गुजरातमधील आश्रमात बनावट नोटांचा गोरखधंदा उघड

 पोलिसांकडून २ कोटी रुपयांहून अधिकच्या नोटा जप्त


 अहमदाबाद गुन्हे शाखेची मोठी कारवाई


अहमदाबाद  :  नाशिकमधील ज्योतिषी आणि भोंदूबाबा अशोक खरातचं लैंगिक शोषणाचे प्रकरण उघडकीस आल्यानंतर गुजरातमधील अजून एका बाबाचा कारनामा समोर आला आहे. या बाबाच्या आश्रमात गैरप्रकार चालू होता. त्याचे व्हिडिओ समोर आल्यानंतर देशभरात संतापाची लाट उसळली आहे. हा बाबा गुजरातमधील असून अहमदाबाद गुन्हे शाखेने त्याचा कारनामा समोर आणला आहे. या बाबाने सुरत येथे नकली नोटा छापणाऱ्या आश्रमाचा पर्दाफाश केला आहे. पोलिसांनी या आश्रमातून २कोटी रुपयांहून अधिकच्या नोटा जप्त केल्या आहेत.


सुरत जवळील कामरेज तालुक्यातील पारडी गावात ‘श्री सत्य योग फाउंडेशन’ या आश्रमात बाहेर धर्माचे पांघरूण घेऊन आत नकली नोटांचा गोरखधंदा सुरू होता. या बनावट नोट छापखान्याची माहिती गुन्हे शाखेला एक गुप्त प्रकारे मिळाली होती. त्यानुसार सुरत येथून नकली नोटांची एक मोठी खेप अहमदाबाद येथे आणण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.


पोलिसांनी या गुप्त माहितीच्या आधारे अमराईवाडी परिसरात नाकाबंदी केली होती. तिथे काही महिला आणि ६ पुरुषांच्या संशयास्पद हालचाली दिसून आल्या. त्यानंतर पोलिसांनी कारवाई करत त्यांना अटक केली. त्यावेळी त्यांच्याकडून ५०० रुपयांच्या ४० हजारांहून अधिक नकली नोटा हस्तगत करण्यात आल्या. या नोटांची एकूण किंमत जवळपास २ कोटी रुपये आहे. या आरोपींची चौकशी केल्यानंतर सुरत येथील वराछा या परिसरात या नोटा छापण्यात आल्याचे समोर आले. या नोटा बाजारात चालवण्यासाठी खास योजना आखण्यात आली होती. त्यानुसार खरी ५०० रुपयांची नोट द्या आणि १५०० रुपयांच्या नकली नोटा मिळवा,अशी स्कीम होती. या भामट्यांनी ६६ लाख खऱ्या नोटांच्या बदल्यात २ कोटी रुपयांच्या खोट्या नोटा बाजारात आणण्याची योजना आखली होती. पण त्यापूर्वीच पोलिसांनी त्यांचा भांडाफोड केला.


पोलिसांनी संबंधित आश्रमात छापा टाकत तेथून प्रिंटिंग मशीन, संगणक, खास कागद, रंग आदी साहित्य जप्त केले. यासह पोलिसांना काही महत्त्वाची कागदपत्रं हाती लागली आहेत. आश्रमातील वाहनांचा वापरही या नकली नोटांच्या रॅकेटसाठी करण्यात आल्याचे तपासात समोर आले आहे.

Comments
Add Comment

Supreme Court Verdict : धर्मांतरानंतर आरक्षण मिळणार का? सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय

नवी दिल्ली : धर्मांतर केलेल्या व्यक्तीला पूर्वीच्या धर्मातील सामाजिक मागासलेपणाच्या आधारे आरक्षण किंवा विशेष

दिवाळीपूर्वी रेल्वे कर्मचाऱ्यांची चांदी! ७८ दिवसांच्या बोनसची घोषणा

रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! केंद्रीय मंत्रिमंडळाने बुधवारी (१४ ऑक्टोबर) सुमारे ११.४ लाख रेल्वे

PM Modi : सुवर्णपदकाची ऐतिहासिक कमाई! जपानमधील विजयानंतर पंतप्रधान मोदींनी घेतली भारतीय क्रिकेट संघांची भेट

नवी दिल्ली : जपानमधील आयची-नागोया येथे नुकत्याच पार पडलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धा २०२६ (Asian Games 2026) मध्ये भारताच्या

भीषण रस्ते अपघात! ओडिसामध्ये कार, ट्रक आणि दुचाकींच्या धडकेत एका महिलेचा मृत्यू, 7-8 जण गंभीर जखमी

ओडिसा : ओडिसातील गंजाम जिल्ह्यात बुधवारी एक अत्यंत भीषण आणि मनावढावा टाकणारा रस्ते अपघात घडला. चामाखंडी

Uttar Pradesh News : भदोहीमध्ये विकृत शिक्षकाचा चिमुरडीवर अमानुष अत्याचार; तिसरीत शिकणाऱ्या चिमुरडीचे केस उपटले आणि...व्हायरल व्हिडिओने खळबळ

भदोही : लहान मुलांना ज्ञानाचे धडे देणारे आणि त्यांना योग्य वळण लावणारे शिक्षक जेव्हा स्वतःच हिंसक आणि नराधम

WhatsApp Guest Call Feature : व्हॉट्सॲपचा मोठा धमाका! आता अकाउंट नसेल तरीही करता येणार व्हिडिओ अन् व्हाईस कॉल; जाणून घ्या नवीन ‘गेस्ट कॉल’ फिचरबद्दल...

जगभरात सर्वाधिक वापरल्या जाणाऱ्या व्हॉट्सॲप (WhatsApp) या मेसेजिंग ॲपने आपल्या युझर्ससाठी एक अत्यंत महत्त्वाचे आणि