच्या उमेदवारांना ‘बार्टी’कडून १० हजार रुपयांचे आर्थिक सहाय्य

मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२५ मध्ये उत्तीर्ण झालेल्या अनुसूचित

Goregaon Bus Fire : गोरेगाव मेट्रो स्थानकाखाली खासगी बस जळून खाक; धुराच्या लोटांमुळे प्रवाशांची धावपळ

मुंबई : पश्चिम द्रुतगती महामार्गावरील गोरेगाव परिसरात आज एक अत्यंत भीषण अपघाताची घटना घडली. गोरेगाव मेट्रो

Dahi Handi in mumbai local train : धावत्या लोकल ट्रेनमध्येच फोडली दहीहंडी! बदलापूर-ठाणे लोकलमध्ये महिला प्रवाशांचा अनोखा गोपाळकाला; व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

मुंबई : मुंबईच्या उपनगरीय रेल्वे प्रवासात एका अत्यंत अनोख्या आणि आगळ्यावेगळ्या दहीहंडी उत्सवाची दृश्ये समोर

Pratap Sarnaik : स्क्रॅप रिक्षा रस्त्यावर दिसता कामा नये; ५ ऑक्टोबरपर्यंत विशेष मोहीम राबवा, प्रवाशांच्या जीवाशी खेळणाऱ्या नियमबाह्य रिक्षांवर कडक कारवाई करा

मुंबई : नियमबाह्य पद्धतीने रस्त्यावर धावणाऱ्या स्क्रॅप रिक्षा प्रवाशांच्या सुरक्षेसाठी गंभीर धोका आहेत. अशा