Mumbai: चेंबूरमधील संतापजनक घटना; एका अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार

मुंबई: मुंबईत एक संतापजनक घटना समोर आली आहे. चेंबूरच्या टिळक नगर परिसरात एका अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी पोलिसांनी दोन नराधमांना अटक केली आहे. या घटनेमुळे मुंबईतील महिला आणि मुलींच्या सुरक्षितेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.



चेंबुरमध्ये अल्पवयीन मुलीवर अत्याचार



मिळालेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी आणि दोन्ही आरोपी हे गोवंडी येथील शिवाजी नगर परिसरातील रहिवासी आहेत. कामाच्या बहाण्याने आरोपींनी या अल्पवयीन मुलीला टिळक नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत बोलावून घेतले होते. तिला निर्जन ठिकाणी असलेल्या झुडपात नेऊन तिच्यावर अत्याचार केल्याचा आरोप पीडितेने केला आहे.


​मुलीच्या जबाबाच्या आधारे पोलिसांनी तातडीने आफताब आणि अनिस नावाच्या दोन संशयितांना अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या दोघांविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) आणि पोक्सो (POCSO) कायद्याच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अटक करण्यात आलेल्या दोन्ही आरोपींना सोमवारी न्यायालयात हजर केले जाणार असून, त्यांना पोलीस कोठडी मिळण्याची शक्यता आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहेत.


दुसरीकडे, बीडच्या परळी तालुक्यातून धक्कादायक प्रकार समोर आला आहे. परळी तालुक्यातील एका गावामध्ये एका सोळा वर्षीय मुलीवर दोघांनी अत्याचार केल्याची घटना काही दिवसांपूर्वी घडली होती. यामध्ये आरोपीने या मुलीला घरी बोलावून दुसऱ्या साथीदाराने तिचे हातपाय बांधत अत्याचार केले होते. या मुलीने याबाबतची माहिती कुटुंबीयांना दिल्यानंतर कुटुंबीयांनी याचा जाब आरोपींना विचारताच आरोपींनी त्यांना देखील शिवीगाळ करत धमकी दिली आहे. याप्रकरणी परळी ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलीस करत आहेत.

Comments
Add Comment

MahaIT : महाआयटीच्या प्रणाली अद्ययावतीकरणामुळे शासकीय ऑनलाइन सेवा १६ ते २० ऑक्टोबरदरम्यान तात्पुरत्या बंद

मुंबई : महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ मर्यादित (महाआयटी) मार्फत विकसित आणि देखरेख करण्यात येणाऱ्या राज्य

महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा २०२६ जाहीर; हाँगकाँग, उत्तराखंड आणि सांगलीच्या मंडळांची बाजी!

मुंबई : राज्यात उत्साहात पार पडलेल्या ‘म

Ram Mansion Purchase : सिद्धिविनायक मंदिराजवळीम राम मेन्शनच्या खरेदी व्यवहाराला परवानगी

मुंबई : प्रभादेवी येथील श्री सिद्धिविनायक गणपती मंदिराला लागून असलेल्या राम मेन्शन सहकारी गृहनिर्माण

मतदार यादीत नाव नोंदणीसाठी राज्यात विशेष मोहीम; 17, 18 आणि 24, 25 ऑक्टोबर रोजी मतदान केंद्रांवर शिबिरे

मुंबई : राज्यातील एकाही पात्र नागरिकाचे नाव मतदार यादीत समाविष्ट होण्यापासून वंचित राहू नये, या महत्त्वाच्या

BMC News : वरळीतील सांडपाण्यावर बायोगॅसपासून वीज निर्मिती; प्रकल्प काम 63 टक्के पूर्ण

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई मलनिस्सारण प्रकल्पांतर्गत वरळी येथे उभारण्यात येत असलेल्या 500 दशलक्ष लीटर

मुंबई उपनगरातील तीन नवीन कोळीवाड्यांचे होणार सीमांकन; राज्य सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय

मुंबई शहर व उपनगरातील कोळीवाड्यांचे सीमांकन अधिक स्पष्ट व सर्वसमावेशक करण्याच्या दृष्टीने फडणवीस सरकारने