Mumbai: मुंबईत पाणीबाणी, एप्रिल-मेमध्ये परिस्थिती गंभीर होण्याची भीती

मुंबई: ऐन उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच मुंबईच्या पाणीपुरवठ्यावर मोठे संकट उभे राहिले आहे. १५ मार्च २०२६ पर्यंतच्या अधिकृत आकडेवारीनुसार, मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही धरणांमधील पाणीसाठा निम्यापेक्षा कमी झाला आहे. वाढत्या उष्णतेमुळे पाण्याचे बाष्पीभवन वेगाने होत असून, पालिकेच्या पाणीपुरवठा विभागावर याचा मोठा ताण येत आहे.



पाणीसाठा कमी होण्याची मुख्य कारणे


मुंबईत मागील काही दिवसांपासून तापमानाचा पारा ३५°C च्या वर गेल्याने धरणांमधील साठा वेगाने घटत आहे. कडक उन्हामुळे तलावांमधील पाण्याचे बाष्पीभवन वाढले आहे. मार्च महिन्यात उष्णता वाढल्याने नागरिकांकडून पाण्याचा वापरही मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. यंदाचा पाणीसाठा गेल्या वर्षीच्या तुलनेत लक्षणीयरीत्या कमी असल्याने पालिका प्रशासन चिंतेत आहे.



धरणांमधील सद्यस्थिती


भातसा- ३,३९,५५६
अप्पर वैतरणा- १,२५,४५७
मध्य वैतरणा - ८१,२६८
तानसा - ६०,६८३
मोडक सागर- ४९,३८८
विहार- १७,४८९
तुळशी- ४०३८



पालिकेचे पाणी जपून वापरण्याचे आवाहन


महापालिकेने अद्याप अधिकृत पाणी कपात जाहीर केली नसली तरी, एप्रिल आणि मे महिन्यात परिस्थिती अधिक बिकट होऊ शकते.


पाणी जपून वापरा


गाडी धुण्यासाठी किंवा फरशी पुसण्यासाठी पाण्याचा अपव्यय टाळावा.


गळती रोखा


घरात किंवा परिसरात कुठेही नळ गळती असल्यास त्वरित दुरुस्त करावा.


पाणी फेकू नका


शिळे पाणी फेकून देण्याऐवजी त्याचा झाडांसाठी किंवा इतर कामांसाठी वापर करावा.

Comments
Add Comment

MahaIT : महाआयटीच्या प्रणाली अद्ययावतीकरणामुळे शासकीय ऑनलाइन सेवा १६ ते २० ऑक्टोबरदरम्यान तात्पुरत्या बंद

मुंबई : महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ मर्यादित (महाआयटी) मार्फत विकसित आणि देखरेख करण्यात येणाऱ्या राज्य

महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा २०२६ जाहीर; हाँगकाँग, उत्तराखंड आणि सांगलीच्या मंडळांची बाजी!

मुंबई : राज्यात उत्साहात पार पडलेल्या ‘म

Ram Mansion Purchase : सिद्धिविनायक मंदिराजवळीम राम मेन्शनच्या खरेदी व्यवहाराला परवानगी

मुंबई : प्रभादेवी येथील श्री सिद्धिविनायक गणपती मंदिराला लागून असलेल्या राम मेन्शन सहकारी गृहनिर्माण

मतदार यादीत नाव नोंदणीसाठी राज्यात विशेष मोहीम; 17, 18 आणि 24, 25 ऑक्टोबर रोजी मतदान केंद्रांवर शिबिरे

मुंबई : राज्यातील एकाही पात्र नागरिकाचे नाव मतदार यादीत समाविष्ट होण्यापासून वंचित राहू नये, या महत्त्वाच्या

BMC News : वरळीतील सांडपाण्यावर बायोगॅसपासून वीज निर्मिती; प्रकल्प काम 63 टक्के पूर्ण

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई मलनिस्सारण प्रकल्पांतर्गत वरळी येथे उभारण्यात येत असलेल्या 500 दशलक्ष लीटर

मुंबई उपनगरातील तीन नवीन कोळीवाड्यांचे होणार सीमांकन; राज्य सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय

मुंबई शहर व उपनगरातील कोळीवाड्यांचे सीमांकन अधिक स्पष्ट व सर्वसमावेशक करण्याच्या दृष्टीने फडणवीस सरकारने