Gyan Bharatam project : ज्ञानभारतम् प्रकल्पाची सुरुवात; देशव्यापी हस्तलिखित सर्वेक्षण मोहिमेला प्रारंभ

मुंबई : भारताच्या समृद्ध ज्ञानपरंपरेचा अमूल्य ठेवा असलेल्या हस्तलिखितांचे जतन, संवर्धन आणि प्रसार करण्यासाठी केंद्र सरकारने ‘ज्ञानभारतम्’ या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाची अंमलबजावणी सुरू केली आहे. या अंतर्गत देशव्यापी हस्तलिखित सर्वेक्षण मोहिमेला १६ मार्च २०२६ पासून प्रारंभ करण्यात आला आहे.


भारताला प्राचीन काळापासून हस्तलिखितांचा मोठा वारसा लाभला असून पारंपरिक ज्ञान पिढ्यान्‌पिढ्या याच माध्यमातून पुढे आले आहे. मात्र ही हस्तलिखिते विविध ठिकाणी विखुरलेल्या स्वरूपात असल्याने त्यांचे एकत्रीकरण करण्याची गरज ओळखून ‘ज्ञानभारतम्’ प्रकल्पाची आखणी करण्यात आली आहे.


संस्कृती मंत्रालयाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या या मोहिमेचा मुख्य उद्देश देशभरातील मौल्यवान हस्तलिखितांचे सर्वेक्षण, दस्तऐवजीकरण, डिजिटायझेशन आणि जतन करणे हा आहे. केंद्रीय अर्थसंकल्प २०२५ मध्ये जाहीर करण्यात आलेल्या या योजनेअंतर्गत एक कोटीहून अधिक हस्तलिखितांचा शोध घेऊन त्यांची नोंदणी करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.


या प्रकल्पांतर्गत राष्ट्रीय डिजिटल संग्रह उभारण्याचा मानस असून, त्यामध्ये भारताच्या ज्ञानपरंपरेशी संबंधित हस्तलिखिते राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर उपलब्ध करून दिली जाणार आहेत. हस्तलिखितांची मालकी संबंधित संस्था किंवा व्यक्तीकडेच राहणार असली तरी इच्छुकांनी ती शासनाकडे सुपूर्द करण्याची मुभा देखील देण्यात आली आहे.


महाराष्ट्रात या मोहिमेसाठी कवी कालिदास संस्कृत विद्यापीठ, नागपूर आणि भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्था, पुणे ही क्लस्टर केंद्रे तर आनंद आश्रम संस्थान आणि भारत इतिहास संशोधक मंडळ, पुणे ही स्वतंत्र केंद्रे म्हणून कार्यरत राहणार आहेत. राज्य नोडल संस्था म्हणून पुराभिलेख संचालनालय, मुंबई यांची नियुक्ती करण्यात आली आहे.


या सर्वेक्षणासाठी विशेष “Gyan Bharatam” मोबाईल अ‍ॅप विकसित करण्यात आले असून त्याद्वारे हस्तलिखितांचे मूल्यांकन, पडताळणी आणि दस्तऐवजीकरण केले जाणार आहे. जिल्हास्तरावर नोडल अधिकारी नियुक्त करून विविध संस्था, ग्रंथालये, धार्मिक ठिकाणे तसेच खाजगी संग्राहक यांना या मोहिमेत सहभागी करून घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.


या उपक्रमात संशोधक, विद्यार्थी, स्वयंसेवक, पारंपरिक विद्वान तसेच वारसा संवर्धन संस्थांचा सक्रिय सहभाग अपेक्षित असून, नागरिकांनी आपल्या जवळील हस्तलिखितांची माहिती अ‍ॅपवर अपलोड करून या राष्ट्रीय उपक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

Comments
Add Comment

Western Railway New Timetable : मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी! १ सप्टेंबरपासून पश्चिम रेल्वेचे नवे वेळापत्रक लागू; जाणून घ्या नवीन बदल

मुंबई : मुंबईकरांच्या दैनंदिन प्रवासाचा अविभाज्य भाग असलेल्या पश्चिम रेल्वेच्या लोकल सेवांमध्ये १ सप्टेंबर

Kalwa Hospital News : कळवा रुग्णालयातील रुग्णाच्या जेवणात झुरळ? संतापाची लाट; कंत्राटदारावर कारवाईची मागणी

ठाणे : ठाण्यातील कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात रुग्णाला देण्यात आलेल्या जेवणात झुरळ आढळल्याचा

Chemical Leak : चेंबूरमध्ये टँकरमधून बेन्झीनची गळती; म्हैसूर कॉलनी परिसरात भीतीचे वातावरण

मुंबई : चेंबूरच्या म्हैसूर कॉलनी परिसरात उभ्या असलेल्या टँकरमधून बेन्झीन केमिकलची गळती झाल्याने खळबळ उडाली.

Mumbai CNG Price : सीएनजी आणि पीएनजी महागला, नवे दर १ सप्टेंबरपासून लागू

मुंबई : महानगर गॅस लिमिटेडने (एमजीएल) सीएनजीच्या दरात प्रति किलो २ रुपयांची वाढ जाहीर केली आहे. ही दरवाढ मंगळवार १

Anna Hazare : अण्णा हजारेंची प्रकृती खालावली, मुंबईच्या बॉम्बे हॉस्पिटलमध्ये दाखल

मुंबई : ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना प्रकृती खालावल्यामुळे मुंबईतील बॉम्बे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात

Central Railway : मध्य रेल्वे २६२ गणपती विशेष गाड्यांची सेवा पुरवणार

मुंबई : मध्य रेल्वेने आगामी गणपती उत्सवाच्या काळात प्रवाशांची ये-जा सुलभ करण्यासाठी आणि गर्दीचे नियोजन