Jannat Zubair Attack: अभिनेत्री जन्नत झुबैरसह भाऊ आयानवर हल्ला, दोघे जखमी; चाहत्यांना धक्का

मुंबई: टीव्ही अभिनेत्री आणि सोशल मीडिया स्टार जन्नत झुबैर रहमानी आणि तिचा भाऊ अयान झुबैर रहमानीवर हल्ला झाल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळं मनोरंजन विश्वात एकच खळबळ उडाली आहे. दोघे भाऊ-बहीण त्यांच्या कारने कुठेतरी जात होते. तेव्हा पनवेल जवळ असलेल्या हायवेवर काही लोकांनी त्यांचा पाठलाग केला आणि त्यांच्यावर मारहाण केली. हल्लेखोरांनी त्यांना अडवलं आणि धमकावल्याचं समजतं आहे. यामुळे दोघेही जखमी झाले. हा दोघांसाठी खूप भयानक अनुभव होता. दोघे भाऊ बहिण मोठ्या धक्क्यात आहेत.


जन्नत झुबैरच्या टीमने याप्रकरणी एक अधिकृत माहिती शेअर केली आहे. इन्स्टाग्रामवर केलेल्या पोस्टमध्ये म्हटलंय की, जन्नत आणि अयानला खूप गंभीर परिस्थितीला सामोरं जावं लागलं. त्यांचा पाठलाग करून त्यांना मारहाण करण्यात आली. सध्या दोघेही सुरक्षित आहेत. चाहत्यांनी अफवांवर विश्वास ठेऊ नये. पुढील अधिकृत माहितीची वाट पाहा.





पोलिसांकडून तपास सुरु


याप्रकरणाची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी तपास सुरु केला आहे. हल्लेखोर कोण होते, हे अद्यापही स्पष्ट झालेलं नाही. पोलीस जवळपासचे सीसीटीव्ही फुटेज आणि अन्य पुरावांच्या आधारावर तपास करत आहेत.



कोण आहे जन्नत झुबैर?


जन्नत झुबैर रहमानी एक टीव्ही स्टार आहे. इन्स्टाग्रामवर तिचे लाखो फॉलोअर्स आहेत. तिने तिच्या करिअरची सुरुवात चाईल्ड आर्टिस्ट टीव्ही शो फुलवाच्या माध्यमातून केली होती. त्यानंतर ती 'तू आशिकी' सारख्या लोकप्रिय शो मधून प्रकाशझोतात आली. तिने अनेक म्यूझिक व्हिडीओ आणि रिअॅलिटी शो मध्ये काम केलं आहे.

Comments
Add Comment

Devendra Fadnavis : सुट्या खाद्य तेलाच्या विक्रीस वर्षभराची मुदतवाढ; मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत निर्णय

पारंपरिक व्यावसायिकांच्या अडचणी दूर करण्यासाठी समिती स्थापन करणार मुंबई : अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए)

Ashish Shelar : दहिसर 'ट्रान्सपोर्ट हब'च्या कामादरम्यान 'ब्लास्टिंग' नियमांचे उल्लंघन झाल्यास कारवाई करा!

- पालकमंत्री आशिष शेलार यांचे निर्देश; बाधित इमारतींचे स्ट्रक्चरल ऑडिट, खनिज वाहतुकीची चौकशी करावी मुंबई : दहिसर

Devendra Fadnavis : मंत्री नितेश राणे, संग्राम जगताप, महेश लांडगे हे हिंदू नायक, त्यांनी पुढेही हिंदुत्वासाठीच काम केले पाहिजे; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कौतुकोद्गार

मुंबई : राज्याचे कॅबिनेट मंत्री नितेश राणे, आमदार संग्राम जगताप आणि महेश लांडगे हे तिघेही हिंदू नायक असून

AndheriNews : वीरा देसाई रोड, जे.पी, रोड, आझाद नगरमधील आता तुंबणार पाण्यातून होणार सुटका

मोगरा नाल्यातील प्रवाह आता वळवणार मुंबई (विशेष प्रतिनिधी) अंधेरी पश्चिम येथील वीरा देसाई रोड, जे.पी.रोड आणि आझाद

BMC : मोठ्या मंडळांसाठी समन्वय अधिकारी नेमा; समन्वय समितीची महापालिकेकडे मागणी!

मुंबई (विशेष प्रतिनिधी) मुंबईत मोठ्याप्रमाणात भाविक दर्शनासाठी येतात, अशा मंडळांसाठी महापालिकेने समन्वय

Malad Accident : "तिला मला शेवटचं पाहायचं आहे..."; जखमी पतीने व्हीलचेअरवरून घेतले पत्नीचे अखेरचे दर्शन

मुंबई : मालाडमध्ये रविवारी रात्री झालेल्या भीषण रस्ता अपघाताने एका कुटुंबावर मोठा आघात केला. या अपघातात ३४