धारावीच्या कुंभारवाड्यातील महिलांना कौशल्य प्रशिक्षणातून नवी संधी

पारंपरिक कुंभार कामाला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड


मुंबई  : धारावीतील कुंभारवाडा परिसरातील ३० महिलांना मातीची भांडी बनविण्याच्या (पॉटरी) प्रशिक्षण कार्यशाळा यशस्वीरीत्या पूर्ण केल्याबद्दल धारावी सोशल मिशन (डीएसएम) यांच्यावतीने इलेक्ट्रिक पॉटरी व्हील (विद्युतचलित चाक) प्रदान करून त्यांचा गौरव करण्यात आला. कौशल्य विकासाला चालना देत महिलांसाठी शाश्वत उपजीविकेच्या संधी निर्माण करण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला.


धारावी सोशल मिशनच्या सातत्यपूर्ण प्रयत्नातून पारंपरिक कुंभार कामाला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देत उत्पन्नाच्या नव्या संधी निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. कुंभारवाडा हा पारंपरिक मातीच्या भांड्यांसाठी देशभ र प्रसिद्ध असून अनेक पिढ्यांपासून येथील कुटुंबे या व्यवसायाशी निगडित आहेत. मात्र, या प्रक्रियेत महिलांचा सहभाग प्रामुख्याने सहाय्यक भूमिकांपुरताच मर्यादित राहिला होता. इलेक्ट्रिक पॉटरी व्हीलच्या माध्यमातून हा व्यवसाय अधिक सुलभ, कमी श्रमाचा आणि वेळ वाचविणारा ठरणार असून त्यामुळे महिलांचा सक्रिय सहभाग वाढण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे. ही प्रशिक्षण कार्यशाळा कुंभारवाड्यातील अनुभवी कुंभार आणि प्रशिक्षक नरसी रामजी वाला यांनी घेतली. गेल्या १५ वर्षांपासून ते कुंभारकामाचे प्रशिक्षण देत आहेत.


प्रशिक्षणात सहभागी झालेल्या महिलांनी या कार्यशाळेमुळे कुंभारकामाच्या बारकाव्यांची अधिक चांगली समज झाल्याचे सांगितले. कुंभारवाड्यातील रहिवासी जिग्निशा जेठवा हिने सांगितले की, "माझे वडील कुंभारकाम करतात; मात्र मला या कामाबद्दल फारशी माहिती नव्हती. या कार्यशाळेमुळे मातीला योग्य आकार कसा द्यायचा, बोटांचा वापर कसा करायचा आणि प्रत्येक टप्प्यावर किती दाब द्यायचा याचे प्रशिक्षण मिळाले. तसेच विविध प्रकारचे दिवे बनविण्याचेही कौशल्य आत्मसात करता आले. कुंभारवाड्यात तयार होणाऱ्या मातीच्या वस्तूंना देशभरातून मागणी असते. विशेषतः दिवाळीच्या काळात रंगीबेरंगी मातीच्या दिव्यांना मोठी मागणी असते.

Comments
Add Comment

मतदार यादीत नाव नोंदणीसाठी राज्यात विशेष मोहीम; 17, 18 आणि 24, 25 ऑक्टोबर रोजी मतदान केंद्रांवर शिबिरे

मुंबई : राज्यातील एकाही पात्र नागरिकाचे नाव मतदार यादीत समाविष्ट होण्यापासून वंचित राहू नये, या महत्त्वाच्या

BMC News : वरळीतील सांडपाण्यावर बायोगॅसपासून वीज निर्मिती; प्रकल्प काम 63 टक्के पूर्ण

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई मलनिस्सारण प्रकल्पांतर्गत वरळी येथे उभारण्यात येत असलेल्या 500 दशलक्ष लीटर

मुंबई उपनगरातील तीन नवीन कोळीवाड्यांचे होणार सीमांकन; राज्य सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय

मुंबई शहर व उपनगरातील कोळीवाड्यांचे सीमांकन अधिक स्पष्ट व सर्वसमावेशक करण्याच्या दृष्टीने फडणवीस सरकारने

BMC School News : राज्याचे मुख्यमंत्री तसेच सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त सर न्यायाधीश साकारणार शिक्षकांची भूमिका

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : स्मार्ट नागरिक’ हा नागरिकशास्त्र आणि घटनात्मक मूल्यांवरील अभ्यासक्रम तसेच डॉ.

शिवसेनेचा यंदाचा ऐतिहासिक दसरा मेळावा दुष्काळग्रस्तांना समर्पित; शेतकऱ्यांच्या मदतीसाठी विविध उपक्रमांची घोषणा

मुंबई : राज्यात सध्या भीषण दुष्काळाचे सावट पसरले असून, या गंभीर संकटाचा सामना करणाऱ्या बळीराजाच्या पाठीशी

Logistics Park Subsidy Maharashtra : लॉजिस्टिक पार्कना २० टक्क्यांपर्यंत भांडवली अनुदान राज्य सरकारकडून नियमावली जाहीर

मुंबई : राज्यातील लॉजिस्टिक आणि पुरवठा साखळी क्षेत्रातील गुंतवणुकीला चालना देण्यासाठी राज्य सरकारने लॉजिस्टिक