"काँग्रेसकडे निराशेत स्वतःचे कपडे फाडण्याव्यतिरिक्त काहीही शिल्लक नाही"; पंतप्रधान मोदींची काँग्रेसवर जोरदार टीका

- सततच्या पराभवातून आलेल्या नैराश्यातूनच काँग्रेसचा देशाविरोधात मोर्चा


आसाम सोबतच देशातील बहुतेक राज्यांमध्ये जनतेने काँग्रेसला बाहेरचा रस्ता दाखवला आहे. त्यामुळे सतत हरणारी काँग्रेस लवकरच पराभवाचे शतक पूर्ण करेल. पराभवाच्या याच नैराश्यातून काँग्रेसने देशविरोधात मोर्चा उघडल्याची घणाघाती टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली. आसाममध्ये आज, शनिवारी (१४ मार्च) पंतप्रधानांच्या हस्ते शिलाँग–सिलचर कॉरिडोरचे भूमिपूजन करण्यात आले. यावेळी आयोजित सभेत ते बोलत होते.


याप्रसंगी गेल्या महिन्यात भारत मंडपम येथे झालेल्या एआय समिटदरम्यान काँग्रेस सदस्यांनी केलेल्या आंदोलनाचा उल्लेख करत मोदी म्हणाले की, एआय समिटला बदनाम करण्याच्या प्रयत्नात काँग्रेसने विचित्र प्रकारचे आंदोलन केले. त्यांनी सार्वजनिक ठिकाणी स्वतःचे कपडे फाडून निषेध नोंदवला.या आंदोलनावर टीका करताना मोदी म्हणाले की, आता काँग्रेसकडे निराशेत स्वतःचे कपडे फाडण्याव्यतिरिक्त काहीही शिल्लक नसल्याचे दिसून येते.





आसामच्या युवकांविषयी बोलताना पंतप्रधानांनी सांगितले की, काँग्रेसने असमला ‘फोडा आणि राज्य करा’ या धोरणाची प्रयोगशाळा बनवली होती. मात्र आज असमच्या युवकांसमोर संधींचे विस्तीर्ण आकाश खुले झाले आहे. तसेच काँग्रेसने ईशान्य भारताला अनेक वर्षे दुर्लक्षित केले. स्वातंत्र्यानंतर सीमारेषा अशा पद्धतीने निश्चित करण्यात आल्या की बराक खोऱ्याचा समुद्राशी असलेला संपर्क पूर्णपणे तुटल्याचे मोदींनी नमूद केले. बराक खोरे एकेकाळी महत्त्वाचे व्यापारमार्ग आणि औद्योगिक केंद्र म्हणून ओळखले जात होते, पण त्याची ताकद हिरावून घेतली गेली. स्वातंत्र्यानंतरही अनेक दशकं काँग्रेस सत्तेत होती, तरीही बराक खोऱ्याच्या विकासासाठी कोणतेही ठोस पाऊल उचलले गेले नसल्याची टीका त्यांनी केली.


पंतप्रधानांनी ठामपणे सांगितले की, असममधील भाजपच्या नेतृत्वाखालील डबल-इंजिन सरकार बराक खोऱ्याला बदलण्यासाठी आणि त्याला पुन्हा व्यापार व उद्योगाचे महत्त्वाचे केंद्र बनवण्यासाठी काम करत आहे. जिथे काँग्रेसची विचारसरणी संपते, तिथून आमचे काम सुरू होते. हा ईशान्य भारतातील पहिला एक्सेस-कंट्रोल्ड हाय-स्पीड कॉरिडोर असेल. हा केवळ महामार्ग प्रकल्प नाही, तर ईशान्य भारतातील लोकांच्या दशकांपासूनच्या प्रतीक्षेचा अंत असल्याचे मोदींनी सांगितले.

Comments
Add Comment

Vidhan Parishad Election : विधान परिषद निवडणुकीत महायुतीत शह-काटशहाचे राजकारण; पुणे, अमरावती, छत्रपती संभाजीनगरमध्ये कुरघोड्या!

मुंबई : विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांच्या निवडणुकीत महायुतीतील अंतर्गत मतभेद उघड होऊ लागले

IND vs WI 5th T20I: बंगळुरूत तीन बदल केले तरच टीम इंडियाचं विजयाचं गणित सुटणार! समजून घ्या

भारत आणि वेस्ट इंडिज टी20 मालिका आता रंगतदार वळणावर आहे. कारण वेस्ट इंडिजने भारतीय संघाला या मालिकेत तोडीस तोड

Unknown Calls Block Scheme : खूशखबर! फसव्या कॉल्सची आता खैर नाही; केंद्र सरकारचा सर्वात मोठा निर्णय!

नवी दिल्ली : अनोळखी (Unknown) नंबरवरून येणारे फेक कॉल्स आणि सायबर फसवणुकीच्या त्रासाला आता कंटाळलात का? तर तुमच्यासाठी

Milind Soman Fitness : वयाच्या 60 व्या वर्षीही फिटनेस जबरदस्त! मिलिंद सोमण यांचा 15 मिनिटांचा वर्कआउट आणि फिटनेस मंत्र

Milind Soman Fitness Routine : वयाच्या ६० व्या वर्षीही उत्तम फिटनेस आणि उत्साह कायम ठेवणारे अभिनेता आणि मॉडेल मिलिंद सोमण

Nashik Crime : नराधमाला फाशीच ! डोंगराळे बालिका अत्याचार व हत्या प्रकरणात विजय खैरनारला फाशीची शिक्षा, जलदगती न्यायालयाचा मोठा निकाल

Nashik Crime : नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातील डोंगराळे येथील साडेचार वर्षांच्या बालिकेवरील लैंगिक अत्याचार आणि

Mobile New Rules: Truecaller शिवाय कळणार अनोळखी कॉल कोणाचा! 1 नोव्हेंबरपासून मोबाईलवर दिसणार कॉल करणाऱ्याचं नाव

Mobile New Rules: मोबाईलवर अनोळखी नंबरवरून कॉल आल्यास तो नेमका कोणाचा आहे, हे जाणून घेण्यासाठी अनेकजण Truecaller सारख्या अ‍ॅपचा