‘तीर्थ विठ्ठल, क्षेत्र विठ्ठल’ कॉफीटेबल बुकचे; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते प्रकाशन

मुंबई : ‘तीर्थ विठ्ठल, क्षेत्र विठ्ठल’ कॉफीटेबल बुकचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते वर्षा निवासस्थानी आज प्रकाशन करण्यात आले. यावेळी ज्येष्ठ साहित्यिका अरुणा ढेरे, ज्येष्ठ गायिका पद्मश्री डॉ.अश्विनी भिडे-देशपांडे, कॉफीटेबल बुकचे निर्माते विनोद पवार, माजी खासदार विनय सहस्त्रबुद्धे, मुख्यमंत्र्यांच्या प्रधान सचिव अश्विनी भिडे तसेच शिष्टमंडळातील सदस्य उपस्थित होते.


मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, अतिशय सुंदर अशा कॉफी टेबल बुकचे प्रकाशन करता आले याबद्दल अतिशय आनंद आहे. महाराष्ट्राचे प्रतिबिंब हे आपल्याला आपल्या वारीमध्ये दिसते, ते पंढरपुरात दिसते, ते विठ्ठलाच्या आराधनेत आपल्याला पाहायला मिळते. इतक्या वेगवेगळ्या कथा, प्रत्येक वारीमध्ये तयार होतात. ते सर्व कॉफी टेबल बुकच्या माध्यमातून आपल्याला अनुभवता येणार आहे.


मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, तीर्थ आणि त्या तीर्थातला जो देव आहे, हे दोन्ही महत्त्वाचे आहेत. त्याची माहिती, इतिहास किंवा त्यातल्या प्रमुख गोष्टी या कॉफी टेबल बुकच्या माध्यमातून मिळाले. माहिती आणि छायाचित्रे यामुळे हे कॉफी टेबल बुक संग्रहणीय झाले आहे. आपली सांस्कृतिक माहिती जर कोणाला द्यायची असेल, तर काय द्यावे तर यामध्ये या पुस्तकाचा समावेश झाला आहे. इन्टॅन्जिबल हेरिटेजमध्ये युनेस्कोला आता ही पंढरीची वारी सादर करण्यात येईल, यासाठी हे कॉफी टेबल बुक महत्त्वाचे ठरेल, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगतिले.

Comments

Ashutosh Badave    March 19, 2026 03:36 AM

हे पुस्तक कोठे मिळेल

Add Comment

मुंबई उपनगरातील तीन नवीन कोळीवाड्यांचे होणार सीमांकन; राज्य सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय

मुंबई शहर व उपनगरातील कोळीवाड्यांचे सीमांकन अधिक स्पष्ट व सर्वसमावेशक करण्याच्या दृष्टीने फडणवीस सरकारने

BMC School News : राज्याचे मुख्यमंत्री तसेच सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त सर न्यायाधीश साकारणार शिक्षकांची भूमिका

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : स्मार्ट नागरिक’ हा नागरिकशास्त्र आणि घटनात्मक मूल्यांवरील अभ्यासक्रम तसेच डॉ.

शिवसेनेचा यंदाचा ऐतिहासिक दसरा मेळावा दुष्काळग्रस्तांना समर्पित; शेतकऱ्यांच्या मदतीसाठी विविध उपक्रमांची घोषणा

मुंबई : राज्यात सध्या भीषण दुष्काळाचे सावट पसरले असून, या गंभीर संकटाचा सामना करणाऱ्या बळीराजाच्या पाठीशी

Logistics Park Subsidy Maharashtra : लॉजिस्टिक पार्कना २० टक्क्यांपर्यंत भांडवली अनुदान राज्य सरकारकडून नियमावली जाहीर

मुंबई : राज्यातील लॉजिस्टिक आणि पुरवठा साखळी क्षेत्रातील गुंतवणुकीला चालना देण्यासाठी राज्य सरकारने लॉजिस्टिक

Nalasopara Sexual Abuse Case : नालासोपाऱ्यात खळबळ : डेटिंग ॲप्सचा वापर करून तरुणींचे शोषण करणाऱ्या आरीफ शेखवर गुन्हे दाखल

नालासोपारा : नालासोपाऱ्यातून एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक प्रकार समोर आला आहे. डेटिंग ॲप्सच्या माध्यमातून

मुंबई महानगर प्रदेशात प्रवासाचा वेळ ५९ मिनिटांवर आणण्याचे लक्ष्य - महानगर आयुक्त संजय मुखर्जी

मुंबई : मुंबई महानगर प्रदेशाचा नियोजनबद्ध विकास करण्यासाठी २०४७ पर्यंत ८० पायाभूत प्रकल्प राबविण्याचे नियोजन