मुनगंटीवारांच्या पुढाकारामुळे मजूर व महिला सहकारी संस्थांना मिळणार बळ

मुंबई : आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकारामुळे राज्यातील मजूर सहकारी संस्था सोबतच प्राधान्याने महिला सहकारी संस्थांना शासनाच्या विविध कामांमध्ये अधिकाधिक संधी उपलब्ध करून देण्यासाठी आ. सुधीर मुनगंटीवार यांनी पुढाकार घेत मंत्रालयात महत्त्वपूर्ण बैठक आयोजित केली. सहकार राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत सहकार क्षेत्र अधिक सक्षम करणे, स्थानिक पातळीवर रोजगारनिर्मिती वाढवणे तसेच कामांचे पारदर्शक व न्याय्य वाटप सुनिश्चित करण्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. यावेळी या विषयाचा सखोल अभ्यास करून व्यवहार्य धोरण निश्चित करण्यासाठी ५ सदस्यीय समिती गठित करण्याचा निर्णय घेण्यात आला. या बैठकीस सहकार विभागाचे सचिव, उपसचिव नितीन गायकवाड, अप्पर निबंधक डॉ. पी. एल. खंडागळे, जिल्हा उपनिबंधक तसेच संबंधित विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. दूरदृश्य प्रणालीद्वारे सहकार आयुक्त दीपक तावरे यांनीही सहभाग नोंदवला.


बैठकीत आ. सुधीर मुनगंटीवार यांनी मजूर सहकारी संस्था सोबतच प्राधान्याने महिला सहकारी संस्थांना शासनाच्या विविध कामांमध्ये संधी देण्याची ठाम भूमिका मांडली. या दोन्ही संस्थांना अधिक कामे मिळाल्यास त्या आर्थिकदृष्ट्या सक्षम होतील आणि ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर स्थानिक रोजगारनिर्मिती होईल, असे त्यांनी अधोरेखित केले. तसेच सहकाराच्या माध्यमातून महिला सक्षमीकरणाला चालना देण्यासाठी महिला सहकारी संस्थांना प्राधान्य देणे अत्यंत आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.


आ. मुनगंटीवार यांच्या या भूमिकेला प्रतिसाद देत सहकार राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी मजूर सहकारी संस्था सोबतच यापुढे प्राधान्याने महिला सहकारी संस्थांना देण्याबाबत शासन सकारात्मक असल्याची ग्वाही दिली. राज्यात विविध यंत्रणांमार्फत १० लाख रुपयांपर्यंतची कामे, ई-निविदा पद्धतीद्वारे मिळणारी कामे तसेच जिल्हा परिषद स्तरावरील कामे मजूर सहकारी संस्थांना दिली जातात. या प्रक्रियेत अधिक पारदर्शकता आणि समन्वय आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.


यावेळी आ. मुनगंटीवार यांनी कामांचे वाटप अधिक पारदर्शक करण्यासाठी प्रभावी यंत्रणा उभारण्याची गरज अधोरेखित केली. त्यानुसार ई-निविदा पद्धतीद्वारे व जिल्हा परिषदेमार्फत मजूर संस्थांना देण्यात आलेल्या कामांची माहिती जिल्हा उपनिबंधक स्तरावर संकलित करण्याचे निर्देश देण्यात आले. तसेच सर्व कामांची ऑनलाइन नोंद अनिवार्य करण्यासाठी स्वतंत्र पोर्टल विकसित करण्याबाबतही सूचना करण्यात आल्या.


सदर विषयाचा सखोल अभ्यास करून व्यवहार्य धोरण निश्चित करण्यासाठी आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या सूचनेनुसार ५ सदस्यीय समिती गठित करण्याचा निर्णय घेण्यात आला. यावर सहकार राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी तात्काळ सकारात्मक प्रतिसाद देत समिती स्थापन करण्याचे निर्देश दिले. समितीने लवकरात लवकर अहवाल सादर करावा आणि त्यानुसार पुढील कार्यवाही करण्यात येईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.

Comments
Add Comment

MahaIT : महाआयटीच्या प्रणाली अद्ययावतीकरणामुळे शासकीय ऑनलाइन सेवा १६ ते २० ऑक्टोबरदरम्यान तात्पुरत्या बंद

मुंबई : महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ मर्यादित (महाआयटी) मार्फत विकसित आणि देखरेख करण्यात येणाऱ्या राज्य

महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा २०२६ जाहीर; हाँगकाँग, उत्तराखंड आणि सांगलीच्या मंडळांची बाजी!

मुंबई : राज्यात उत्साहात पार पडलेल्या ‘म

Ram Mansion Purchase : सिद्धिविनायक मंदिराजवळीम राम मेन्शनच्या खरेदी व्यवहाराला परवानगी

मुंबई : प्रभादेवी येथील श्री सिद्धिविनायक गणपती मंदिराला लागून असलेल्या राम मेन्शन सहकारी गृहनिर्माण

मतदार यादीत नाव नोंदणीसाठी राज्यात विशेष मोहीम; 17, 18 आणि 24, 25 ऑक्टोबर रोजी मतदान केंद्रांवर शिबिरे

मुंबई : राज्यातील एकाही पात्र नागरिकाचे नाव मतदार यादीत समाविष्ट होण्यापासून वंचित राहू नये, या महत्त्वाच्या

BMC News : वरळीतील सांडपाण्यावर बायोगॅसपासून वीज निर्मिती; प्रकल्प काम 63 टक्के पूर्ण

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई मलनिस्सारण प्रकल्पांतर्गत वरळी येथे उभारण्यात येत असलेल्या 500 दशलक्ष लीटर

मुंबई उपनगरातील तीन नवीन कोळीवाड्यांचे होणार सीमांकन; राज्य सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय

मुंबई शहर व उपनगरातील कोळीवाड्यांचे सीमांकन अधिक स्पष्ट व सर्वसमावेशक करण्याच्या दृष्टीने फडणवीस सरकारने