नंदूरबार,छत्रपती संभाजीनगरमधील गैरव्यवहारासाठी 'एसआयटी स्थापन; महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची विधान परिषदेत घोषणा

​मुंबई: नंदूरबार जिल्ह्यातील नवापूर येथील भूसंपादन गैरव्यवहार आणि छत्रपती संभाजीनगरमधील ब्रिजवाडी येथील ५४ एकर जमीन घोटाळ्याची सखोल चौकशी करण्यासाठी विशेष तपास पथके (एसआयटी) स्थापन करण्यात आली आहेत. या प्रकरणांचा सविस्तर अहवाल पुढील अधिवेशनात सभागृहाच्या पटलावर ठेवला जाईल, अशी घोषणा महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज विधान परिषदेत केली.


महसूलमंत्री बावनकुळे म्हणाले, नंदूरबार जिल्ह्यातील मौजे गंगापूर (ता. नवापूर) येथील भूसंपादनात झालेल्या अनियमिततेबाबत सभागृहात दिलेले आश्वासन सरकारने पूर्ण केले आहे. १० मार्च २०२६ रोजीच्या निर्गमित शासन निर्णयानुसार, नाशिक विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली ५ सदस्यीय 'एसआयटी' स्थापन करण्यात आली आहे. या प्रकरणात आढळणाऱ्या फौजदारी गुन्ह्यांची आणि प्रशासकीय चुकांची ही समिती सखोल चौकशी करेल.



​ छत्रपती संभाजीनगरमध्ये 'ओपन एसआयटी'



​छत्रपती संभाजीनगर शहरातील ब्रिजवाडी (गट नं. ३०) मधील ५४ एकर ३१ गुंठे जमिनीच्या गैरव्यवहारासह शहरातील इतर तक्रारींच्या तपासासाठी उच्चस्तरीय समिती नेमण्यात आली आहे. विभागीय आयुक्त, पोलीस महानिरीक्षक (IG), जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग (ACB) आणि भूमी अभिलेख उपसंचाल अशा ६ वरिष्ठ अधिकाऱ्यांचा यात समावेश आहे. ब्रिजवाडी प्रकरणाचा तपास एका महिन्यात पूर्ण करण्याचे आदेश महसूलमंत्र्यांनी दिले आहेत. तक्रारींसाठी 'ओपन विंडो' ही एक 'ओपन एसआयटी' असून, संभाजीनगरमधील इतर जमीन गैरव्यवहारांबाबत कोणताही नागरिक एक महिन्याच्या आत तक्रार दाखल करू शकेल. या अर्जांची सविस्तर चौकशी करून समिती आपला निष्कर्ष सादर करेल.


​जमीन गैरव्यवहारात कितीही मोठा अधिकारी किंवा व्यक्ती दोषी आढळली, तरी त्यांच्यावर कठोर फौजदारी कारवाई केली जाईल, असेही महसूलमंत्री बावनकुळे यांनी स्पष्ट केले.

Comments
Add Comment

शाळा प्रवेशासाठी बालकांचे किमान वय निश्चित; २०२७-२८ पासून टप्प्याटप्प्याने लागू होणार नवीन निकष

मुंबई : राज्य शासनाने पूर्व-प्राथमिक ते

समान नागरी संहितेबाबत नागरिकांकडून १५ नोव्हेंबरपर्यंत मागवल्या सूचना; विशेष पोर्टलचा शुभारंभ

महाराष्ट्रात समान नागरी संहिता (UCC) लागू करण्याच्या अनुषंगाने राज्य शासनाने नेमलेल्या समितीने नागरिकांकडून

Maharashtra Weather Update: येत्या पाच दिवसांत हवामानात होणार बदल! उकाड्यापासून होणार सुटका; पहा कोणत्या जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता?

भारतीय हवामान विभागाने (IMD) गुरुवारी जारी केलेल्या हवामान अंदाजानुसार, राज्यातील कोकण विभागात काही ठिकाणी उष्ण

Ban On Firecrackers: दिवाळीत सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्यास बंदी; मुंबई हायकोर्टाचा आदेश

सणासुदीच्या पार्श्वभूमीवर मुंबई उच्च न्यायालयाने गुरुवारी १५ ऑक्टोबर २०२६ रोजी सार्वजनिक ठिकाणी आणि

महाराष्ट्रात डिजिटल शासनसेवांना मिळणार नवी गती ! डिजिटल शासनसेवा प्लॅटफॉर्म तात्काळ सुरु करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

मुंबई : राज्यातील नागरिकांना शासकीय सेवा अधिक जलद, सुलभ आणि पारदर्शक पद्धतीने ऑनलाइन उपलब्ध करून देण्यासाठी

Jalgaon : जळगावमध्ये भीषण अपघात ! ट्रकच्या धडकेत एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू

Jalgaon : जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. मालदाभाडी गावाजवळ ट्रक आणि दुचाकी