'महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य विधेयक' विधानसभेत मंजूर 

मुंबई : राज्यातील बेकायदेशीर धर्मांतरणाला चाप लावण्यासाठी राज्य सरकारने मांडलेले ऐतिहासिक ‘महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य विधेयक, २०२६’ सोमवारी रात्री विधानसभेत मंजूर करण्यात आले. गृहराज्य मंत्री पंकज भोयर यांनी हे विधेयक सभागृहात मंजुरीसाठी मांडले. सत्ताधारी आमदारांनी बाके वाजवून त्याचे स्वागत केले.


प्रलोभन, दहशत किंवा विवाहाचे आमिष दाखवून धर्मांतर करणाऱ्यांना त्यात १० वर्षांपर्यंत कारावास आणि ७ लाख रुपयांपर्यंतच्या दंडाची कठोर तरतूद करण्यात आली आहे. गेल्या काही वर्षांत नोकरी, मोफत शिक्षण किंवा ‘दैवी चमत्कारांचा’ बनाव रचून भोळ्याभाभड्या नागरिकांना धर्मांतरित करण्याचे प्रकार वाढले आहेत. हे रोखण्यासाठी सरकारने हे पाऊल उचलले आहे. दरम्यान, हे विधेयक आता विधान परिषदेत मंजुरीसाठी मांडले जाणार आहे.


धर्मांतराच्या उद्देशाने केलेले विवाह 'अवैध'


- या विधेयकानुसार, केवळ धर्मांतराच्या उद्देशाने केलेले विवाह आता 'अवैध' ठरतील. मात्र, अशा विवाहातून जन्मलेल्या बालकांना आई-वडिलांच्या मालमत्तेत पूर्ण अधिकार असेल आणि त्यांची कस्टडी आईकडेच राहील. स्वेच्छेने धर्मांतर करायचे असल्यास ६० दिवस आधी जिल्हा दंडाधिकाऱ्यांना नोटीस द्यावी लागेल. पीडित व्यक्ती अल्पवयीन, महिला किंवा अनुसूचित जाती-जमातीची असल्यास ७ वर्षे कारावास व ५ लाख रुपये दंड होईल. गुन्ह्याची पुनरावृत्ती झाल्यास १० वर्षांची शिक्षा होईल.


- धर्माचा अपमान करून स्वतःच्या धर्माचे 'ग्लोरीफिकेशन' करणे किंवा 'दैवी प्रकोपाची' भीती घालणे हा देखील गुन्हा ठरेल. दोषी आढळणाऱ्या संस्थांची नोंदणी रद्द करून सरकारी अनुदान बंद केले जाईल. या प्रकरणांचा तपास किमान 'पीएसआय' दर्जाचा अधिकारी करेल आणि सुनावणी थेट सत्र न्यायालयात होईल. धर्मांतर बळजबरीने झालेले नाही, हे सिद्ध करण्याची जबाबदारी आता आरोपीवर असेल.

Comments
Add Comment

बदलापूरच्या सिताराम राऊळ यांना लंडनच्या प्रतिष्ठित ‘Wildlife Photographer of the Year’ पुरस्काराने सन्मानित

बदलापूर : वन्यजीव छायाचित्रणाच्या क्षेत्रात भारताची आणि महाराष्ट्राची मान उंचावणारी एक अभिमानाची बातमी समोर

MahaIT : महाआयटीच्या प्रणाली अद्ययावतीकरणामुळे शासकीय ऑनलाइन सेवा १६ ते २० ऑक्टोबरदरम्यान तात्पुरत्या बंद

मुंबई : महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ मर्यादित (महाआयटी) मार्फत विकसित आणि देखरेख करण्यात येणाऱ्या राज्य

शाळा प्रवेशासाठी बालकांचे किमान वय निश्चित; २०२७-२८ पासून टप्प्याटप्प्याने लागू होणार नवीन निकष

मुंबई : राज्य शासनाने पूर्व-प्राथमिक ते

महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा २०२६ जाहीर; हाँगकाँग, उत्तराखंड आणि सांगलीच्या मंडळांची बाजी!

मुंबई : राज्यात उत्साहात पार पडलेल्या ‘म

Ram Mansion Purchase : सिद्धिविनायक मंदिराजवळीम राम मेन्शनच्या खरेदी व्यवहाराला परवानगी

मुंबई : प्रभादेवी येथील श्री सिद्धिविनायक गणपती मंदिराला लागून असलेल्या राम मेन्शन सहकारी गृहनिर्माण

‘रामायणम्’चा इंटरनॅशनल ट्रेलर प्रदर्शित; रणबीर कपूर आणि यशचे सोलो पोस्टर्स जारी

बहुप्रतिक्षित आण