ड्रग्ज तस्करी रोखण्यासाठी कारवाईची वयोमर्यादा १८ वरून १६ वर्षे करणार

मुंबई : अमली पदार्थांच्या तस्करीसाठी मोठ्या प्रमाणात अल्पवयीन मुलांचा उपयोग केला जात आहे. त्यामुळे याला पायबंद घालण्यासाठी कारवाईची वयोमर्यादा १८ वरून १६ वर्षापर्यंत करण्यासाठी केंद्रशासनाकडे विनंती करण्यात येणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी विधानसभेत दिली. भाजपचे आमदार प्रवीण दटके यांनी नागपूरमध्ये वाढत्या अमली पदार्थांच्या तस्करीविषयी तारांकित प्रश्न उपस्थित केला होता. त्यावर देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिले.


या वेळी देवेंद्र फडणवीस म्हणाले, ‘‘ वर्ष २०२५-२६ मध्ये अमली पदार्थ तस्करीच्या १० प्रकरणांमध्ये मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आली. नागपूरमध्ये मागील ११ महिन्यांत ‘ऑपरेशन थंडर’ अंतर्गत ९०७ कारवाया करण्यात आल्या. त्यामध्ये १ हजार २५४ किलो अमली पदार्थ पकडण्यात आले. त्यांचे मूल्य १० कोटी रुपये होते. सध्या छोट्या जागेतही अमली पदार्थ बनवण्याचे प्रकार चालत आहेत. अमली पदार्थांच्या तस्करीचे धागेदोरे अन्य राज्यांतही आहेत. अन्य राज्यांत जाऊनही आपण कारवाया केल्या आहेत. अमली पदार्थांच्या तस्करीमध्ये पोलिसांचा थेट सहभाग आढळल्यास पोलिसांवर थेट बडतर्फीची कारवाई केली जाईल’’, असेही त्यांनी सांगितले.

Comments
Add Comment

Western Railway New Timetable : मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी! १ सप्टेंबरपासून पश्चिम रेल्वेचे नवे वेळापत्रक लागू; जाणून घ्या नवीन बदल

मुंबई : मुंबईकरांच्या दैनंदिन प्रवासाचा अविभाज्य भाग असलेल्या पश्चिम रेल्वेच्या लोकल सेवांमध्ये १ सप्टेंबर

Kalwa Hospital News : कळवा रुग्णालयातील रुग्णाच्या जेवणात झुरळ? संतापाची लाट; कंत्राटदारावर कारवाईची मागणी

ठाणे : ठाण्यातील कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात रुग्णाला देण्यात आलेल्या जेवणात झुरळ आढळल्याचा

Chemical Leak : चेंबूरमध्ये टँकरमधून बेन्झीनची गळती; म्हैसूर कॉलनी परिसरात भीतीचे वातावरण

मुंबई : चेंबूरच्या म्हैसूर कॉलनी परिसरात उभ्या असलेल्या टँकरमधून बेन्झीन केमिकलची गळती झाल्याने खळबळ उडाली.

Mumbai CNG Price : सीएनजी आणि पीएनजी महागला, नवे दर १ सप्टेंबरपासून लागू

मुंबई : महानगर गॅस लिमिटेडने (एमजीएल) सीएनजीच्या दरात प्रति किलो २ रुपयांची वाढ जाहीर केली आहे. ही दरवाढ मंगळवार १

Anna Hazare : अण्णा हजारेंची प्रकृती खालावली, मुंबईच्या बॉम्बे हॉस्पिटलमध्ये दाखल

मुंबई : ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना प्रकृती खालावल्यामुळे मुंबईतील बॉम्बे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात

Central Railway : मध्य रेल्वे २६२ गणपती विशेष गाड्यांची सेवा पुरवणार

मुंबई : मध्य रेल्वेने आगामी गणपती उत्सवाच्या काळात प्रवाशांची ये-जा सुलभ करण्यासाठी आणि गर्दीचे नियोजन