मृणालताई गोरे विस्तारित उड्डाणपूल एप्रिलपर्यंत होणार वाहतूकीसाठी खुला

मुंबई: मृणालताई गोरे रेल्वे उड्डाणपुलाला जोडणाऱ्या राम मंदिर रोड ते गोरेगाव पश्चिम पर्यंतच्या रिलीफ रोड पर्यंत विस्तारित पुलाच्या कामाचा खर्च तब्बल ४० कोटींनी वाढला गेला. आतापर्यंत या विस्तारित पुलाच्या वाढीव खर्च तीन वेळा वाढवला गेला आहे. २०९ कोटी रुपयांवरून या प्रकल्पाचा खर्च २४८ कोटी रुपयांवर पोहोचला गेला आहे. या पुलाचे काम आता पूर्णत्वास आले असून ३० एप्रिल २०२६ पर्यंत ही कामे पूर्ण होऊन प्रत्यक्ष वाहतुकीसाठी हा मार्ग खुला होणार आहे.


महापालिकेच्या पुल विभागामार्फत या विस्तारित पुलाच्याकाम हाती घेण्यात आले आहे. या पुलाच्या कामाला २०१८ मध्ये मंजुरी प्राप्त झाली होती आणि २२ मार्च २०१९ मध्ये या कामाला सुरुवात झाली आहे. या कामासाठी एम इ पी एल - ग्यान या संयुक्त भागीदारीत कंपनीची निवड करण्यात आली होती.


सुरुवातीला या प्रकल्पाची कंत्राट खर्च सुमारे २०९ कोटी रुपये एवढा होता. होती. पावसाला वगळता २४ महिन्यांचा कालावधीत हे काम पूर्ण करणे अपेक्षित होते.पण पुढे कोविडचा आजार यांमुळे काम थांबले आणि पुढे २०२३ मध्ये याचा वाढवण्याचा प्रस्ताव सादर करून विविध करांसह २०९ कोटींवरून याचा खर्च २४० कोटी रुपये एवढा करण्यास मान्यता देण्यात आली. महापालिका पूल विभागाच्या अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, कामाला प्रत्यक्ष सुरुवात केल्यानंतर काही तांत्रिक अडचणी व अतिरिक्त कामांची गरज निर्माण झाली. त्यामुळे प्रशासकीय मंजुरी घेऊन कंत्राट रकमेत सुधारणा करण्यात आली असून कामाचा कालावधीही वाढवण्यात आला आहे. सध्या या प्रकल्पाचे सुमारे ८० टक्के काम पूर्ण झाले असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे. सुधारित कालावधीनुसार हे काम ३० एप्रिल २०२६ पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित आहे.


मृणाल गोरे रेल्वे उड्डाणपुलाचा मुख्य पूल २०१६ मध्ये वाहतुकीसाठी खुला करण्यात आला होता. सध्या या पुलाच्या दोन्ही बाजूंना सुमारे ३९० मीटर लांबीचा ‘आर्म’ पूल उभारण्याचे काम सुरू आहे. यामुळे परिसरातील वाहतूक अधिक सुरळीत होण्यास मदत होणार आहे. तसेच पुलाच्या बांधकामासोबत पादचारी सुविधा, रंगकाम, सुरक्षा उपाययोजना आणि ध्वनिरोधक भिंती (नॉईज बॅरिअर) उभारण्याचाही प्रस्ताव आहे.या अतिरिक्त कामांमुळे प्रकल्पाच्या खर्चात वाढ झाली असून विविध करांसह हा खर्च एकूण २४८ कोटी रुपयांवर जाऊन पोहोचला आहे.


या प्रकल्पाचे काम पूर्ण झाल्यानंतर मृणालताई गोरे पुलाच्या मार्गातील वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात कमी होईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

Comments
Add Comment

MahaIT : महाआयटीच्या प्रणाली अद्ययावतीकरणामुळे शासकीय ऑनलाइन सेवा १६ ते २० ऑक्टोबरदरम्यान तात्पुरत्या बंद

मुंबई : महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ मर्यादित (महाआयटी) मार्फत विकसित आणि देखरेख करण्यात येणाऱ्या राज्य

महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा २०२६ जाहीर; हाँगकाँग, उत्तराखंड आणि सांगलीच्या मंडळांची बाजी!

मुंबई : राज्यात उत्साहात पार पडलेल्या ‘म

Ram Mansion Purchase : सिद्धिविनायक मंदिराजवळीम राम मेन्शनच्या खरेदी व्यवहाराला परवानगी

मुंबई : प्रभादेवी येथील श्री सिद्धिविनायक गणपती मंदिराला लागून असलेल्या राम मेन्शन सहकारी गृहनिर्माण

मतदार यादीत नाव नोंदणीसाठी राज्यात विशेष मोहीम; 17, 18 आणि 24, 25 ऑक्टोबर रोजी मतदान केंद्रांवर शिबिरे

मुंबई : राज्यातील एकाही पात्र नागरिकाचे नाव मतदार यादीत समाविष्ट होण्यापासून वंचित राहू नये, या महत्त्वाच्या

BMC News : वरळीतील सांडपाण्यावर बायोगॅसपासून वीज निर्मिती; प्रकल्प काम 63 टक्के पूर्ण

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई मलनिस्सारण प्रकल्पांतर्गत वरळी येथे उभारण्यात येत असलेल्या 500 दशलक्ष लीटर

मुंबई उपनगरातील तीन नवीन कोळीवाड्यांचे होणार सीमांकन; राज्य सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय

मुंबई शहर व उपनगरातील कोळीवाड्यांचे सीमांकन अधिक स्पष्ट व सर्वसमावेशक करण्याच्या दृष्टीने फडणवीस सरकारने