'नाशिकच्या सिंहस्थ कुंभमेळ्यात फक्त हिंदूंचीच दुकानं हवी'

नाशिक : नाशिक जिल्ह्यात २०२७ मध्ये होणार असलेल्या सिंहस्थ कुंभमेळ्यात फक्त हिंदूंचीच दुकानं हवी. कुंभमेळ्याला हजेरी लावणाऱ्यांनी याच दुकानांतून खरेदी करण्याला प्राधान्य द्यावे. सिंहस्थ कुंभमेळ्यात जर कोणी मुसलमान दुकान लावण्याचा प्रयत्न करत असेल तर ते दुकान उखडून टाका असा इशारा भाजप नेते नितेश राणे यांनी दिली. ते नाशिकमध्ये हिंदू हित रक्षातर्फे आयोजित नित्य गरजांना आवश्यक अशा शेकडो हिंदू कारागीर व लघु व्यावसायिकांच्या यादीचे प्रकाशन व लोकार्पण सोहळ्यात बोलत होते. याप्रसंगी नितेश राणे ‘हिंदूंचा रुपया हिंदूलाच’ या विषयावर बोलले. हिंदू व्यक्तीने त्याच्या गरजेच्या वस्तू आणि सेवांची खरेदी करताना हिंदू व्यवसायिकालाच प्राधान्य द्यावे, असे भाजप नेते नितेश राणे म्हणाले. याप्रसंगी मंचावर कामाख्या देवीचे कालीचरण महाराज, आमदार सीमा हिरे, हिंदू हित रक्षाचे प्रवीण जोशी उपस्थित होते.



भारतात हिंदूंच्या बाजूने आणि हिंदूंच्या हितासाठी बोलायचे नाही तर काय पाकिस्तानमधील इस्लामाबादमध्ये जाऊन बोलायचे ? असा प्रश्न भाजप नेते नितेश राणे यांनी उपस्थित केला. त्यांना 'गजवा - ए - हिंद'च्या माध्यमातून २०४७ पर्यंत भारताला इस्लामिक राष्ट्र बनवायचे आहे. पण आम्ही हे कधीच होऊ देणार नाही. यासाठी सर्व हिंदूंनी एकत्र येण्याची गरज आहे. आपण सतर्क आणि जागरूक राहायला पाहिजे. कुणाच्याही जन्म आणि मृत्यू प्रमाणपत्रावर हिंदू असे लिहिलेले असते, त्यावर मंत्री किंवा आमदार असे लिहिलेले नसते. त्यामुळे शेवटच्या श्वासापर्यंत मी हिंदूंसाठी उभा आहे. आज जर आपण हिंदू म्हणून एकत्र आलो नाही तर पुढची पिढी आपल्याला माफ करणार नाही, असे मंत्री नितेश राणे म्हणाले.



आम्ही हिंदुत्ववादी विचाराचे सरकार निवडून देण्यासाठी तुमच्याकडे आलो होतो आणि तुम्ही हिंदुत्ववादी सरकार निवडून दिले. त्यावेळी आम्ही आश्वासन दिले होते की, आम्ही धर्मांतर विरोधी कायदा आणू आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली हिंदूंच्या रक्षणासाठी ठोस कायदे करण्याचे काम सुरू आहे. आम्ही आमदार व मंत्री फक्त हिंदूंमुळे बसलो आहोत त्यांनी आम्हाला मत दिले नाही आणि आम्ही त्यांच्याकडे मत मागायला देखील गेलो नाही. सध्या माझ्याकडे मत्स्य व बंदरे खाते आहे. यापूर्वी हिंदूंच्या नावाने धरणांवर ठेके असायचे मात्र तो चालवणारा मुसलमान असायचा. आता ते चालणार नाही; असे मंत्री नितेश राणे म्हणाले.



कार्यक्रमाच्या सुरुवातीला भारतमाता आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. त्यानंतर शंखनाद आणि ध्वजारोहण करण्यात आले. याप्रसंगी महापौर हिमगौरी आडके, नगरसेविका उषा बेंडकुळे, नगरसेवक नितीन निगळ, सुरेश पाटील, वंदना पाटील, रामसिंग बावरी, बबलू परदेशी आदी उपस्थित होते.



