नाशिकचा हर्षवर्धन सदगीर 'डबल महाराष्ट्र केसरी'

अटीतटीच्या लढतीत सोलापूरच्या 'बाहुबली'चा ४-३ ने पराभव


पुणे : नाशिकच्या हर्षवर्धन सदगीर याने आपल्या अनुभवाच्या जोरावर सोलापूरच्या 'बाहुबली' महेंद्र गायकवाडला ४-३ अशा फरकाने धूळ चारत ६८ व्या 'महाराष्ट्र केसरी २०२६' किताबावर आपले नाव कोरले. या ऐतिहासिक विजयासह हर्षवर्धन आता 'डबल महाराष्ट्र केसरी' बनला असून, वाघोली येथील रामकृष्ण सातव पाटील मैदानावर कुस्तीचा हा अभूतपूर्व थरार पाहायला मिळाला.


अंतिम लढतीत सोलापूरच्या महेंद्र गायकवाडने पहिल्या मिनिटापासून आक्रमक सुरुवात केली होती. त्याने हर्षवर्धनला 'स्टेप आऊट' करत १-० अशी आघाडी घेतली. मात्र, अनुभवी हर्षवर्धनने संयम राखत महेंद्रचा 'दुहेरी पट' काढण्याचा प्रयत्न यशस्वीरीत्या धुडकावून लावला. ३ मिनिटांच्या पहिल्या फेरीनंतर सामना १-१ अशा बरोबरीत होता. दुसऱ्या फेरीत दोन्ही मल्लांमध्ये गुणांसाठी चुरस पाहायला मिळाली; परंतु शेवटच्या क्षणी हर्षवर्धनने आपल्या डावपेचांच्या जोरावर ४-३ अशी सरशी साधली.





विजेत्या हर्षवर्धन सदगीरला मानाची चांदीची गदा, रोख पुरस्कार आणि सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. राज्याचे कृषिमंत्री दादा भुसे आणि मंत्री दत्ता भरणे यांच्या हस्ते हा सोहळा पार पडला. यावेळी कुस्तीगीर परिषदेचे पदाधिकारी आणि हजारो कुस्तीप्रेमी उपस्थित होते.


हर्षवर्धन सदगीरने यापूर्वी २०२० मध्येही महाराष्ट्र केसरीचा किताब पटकावला होता. सहा वर्षांनंतर पुन्हा एकदा गदा मिळवून त्याने आपल्या नावाचा डंका संपूर्ण महाराष्ट्रात वाजवला आहे. खरं तर हर्षवर्धन सदगीरने १० गुणांची आघाडी घेतली होती, जर जय पाटीलचे शुन्य गुण होते. यावेळी कुस्तीमध्ये दोन पैलवानाच्या गुणांमधला फरक हा १० झाला तर तांत्रिक विजय (टेक्निकल सुपेरेयारीटी) मानली जाते. त्यामुळे हर्षवर्धन सदगीर ला विजयी घोषित करण्यात आले होते. त्यामुळे हर्षवर्धन सदगीर माती विभागातून अंतिम सामन्यात पोहोचला होता.


अंतिम फेरीपर्यंतचा रंजक प्रवास

  1. माती विभाग (सिकंदर शेखचा पराभव): माती विभागाच्या फायनलमध्ये महेंद्र गायकवाडने हिंगोलीच्या 'चपळ चित्ता' सिकंदर शेखला ३-० असे पराभूत करून सर्वांना चकित केले. महेंद्रने सिकंदरला संपूर्ण सामन्यात एकही गुण मिळवू दिला नाही आणि फायनलमध्ये धडक मारली.

  2. गादी विभाग (हर्षवर्धनचा झंझावात): गादी विभागाच्या अंतिम सामन्यात हर्षवर्धनने सोलापूर शहराच्या जय पाटीलला अवघ्या २ मिनिट १२ सेकंदात चितपट करून आपला दरारा सिद्ध केला होता.

Comments
Add Comment

IND vs WI 5th T20I: बंगळुरूत तीन बदल केले तरच टीम इंडियाचं विजयाचं गणित सुटणार! समजून घ्या

भारत आणि वेस्ट इंडिज टी20 मालिका आता रंगतदार वळणावर आहे. कारण वेस्ट इंडिजने भारतीय संघाला या मालिकेत तोडीस तोड

India vs Zimbabwe Women T20: स्मृती मंधानाच्या नेतृत्वात पहिली टी20 मालिका, कधी आहे सामना जाणून घ्या सर्वकाही

भारत आणि झिम्बाब्वे महिला क्रिकेट संघात आंतरराष्ट्री क्रिकेटमध्ये पहिल्यांदाच टी20 मालिका खेळली जाणार आहे. तीन

अर्शदीप सिंगला दुखापत; सुनील गावस्कर शमार जोसेफवर संतापले! नेमकं काय म्हणाले?

हैदराबाद : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील रंगतदार मालिकेतील चौथ्या टी-20 सामन्यात वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगला

भारतीय फुटबॉलचे भविष्य बदलणार? केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे आणि रोनाल्डो नाझारिओ भेट चर्चेत

नवी दिल्ली : भारतातील क्रीडा परिसंस्थेला अधिक बळकट करण्यासाठी आणि तरुण फुटबॉलपटूंना जागतिक स्तरावर

AUS vs SA Test : ऑस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण आफ्रिकेचा मोठा निर्णय! ब्रिट्झकेला संधी, रबाडाचे पुनरागमन?

डर्बन (दक्षिण आफ्रिका) : ऑस्ट्रेलियाविरुद्ध डर्बन येथे झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यात दक्षिण आफ्रिकेला 214

PM Modi : सुवर्णपदकाची ऐतिहासिक कमाई! जपानमधील विजयानंतर पंतप्रधान मोदींनी घेतली भारतीय क्रिकेट संघांची भेट

नवी दिल्ली : जपानमधील आयची-नागोया येथे नुकत्याच पार पडलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धा २०२६ (Asian Games 2026) मध्ये भारताच्या