विक्रोळी पूर्व - पश्चिम उड्डाणपुलावर तेल गळती, दुचाकीस्वार घसरून पडले; महापौरांनी केली मदत

महापौरांनी ताफा थांबवून यंत्रणांना केल्या सूचना


मुंबई (विशेष प्रतिनिधी) : विक्रोळी पूर्व - पश्चिम जोडणाऱ्या उड्डाणपुलावर वाहनातील तेल गळती झाल्याने तेथून जाणाऱ्या काही दुचाकी घसरून पडण्याच्या घटना शुक्रवारी संध्याकाळी घडल्या. या घटनेमध्ये दुचाकीस्वारांना किरकोळ इजा झाली असून. सुदैवाने कोणालाही गंभीर दुखापत झालेली नाही. विशेष म्हणजे मुंबईच्या महापौर रितू तावडे या एका सोहळ्यासाठी विक्रोळी येथून पवईकडे जात असताना त्यांच्या वाहनाच्या ताफ्यापासून काही अंतरावर ही घटना घडली.



पुलावरील तेल गळतीच्या घटनेमुळे संभाव्य मोठ्या अपघाताची शक्यता लक्षात घेता, महापौर रितू तावडे यांनी ताबडतोब वाहनांचा ताफा थांबवून या दुचाकीस्वारांची विचारपूस केली. तसेच वाहतूक पोलिसांना तत्काळ पाचारण करून त्यावर तातडीने प्रतिबंधात्मक उपाययोजना करून वाहतूक सुरक्षित करण्याचे निर्देश दिले. तसेच, संबंधित दुचाकीस्वारांना आवश्यक ते प्रथमोपचार त्वरीत करण्यासाठीच्याही सूचना केल्या.


त्याचप्रमाणे, महानगरपालिकेचे प्रशासकीय विभाग कार्यालय, अग्निशमन दल आणि पूल विभाग यांच्याशी महापौरांनी संपर्क साधला. सर्व संबंधित खात्यांनी आपसात समन्वय साधून, पुलावरून वाहतूक निर्धोक व्हावी, यासाठी तत्काळ उपाययोजना करण्याचेही निर्देश महापौरांनी दिले. यांनतर या पुलावरील निसरडा झालेला भाग कोरडा करून स्वच्छ करण्यासाठी कार्यवाही करण्यात आली आहे.

Comments
Add Comment

Mumbai Local Train : रेल्वे प्रवासी कृपया लक्ष द्या, रविवारी कुठे मेगाब्लॉक आहे ते जाणून घ्या

मध्य रेल्वेवर मेगा ब्लॉक मुंबई: मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाद्वारे विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे

Prakash Abitkar : 'अवयवदानाबाबत राज्यभर व्यापक प्रबोधन मोहीम राबवा'

मुंबई : महाराष्ट्रात मानवी अवयव प्रत्यारोपण कायदा अंमलात आल्यापासून आणि २०११ व २०१४ मधील सुधारित कायद्यांनुसार

BARTI : एमपीएससी मुख्य परीक्षा उत्तीर्ण अनुसूचित जातीच्या उमेदवारांना ‘बार्टी’कडून १० हजार रुपयांचे आर्थिक सहाय्य

मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२५ मध्ये उत्तीर्ण झालेल्या अनुसूचित

Goregaon Bus Fire : गोरेगाव मेट्रो स्थानकाखाली खासगी बस जळून खाक; धुराच्या लोटांमुळे प्रवाशांची धावपळ

मुंबई : पश्चिम द्रुतगती महामार्गावरील गोरेगाव परिसरात आज एक अत्यंत भीषण अपघाताची घटना घडली. गोरेगाव मेट्रो

Dahi Handi in mumbai local train : धावत्या लोकल ट्रेनमध्येच फोडली दहीहंडी! बदलापूर-ठाणे लोकलमध्ये महिला प्रवाशांचा अनोखा गोपाळकाला; व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

मुंबई : मुंबईच्या उपनगरीय रेल्वे प्रवासात एका अत्यंत अनोख्या आणि आगळ्यावेगळ्या दहीहंडी उत्सवाची दृश्ये समोर

Pratap Sarnaik : स्क्रॅप रिक्षा रस्त्यावर दिसता कामा नये; ५ ऑक्टोबरपर्यंत विशेष मोहीम राबवा, प्रवाशांच्या जीवाशी खेळणाऱ्या नियमबाह्य रिक्षांवर कडक कारवाई करा

मुंबई : नियमबाह्य पद्धतीने रस्त्यावर धावणाऱ्या स्क्रॅप रिक्षा प्रवाशांच्या सुरक्षेसाठी गंभीर धोका आहेत. अशा