युद्धामुळे महागणार विमान प्रवास?

नवी दिल्ली : मध्य पूर्वेतील तणावाचे चटके आता विमान प्रवासालाही बसणार आहेत. इराण आणि अमेरिका-इस्रायल यांच्यात सुरू असलेल्या युद्धाचा परिणाम आता हवाई प्रवासावरही दिसू लागला आहे. देशातील सर्वात मोठी एअरलाइन कंपनी इंडिगोने १४ मार्चपासून देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय विमान तिकिटांवर अतिरिक्त इंधन अधिभार (फ्यूल सरचार्ज) लागू करण्याची घोषणा केली आहे. या निर्णयानंतर विमानप्रवास करणाऱ्या प्रवाशांना आता तिकिटांसोबत ४२५ ते २३०० रुपयांपर्यंत अतिरिक्त शुल्क भरावे लागणार आहे.


कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, हा नवीन नियम १४ मार्चच्या रात्री १२ वाजल्यापासून लागू होणार असून त्या वेळेनंतर केलेल्या सर्व नवीन बुकिंगवर हा इंधन अधिभार आकारला जाईल. मध्य पूर्वेतील वाढत्या भू-राजकीय तणावामुळे जेट इंधनाच्या किमतींमध्ये मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे परिचालन खर्च वाढल्याने कंपनीला हा निर्णय घ्यावा लागल्याचे इंडिगोने स्पष्ट केले आहे.


कंपनीच्या मते, भारत आणि भारतीय उपखंडातील विमानप्रवासासाठी ४२५ रुपये इतका इंधन अधिभार आकारला जाईल. मध्य पूर्वेकडील उड्डाणांसाठी हा अधिभार ९०० रुपये असेल. तसेच दक्षिण-पूर्व आशिया, चीन, आफ्रिका आणि पश्चिम आशियातील उड्डाणांसाठी १८०० रुपये अतिरिक्त शुल्क आकारले जाईल. युरोपकडे जाणाऱ्या विमानप्रवासासाठी प्रवाशांना २३०० रुपये इतका इंधन अधिभार भरावा लागणार आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय मार्गांवरील प्रवास अधिक महाग होण्याची शक्यता आहे.


एअरलाइन कंपन्यांच्या एकूण खर्चात एव्हिएशन टर्बाइन फ्यूल (ATF) म्हणजेच जेट इंधनाचा मोठा वाटा असतो. इंडिगोच्या मते, एटीएफचा हिस्सा एअरलाइनच्या एकूण परिचालन खर्चाच्या सुमारे ४० टक्के असतो. मध्य पूर्वेतील वाढत्या तणावामुळे या इंधनाच्या किमतीत मोठी वाढ झाली आहे. इंटरनॅशनल एअर ट्रान्सपोर्ट असोसिएशनच्या जेट फ्यूल मॉनिटरनुसार या प्रदेशात इंधनाच्या किमती ८५ टक्क्यांपेक्षा जास्त वाढल्या आहेत.


कंपनीने असेही सांगितले की, इंधनाच्या वाढत्या किमतींचा संपूर्ण परिणाम थेट तिकिटांच्या भाड्यात जोडला असता तर विमानप्रवास आणखी महाग झाला असता. त्यामुळे प्रवाशांवरील आर्थिक भार काही प्रमाणात कमी ठेवण्यासाठी मर्यादित स्वरूपात इंधन अधिभार आकारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.


दरम्यान, इंडिगोच्या आधी एअर इंडिया आणि एअर इंडिया एक्सप्रेस यांनीही विमान तिकिटांवर इंधन अधिभार लागू करण्याची घोषणा केली होती. त्यामुळे वाढत्या इंधन दरांचा परिणाम आता भारतातील हवाई प्रवासावर स्पष्टपणे दिसू लागला आहे. आगामी काळात मध्य पूर्वेतील परिस्थिती कायम राहिली तर विमानप्रवासाचे दर आणखी वाढण्याची शक्यता तज्ज्ञांकडून व्यक्त केली जात आहे.

Comments
Add Comment

MahaIT : महाआयटीच्या प्रणाली अद्ययावतीकरणामुळे शासकीय ऑनलाइन सेवा १६ ते २० ऑक्टोबरदरम्यान तात्पुरत्या बंद

मुंबई : महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ मर्यादित (महाआयटी) मार्फत विकसित आणि देखरेख करण्यात येणाऱ्या राज्य

महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा २०२६ जाहीर; हाँगकाँग, उत्तराखंड आणि सांगलीच्या मंडळांची बाजी!

मुंबई : राज्यात उत्साहात पार पडलेल्या ‘म

Ram Mansion Purchase : सिद्धिविनायक मंदिराजवळीम राम मेन्शनच्या खरेदी व्यवहाराला परवानगी

मुंबई : प्रभादेवी येथील श्री सिद्धिविनायक गणपती मंदिराला लागून असलेल्या राम मेन्शन सहकारी गृहनिर्माण

मतदार यादीत नाव नोंदणीसाठी राज्यात विशेष मोहीम; 17, 18 आणि 24, 25 ऑक्टोबर रोजी मतदान केंद्रांवर शिबिरे

मुंबई : राज्यातील एकाही पात्र नागरिकाचे नाव मतदार यादीत समाविष्ट होण्यापासून वंचित राहू नये, या महत्त्वाच्या

BMC News : वरळीतील सांडपाण्यावर बायोगॅसपासून वीज निर्मिती; प्रकल्प काम 63 टक्के पूर्ण

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई मलनिस्सारण प्रकल्पांतर्गत वरळी येथे उभारण्यात येत असलेल्या 500 दशलक्ष लीटर

मुंबई उपनगरातील तीन नवीन कोळीवाड्यांचे होणार सीमांकन; राज्य सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय

मुंबई शहर व उपनगरातील कोळीवाड्यांचे सीमांकन अधिक स्पष्ट व सर्वसमावेशक करण्याच्या दृष्टीने फडणवीस सरकारने