CSR डॅशबोर्ड सुरू करा, मुंबई महापालिकेकडे आमदार साटमांची मागणी

दानशूर संस्था व नागरिकांना योगदान देण्यासाठी प्लॅटफॉर्म उभारण्याचा प्रस्ताव, आमदार अमीत साटम यांचे महापौर रितू तावडे आणि आयुक्त भूषण गगराणी यांना पत्र


शालेय साहित्य, रुग्णालयीन उपकरणे, वॉटर कूलर आदी गरजा १५ दिवसांसाठी डॅशबोर्डवर प्रदर्शित करता येतील 


१५ दिवसांत प्रतिसाद न मिळाल्यास महापालिका सिपीडी (CPD) मार्फत खरेदी करू शकेल


या उपक्रमामुळे बीएमसीची दरवर्षी ५०० ते १,००० कोटी रुपयांची बचत होऊ शकते 


मुंबई : मुंबई महानगरपालिकेच्या कामकाजात नागरिक आणि दानशूर संस्थांचा अधिक सहभाग वाढवण्यासाठी नवा उपक्रम राबवण्याचा प्रस्ताव समोर आला आहे. मुंबई भाजप अध्यक्ष आणि आमदार अमित साटम यांनी महापौर रितू तावडे आणि महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांना पत्र लिहून बीएमसीच्या संकेतस्थळावर स्वतंत्र CSR डॅशबोर्ड सुरू करण्याची मागणी केली आहे.

या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून दानशूर संस्था तसेच इच्छुक नागरिकांना सार्वजनिक कामांसाठी थेट योगदान देण्याची संधी मिळेल, असे साटम यांनी आपल्या पत्रात नमूद केले आहे. सध्या शालेय साहित्य, रुग्णालयीन उपकरणे, वॉटर कूलर यांसारख्या विविध वस्तू महापालिकेच्या मध्यवर्ती खरेदी विभागामार्फत खरेदी केल्या जातात. यासाठी निविदा प्रक्रिया राबवली जाते.

निविदा प्रक्रिया त्वरित सुरू करण्याऐवजी, अशा सर्व गरजा प्रथम CSR डॅशबोर्डवर १५ दिवसांसाठी प्रदर्शित केल्या जाव्यात. यामुळे दानशूर संस्था आणि इच्छुक नागरिकांना योगदान देण्याची एक संधी मिळेल. कोणत्याही नव्या गरजेची नोंद प्रथम या डॅशबोर्डवर करावी आणि १५ दिवसांत प्रतिसाद न मिळाल्यासच CPD कडून खरेदी प्रक्रिया सुरू करावी, असे आमदार अमीत साटम यांनी सांगितले.

मुंबईत अनेक धर्मादाय आणि परोपकारी संस्था आहेत ज्या सार्वजनिक उद्देशांसाठी मदत करण्यास इच्छुक आहेत. मात्र योगदान कसे द्यावे याची माहिती त्यांना नसते. असा प्लॅटफॉर्म उपलब्ध झाल्यास ते आनंदाने महापालिकेच्या विविध गरजांसाठी मदत करतील, असेही आमदार अमीत साटम यांनी नमूद केले.

अशा प्रकारची व्यवस्था सुरू केल्यास महापालिका दरवर्षी अंदाजे ५०० ते १,००० कोटी रुपयांपर्यंत पैसे वाचवू शकेल. तसेच शहराच्या विकासामध्ये नागरिकांचा अधिक सहभागही वाढेल, असे आमदार अमीत साटम यांनी सांगितले.
Comments
Add Comment

MahaIT : महाआयटीच्या प्रणाली अद्ययावतीकरणामुळे शासकीय ऑनलाइन सेवा १६ ते २० ऑक्टोबरदरम्यान तात्पुरत्या बंद

मुंबई : महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ मर्यादित (महाआयटी) मार्फत विकसित आणि देखरेख करण्यात येणाऱ्या राज्य

महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा २०२६ जाहीर; हाँगकाँग, उत्तराखंड आणि सांगलीच्या मंडळांची बाजी!

मुंबई : राज्यात उत्साहात पार पडलेल्या ‘म

Ram Mansion Purchase : सिद्धिविनायक मंदिराजवळीम राम मेन्शनच्या खरेदी व्यवहाराला परवानगी

मुंबई : प्रभादेवी येथील श्री सिद्धिविनायक गणपती मंदिराला लागून असलेल्या राम मेन्शन सहकारी गृहनिर्माण

मतदार यादीत नाव नोंदणीसाठी राज्यात विशेष मोहीम; 17, 18 आणि 24, 25 ऑक्टोबर रोजी मतदान केंद्रांवर शिबिरे

मुंबई : राज्यातील एकाही पात्र नागरिकाचे नाव मतदार यादीत समाविष्ट होण्यापासून वंचित राहू नये, या महत्त्वाच्या

BMC News : वरळीतील सांडपाण्यावर बायोगॅसपासून वीज निर्मिती; प्रकल्प काम 63 टक्के पूर्ण

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई मलनिस्सारण प्रकल्पांतर्गत वरळी येथे उभारण्यात येत असलेल्या 500 दशलक्ष लीटर

मुंबई उपनगरातील तीन नवीन कोळीवाड्यांचे होणार सीमांकन; राज्य सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय

मुंबई शहर व उपनगरातील कोळीवाड्यांचे सीमांकन अधिक स्पष्ट व सर्वसमावेशक करण्याच्या दृष्टीने फडणवीस सरकारने