मुंबईतील टँकर माफियांची लॉबी नष्ट करा; महापालिका सभागृहात सर्वच नगरसेवकांची एकमुखी मागणी

मुंबई: मुंबईत सध्या पाण्याची काही भागांमध्ये समस्या निर्माण झाली असून ही टंचाई फक्त आणि फक्त टँकर माफियांसाठी होत असल्याचा आरोप नगरसेवकांनी करत मुंबईतील अशाप्रकारची टँकर माफिया लॉबीच नष्ट करण्यात यावी तसेच त्यांच्याशी संगनमत करणाऱ्या अधिकाऱ्यांना निलंबित करण्याची मागणी महापालिका सभागृहात केली. यावर प्रशासनाच्यावतीने टँकरद्वारे भरण्यात येणाऱ्या पाण्याबाबतच्या कार्यध्दतीत सुधारणा करण्यासाठी धोरण बनवण्यात येणार असल्याचे सांगितले. मात्र प्रशासनाच्या या उत्तरामुळे समाधान न झाल्यामुळे महापौरांनी अपेक्षित उत्तर देण्यासाठी योग्यप्रकारे आढावा कार्यवाही केली जावी अशाप्रकारचे निर्देश प्रशासनाला दिले.


शिवसेना नगरसेवक रितेश कमलेश राय यांनी महापालिका सभागृहात ६६ ब अन्वये चर्चा उपस्थित करत मुंबईतील टँकर माफियांवर कारवाई करण्याची मागणी केली. के दक्षिण विभागात सध्या मोठ्याप्रमाणात पाणी समस्येला तोंड द्यावे लागत आहे. मात्र पाणी वितरणातील असमानता आणि पाण्याची चोरी ही मोठी समस्या आहे. त्यामुळे अपुऱ्या पाणी समस्येमुळे नागरिकांना खासगी टँकरशिवाय पर्याय नसल्याचे सांगत या टँकरसाठी जास्त पैसे मोजावे लागत आहे. त्यामुळे ही पाणी समस्या केवळ टँकर माफियांसाठी निर्माण केली जाते का असा सवाल त्यांनी उपस्थित केला. याला एआयएमआयएमचे विजय उबाळे यांनी झोपडपट्टी आणि टोलेजंग इमारतींमध्ये पाणी पुरवठ्यात तफावत का? तर प्रविण छेडा यांनी मुंबईतील बोअरवेलची गणना केली जावी अशी मागणी केली.


स्वप्ना म्हात्रे यांनी मुंबईत टोलेजंग इमारती उभारले जात आहेत, त्यांच्यासाठी पाण्याचे नियोजन केले जात आहे का असा सवाल केला. तर विशाखा राऊत यांनी ७ मल जल प्रक्रिया केंद्रातील प्रक्रिया केलेले पाणी समुद्रात सोडायचे आणि त्याच समुद्राचे पाणी गोडे करायचे हा कुठला प्रकार असा सवाल उपस्थित केला. अश्रफ आझमी यांनी गळतीतून वाया जाणारे पाणी वाचवण्यासाठी गळती शोध यंत्रणा अधिक प्रभावीपणे राबवण्याची सूचना केली. तर भाजपच्या प्रिती सातम यांनी महापालिकेच्या जलभरणा केंद्रावर एका परवानगीवर दहा ते बारा टँकर भरले जात असल्याचा आरोप करत अशाप्रकारे अशाप्रकारे भरले जाणारे खासगी टँकरना भरणा करण्यास बंदी घालावी, जेणेकरून पाणी चोरी मोठ्याप्रमाणात कमी होईल अशी मागणी केली केली. उबाठाचे सचिन पडवळ यांनी महापालिकेच्या जलभरणा केंद्रांवर गृहनिर्माण सोसायट्यांच्या बोगस लेटरहेडच्या आधारे महापालिकेच्या जलभरणा केंद्रावरुन टँकर भरुन जनतेला अवाच्या सव्वा दराने पाणी विकले जाते. तर भाजपचे प्रकाश दरेकर यांनी पाणी समस्या आणि टँकर माफिया हा चर्चेचा नाही तर चिंतेचा विषय असल्याचे सांगत मुंबईच्या प्रवेशद्वाराजवळ जर पाणी समस्या असेल तर हे मुंबईचे दुर्भाग्य आहे. तर सभागृहनेते गणेश खणकर यांनी टँकर माफिया ही मोठी समस्या असून ही माफियागिरी आता बंद करायलाच हवी. आज २४ तास टँकरने पाणी पुरवठा होता आणि अशा टँकर माफियांना मदत करणाऱ्या महापालिकेच्या अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात यावे अशी मागणी केली. तसेच यापुढे एकही अनधिकृत जलजोडणी देण्यात यावी अशीही मागणी केली. यावेळी झालेल्या चर्चेत शिवसेनेच्या यामिनी जाधव , धर्मेश गिरी, वकार खाना, संध्या दोषी, रोशन शेख, दिशा यादव, योगिता कदम, चिंतामणी निवाते आदी सदस्यांनी भाग घेतला होता


