मुंबईतील जैववैद्यकीय कचरा व्यवस्थापनात त्रुटी ठेवणार नाही; मंत्री पंकजा मुंडेंनी विधान परिषदेत मांडली ठोस भूमिका

मुंबई: बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या केईएम (KEM), नायर आणि कूपर या प्रमुख रुग्णालयांमधील जैववैद्यकीय कचऱ्याची विल्हेवाट लावण्याबाबत आज विधान परिषदेत आमदार मिलिंद नार्वेकर यांनी उपस्थित केलेल्या तारांकित प्रश्नाला उत्तर देताना मंत्री पंकजा मुंडे यांनी प्रशासकीय वस्तुस्थिती स्पष्ट करत सरकार या विषयावर गंभीर असल्याचे सांगितले.


विधान परिषदेच्या कामकाजादरम्यान आमदार मिलिंद नार्वेकर यांनी मुंबईतील पालिकेच्या रुग्णालयांमध्ये निर्माण होणाऱ्या जैववैद्यकीय कचऱ्याचा मुद्दा उचलून धरला. रुग्णालयांमध्ये मोठ्या प्रमाणावर कचरा साचत असून त्याची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावली जात नसल्याने रुग्ण आणि सामान्य नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण होत असल्याकडे नार्वेकर यांनी लक्ष वेधले. विशेषतः केईएम, नायर आणि कूपर यांसारख्या मोठ्या रुग्णालयांमधील विदारक परिस्थिती त्यांनी सभागृहात मांडली.


या प्रश्नाला उत्तर देताना मंत्री पंकजा मुंडे यांनी वस्तुस्थिती मांडली. त्यांनी स्पष्ट केले की, रुग्णालयातील कचरा व्यवस्थापनासाठी निविदा प्रक्रिया आणि संबंधित कंत्राटदारांच्या कामावर सरकारचे बारीक लक्ष आहे. "कचऱ्याची विल्हेवाट लावण्याची प्रक्रिया अधिक गतिमान करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यावर भर दिला जात आहे. ज्या ठिकाणी त्रुटी आढळतील, तिथे कठोर कारवाई केली जाईल," असे आश्वासन पंकजा मुंडे यांनी दिले. तसेच, पालिका प्रशासनाला या संदर्भात कडक निर्देश देण्यात आल्याचेही त्यांनी नमूद केले.

Comments
Add Comment

Jaykumar Rawal : अत्याधुनिक सुविधा आणि सुरक्षिततेला प्राधान्य देत मुंबई विमानतळाजवळ ‘नंदगिरी राज्य अतिथीगृह’ उभारणार; मंत्री जयकुमार रावल यांची माहिती

मुंबई : विविध राज्यांतून मुंबईत येणाऱ्या मान्यवर अतिथींच्या निवासासोबतच ट्रान्झिट प्रवासादरम्यान

Nitesh Rane : मालेगावमध्ये आधुनिक मासळी बाजार उभारणीला गती

- सांगलीतील प्रकल्पाचे काम वेळेत पूर्ण करण्याचे मंत्री नितेश राणे यांचे निर्देश मुंबई : वाशिम जिल्ह्यातील

Nitesh Rane : सिंधुदुर्गात कुक्कुटपालनाला चालना देण्यासाठी प्रभावी कार्यवाहीचे निर्देश; मंत्री नितेश राणे यांची माहिती

कुक्कुटपालनाला 'कृषी समकक्ष' दर्जा दिल्याने युवकांसाठी रोजगाराच्या नवीन संधी मुंबई : सिंधुदुर्ग जिल्ह्यात

Mumbai Trees Damaged by Cables : टेलिकॉम कंपन्यांच्या केबल्सचा झाडांना विळखा

तातडीने उपाययोजना राबवून कारवाई करण्याची वृक्ष प्राधिकरणाच्या बैठकीत मागणी मुंबई : मुंबईत सध्या इंटरनेट,

Devendra Fadnavis : सुट्या खाद्य तेलाच्या विक्रीस वर्षभराची मुदतवाढ; मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत निर्णय

पारंपरिक व्यावसायिकांच्या अडचणी दूर करण्यासाठी समिती स्थापन करणार मुंबई : अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए)

Ashish Shelar : दहिसर 'ट्रान्सपोर्ट हब'च्या कामादरम्यान 'ब्लास्टिंग' नियमांचे उल्लंघन झाल्यास कारवाई करा!

- पालकमंत्री आशिष शेलार यांचे निर्देश; बाधित इमारतींचे स्ट्रक्चरल ऑडिट, खनिज वाहतुकीची चौकशी करावी मुंबई : दहिसर