शिर्डी अ‍ॅसिड हल्ल्याचे विधिमंडळात तीव्र पडसाद - आरोपीला कठोरातील कठोर शासन करणार; पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांची ग्वाही

मुंबई : शिर्डी जवळील लोणी येथे १३ वर्षीय शालेय विद्यार्थिनीवर झालेल्या अ‍ॅसिड हल्ल्याच्या घटनेने राज्य हादरले असून, याचे तीव्र पडसाद बुधवारी विधिमंडळात उमटले. या संतापजनक कृत्यातील आरोपीला कोणत्याही परिस्थितीत सोडले जाणार नाही, त्याला कठोरातील कठोर शासन केले जाईल, अशी ग्वाही जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी दिली आहे. दरम्यान, पीडित मुलीला 'मनोधैर्य' योजनेतून तातडीने आर्थिक मदत देण्याचे निर्देशही प्रशासनाला देण्यात आले आहेत.


लोणी परिसरात शाळेत जाणाऱ्या चिमुकलीवर भररस्त्यात अ‍ॅसिड फेकून आरोपी पसार झाला. या घटनेनंतर परिसरात दहशतीचे वातावरण असून राजकीय वर्तुळातूनही संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. या प्रकरणावर भाष्य करताना अहिल्यानगरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील म्हणाले की, "ही घटना अत्यंत निंदनीय आहे. ग्रामीण भाग असल्याने घटनास्थळी सीसीटीव्ही कॅमेरे नाहीत, मात्र प्राथमिक अंदाजानुसार आरोपी स्थानिकच असण्याची शक्यता आहे. पोलिसांचा तपास जलद गतीने सुरू असून आज सायंकाळपर्यंत आरोपीला अटक केली जाईल. अशा गुन्हेगारांवर कठोर कारवाई व्हायलाच हवी, हे माझे वैयक्तिक मत आहे."



पीडितेवर उपचार सुरू


महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी या घटनेवर बारकाईने लक्ष ठेवून असल्याचे सांगितले. "पीडित मुलगी आणि तिचे कुटुंबीय सध्या प्रचंड धक्क्यात आहेत. तिच्यावर लोणी येथे उपचार सुरू असून, तिची प्रकृती स्थिर झाल्यानंतर तिची चौकशी केली जाईल. शासनाच्या 'मनोधैर्य' योजनेतून तिला तात्काळ आर्थिक सहाय्य देण्याबाबतचा प्रस्ताव मागवण्यात आला आहे," असे तटकरे यांनी स्पष्ट केले.

Comments
Add Comment

MahaIT : महाआयटीच्या प्रणाली अद्ययावतीकरणामुळे शासकीय ऑनलाइन सेवा १६ ते २० ऑक्टोबरदरम्यान तात्पुरत्या बंद

मुंबई : महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ मर्यादित (महाआयटी) मार्फत विकसित आणि देखरेख करण्यात येणाऱ्या राज्य

महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा २०२६ जाहीर; हाँगकाँग, उत्तराखंड आणि सांगलीच्या मंडळांची बाजी!

मुंबई : राज्यात उत्साहात पार पडलेल्या ‘म

Ram Mansion Purchase : सिद्धिविनायक मंदिराजवळीम राम मेन्शनच्या खरेदी व्यवहाराला परवानगी

मुंबई : प्रभादेवी येथील श्री सिद्धिविनायक गणपती मंदिराला लागून असलेल्या राम मेन्शन सहकारी गृहनिर्माण

मतदार यादीत नाव नोंदणीसाठी राज्यात विशेष मोहीम; 17, 18 आणि 24, 25 ऑक्टोबर रोजी मतदान केंद्रांवर शिबिरे

मुंबई : राज्यातील एकाही पात्र नागरिकाचे नाव मतदार यादीत समाविष्ट होण्यापासून वंचित राहू नये, या महत्त्वाच्या

BMC News : वरळीतील सांडपाण्यावर बायोगॅसपासून वीज निर्मिती; प्रकल्प काम 63 टक्के पूर्ण

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई मलनिस्सारण प्रकल्पांतर्गत वरळी येथे उभारण्यात येत असलेल्या 500 दशलक्ष लीटर

मुंबई उपनगरातील तीन नवीन कोळीवाड्यांचे होणार सीमांकन; राज्य सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय

मुंबई शहर व उपनगरातील कोळीवाड्यांचे सीमांकन अधिक स्पष्ट व सर्वसमावेशक करण्याच्या दृष्टीने फडणवीस सरकारने