यावेळी प्रशासनाच्यावतीने अतिरिक्त आयुक्त अभिजित बांगर यांनी पाण्याचे स्त्रोत वाढवणे आणि वितरण व्यवस्था सुधारणे यासाठी प्रशासन प्रयत्न करेल असे सांगत जलवाहिनी जुन्या झाल्यामुळे त्यातून होणारी गळती ही नाकारण्यासारखी नसल्याचेही सांगितले. तसेच गळती शोधण्यासाठी नवीन तंत्रज्ञानाचा अवलंब करण्याचा प्रयत्न केला जात आहे.मात्र, टँकर माफिया यांची सध्याची कार्यपध्दतीत बदल करणे आवश्यक आहे. त्यामुळे सदस्यांच्या भावना लक्षात घेवून त्याप्रमाणे धोरण बनवले जाईल असे सांगितले. यावर महापौर रितू तावडे यांनी प्रशासनाच्या उत्तराशी समाधानी नसून सदस्यांना अपेक्षित उत्तर देण्याच्यादृष्टीकोनातून योग्यती कार्यवाही केली जावी असे निर्देश प्रशासनाला दिले.

Comments
Add Comment

Mumbai News : मुंबईतील नारळाच्या झाडांपासून धोका

संरक्षण जाळ्या बसविण्याची भाजप नगरसेवक अ‍ॅड मकरंद नार्वेकर मागणी मुंबई ( विशेष प्रतिनिधी) : रस्त्यालगत असलेल्या

Fire Officer Uniform Cost : अग्निशमन अधिकारी-कर्मचाऱ्यांसाठी ७० हजारांचा गणवेश

पी पी पी गणवेशकरता तब्बल १६ कोटीचा खर्च! मुंबई (विशेष प्रतिनिधी): मुंबईतील आगींसह विविध आपत्कालीन परिस्थितीत जीव

Mumbai Water Quality : मुंबईच्या पाणीपुरवठ्याची गुणवत्ता सुधारतेय!

- दूषित पाण्याचे प्रमाण ०.४६ वरून ०.२८ टक्क्यांवर; तीन वर्षांच्या आकडेवारीत घट - एच-पूर्व विभागात सर्वाधिक ३.११

Mumbai News : ईद-ए-मिलाद मिरवणुकीतील संघर्षानंतर प्रक्षोभक व्हिडिओ व्हायरल; काळाचौकी पोलिसांकडून दोन गुन्हे दाखल

मुंबई : मुंबईतील लालबाग-परेल परिसरात 26 ऑगस्ट रोजी ईद-ए-मिलाद-उन-नबीच्या मिरवणुकीदरम्यान झालेल्या संघर्षानंतर

Petrol Diesel Price : महिन्याचा शेवट आणि खिशावर ताण? पेट्रोल भरण्याआधी पाहा तुमच्या शहरातील आजचे नवीन दर!

मुंबई : सरकारी तेल कंपन्यांनी देशभरातील पेट्रोल आणि डिझेलचे आजचे दर जाहीर केले आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारातील

Bandra Hit And Run : भरधाव कारची 8 वर्षीय मुलाला धडक; उपचारांपूर्वीच मृत्यू, महिला चालकाला अटक

मुंबई : मुंबईतील वांद्रे पश्चिम परिसरात झालेल्या भीषण अपघातात 8 वर्षीय अंश गुप्ता या चिमुकल्याचा मृत्यू झाला.