सिंहस्थ कुंभमेळा २०२७ : नाशिक-त्र्यंबकेश्वर येथे होणारा सिंहस्थ कुंभमेळा २०२७ हा एक अत्यंत महत्त्वाचा धार्मिक उत्सव आहे, जो दर १२ वर्षांनी एकदा आयोजित केला जातो. यंदा नाशिक जिल्ह्यात ३१ ऑक्टोबर २०२६ रोजी सिंहस्थ कुंभमेळा सुरू होणार आहे आणि त्याची समाप्ती २४ जुलै २०२८ रोजी होणार आहे. नियोजनानुसार ३१ ऑक्टोबर २०२६ रोजी त्र्यंबकेश्वर, रामकुंड आणि पंचवटी येथे पारंपरिक ध्वजारोहणाने सिंहस्थ कुंभमेळ्याचा शुभारंभ होणार आहे. यंदाच्या सिंहस्थात २ ऑगस्ट २०२७, ३१ ऑगस्ट २०२७ आणि ११ तसेच १२ सप्टेंबर २०२७ रोजी शाही स्नान होणार आहे. महायुती सरकारने नाशिक जिल्ह्यातील सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी २२,१८१ कोटी रुपयांच्या विकासकामांना मंजुरी दिली आहे. रस्ते विकास, गोदावरी नदीचे शुद्धीकरण, नवीन घाटांचे बांधकाम आणि रेल्वे स्थानकांचे आधुनिकीकरण यांसारख्या मोठ्या प्रकल्पांचा यात समावेश आहे. सिंहस्थ कुंभमेळा पंचवटीतील रामकुंड आणि त्र्यंबकेश्वरच्या कुशावर्त या पवित्र ठिकाणी होणार आहे.


सिंहस्थ म्हणजे काय ? : जेव्हा गुरु सिंह राशीत प्रवेश करतो, तेव्हा नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथे कुंभमेळा होतो, म्हणूनच याला सिंहस्थ किंवा सिंहस्थ कुंभमेळा असे म्हणतात. हा एकमेव कुंभमेळा आहे जो एकाच (नाशिक जिल्हा) जिल्ह्यात दोन वेगवेगळ्या ठिकाणी होणार आहे. वैष्णव आखाड्यांसाठी नाशिकच्या पंचवटीतील रामकुंड आणि शैव आखाड्यांसाठी त्र्यंबकेश्वरच्या कुशावर्त या पवित्र ठिकाणी शाही स्नान तसेच इतर अनेक धार्मिक कार्यक्रम होणार आहेत.

Comments
Add Comment

ST Bus NCMC Card : एसटी प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी! १ सप्टेंबरपासून ज्येष्ठ नागरिक, महिलांना NCMC कार्ड अनिवार्य

मुंबई : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) बसमधून प्रवास करणाऱ्या ज्येष्ठ नागरिक आणि महिला

Ravindra Chavan : भाजपा प्रदेश कार्यकारिणी बैठकीत रविंद्र चव्हाणांचे कार्यकर्त्यांना मोठे आवाहन

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली विकसित महाराष्ट्र

Pune Crime News : पुण्यातील खराडीत २३ वर्षीय IT इंजिनिअर तरुणीने आयुष्य संपवलं; प्रियकराला पोलिसांकडून अटक, नेमकं प्रकरण काय ?

पुणे : पुण्यातील खराडी परिसरात एका २३ वर्षीय आयटी इंजिनिअर तरुणीने आयुष्य संपवल्याची धक्कादायक घटना समोर आली

Ambajogai : स्लीपर हातात धरली अन् लेकीच्या शिक्षणासाठी अनवाणी धावली आई, रमाबाईंची मॅरेथॉन राज्यात चर्चेत

Ambajogai Marathon : ना पायात महागडे बूट, ना अंगावर ट्रॅक सूट, साधी साडी अन् रोजच्या वापरातली चप्पल एवढंच काय तर त्या माऊलीकडे.

Maharashtra Zilla Parishad Elections : उर्वरित २२ जिल्हा परिषदा राष्ट्रवादी स्वबळावर लढणार?

- कोअर कमिटीच्या बैठकीत चर्चा; दिलीप वळसेंकडे नेतृत्व, २७ सप्टेंबरला नाशिकमध्ये राज्यव्यापी शिबिर मुंबई : आगामी

Neelam Gorhe : भटके-विमुक्त समाजाने शिक्षणाच्या बळावर प्रगती साधावी : डॉ. नीलम गोऱ्हे

पुणे : भटके-विमुक्त समाजाच्या विकासासाठी केंद्र आणि राज्य सरकारकडून विविध योजना राबवल्या जात आहेत. या योजनांचा