मराठी न शिकवणाऱ्या शाळांची मान्यता रद्द होणार

मुंबई : राज्यातील सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी भाषा शिकवणे बंधनकारक आहे. एखाद्या शाळेत मराठी शाळा शिकवली जात नसल्याची माहिती मिळाल्यास त्या शाळेची चौकशी करून, त्यांना एक संधी देण्यात येईल. त्यानंतरही नियमांचे उल्लंघन झाल्यास संबंधित संस्थेची मान्यता रद्द करण्यात येणार असल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी शुक्रवारी विधानसभेत दिली.


आ. हारून खान यांनी याबाबतचा प्रश्न उपस्थित केला होता. ते म्हणाले की, ‘शासनाने मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिल्यानंतरही काही बोर्डाच्या शाळा मराठी भाषा सक्तीची अंमलबजावणी करत नाहीत, ही खेदाची बाब आहे. अनेक नामांकित आंतरराष्ट्रीय शाळांमध्ये मराठी विषय ऐच्छिक ठेवल्या जात असल्याच्या तक्रारी आहे. त्यामुळे आयसीएसई, सीबीएसई, आयबी आदी सर्व मंडळांच्या शाळांमध्ये मराठी विषय सक्तीचा असल्याची खात्री करण्यासाठी शासन विशेष तपासणी मोहीम राबवणार का?, असा प्रश्न त्यांनी विचारला. आ. अतुल भातखळकर आणि आ. अमित देशमुख यांनी या चर्चेत सहभाग घेतला.



सर्व माध्यमांच्या शाळांना मराठी शिकवणे बंधनकारक


यावर उत्तर देताना मंत्री दादा भुसे म्हणाले की, ‘महाराष्ट्रात इयत्ता पहिली ते दहावी सर्व मंडळांच्या शाळांच्या अभ्यासक्रमात मराठी विषय सक्तीचा आहे. काही मंडळांचे अभ्यासक्रम राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर तयार केले जातात. त्यामुळे काही शाळांमध्ये मराठी बंधनकारक करताना ती दुसरी किंवा तिसरी भाषा म्हणून लागू आहे, ही वस्तुस्थिती आहे; परंतु, मराठी भाषा शिकवणे बंधनकारक असल्याचा कायदा आहे. ९ मार्च २०२० च्या अधिसूचनेनुसार, १ एप्रिल २०२० पासून उर्दू माध्यमासकट राज्यातील सर्व माध्यमांच्या आणि सर्व व्यवस्थापनांच्या शाळांमध्ये मराठी भाषेचे अध्यापन आणि अध्ययन सक्तीचे करण्याबातचा अधिनियम लागू करण्यात आला आहे. ज्या माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी शिकवली जात नाही, त्यांची चौकशी करून त्यांना समज देण्यात येईल. त्यानंतरही जर कुणी पालन करत नसेल तर त्या संस्थेची मान्यता रद्द करण्यात येईल’.

Comments
Add Comment

MahaIT : महाआयटीच्या प्रणाली अद्ययावतीकरणामुळे शासकीय ऑनलाइन सेवा १६ ते २० ऑक्टोबरदरम्यान तात्पुरत्या बंद

मुंबई : महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ मर्यादित (महाआयटी) मार्फत विकसित आणि देखरेख करण्यात येणाऱ्या राज्य

महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा २०२६ जाहीर; हाँगकाँग, उत्तराखंड आणि सांगलीच्या मंडळांची बाजी!

मुंबई : राज्यात उत्साहात पार पडलेल्या ‘म

Ram Mansion Purchase : सिद्धिविनायक मंदिराजवळीम राम मेन्शनच्या खरेदी व्यवहाराला परवानगी

मुंबई : प्रभादेवी येथील श्री सिद्धिविनायक गणपती मंदिराला लागून असलेल्या राम मेन्शन सहकारी गृहनिर्माण

मतदार यादीत नाव नोंदणीसाठी राज्यात विशेष मोहीम; 17, 18 आणि 24, 25 ऑक्टोबर रोजी मतदान केंद्रांवर शिबिरे

मुंबई : राज्यातील एकाही पात्र नागरिकाचे नाव मतदार यादीत समाविष्ट होण्यापासून वंचित राहू नये, या महत्त्वाच्या

BMC News : वरळीतील सांडपाण्यावर बायोगॅसपासून वीज निर्मिती; प्रकल्प काम 63 टक्के पूर्ण

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई मलनिस्सारण प्रकल्पांतर्गत वरळी येथे उभारण्यात येत असलेल्या 500 दशलक्ष लीटर

मुंबई उपनगरातील तीन नवीन कोळीवाड्यांचे होणार सीमांकन; राज्य सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय

मुंबई शहर व उपनगरातील कोळीवाड्यांचे सीमांकन अधिक स्पष्ट व सर्वसमावेशक करण्याच्या दृष्टीने फडणवीस सरकारने