अनाया बांगरचा शस्त्रक्रिया करत मोठा निर्णय, देशातील पहिलंच प्रकरण नेमकं काय?

मुंबई: माजी भारतीय क्रिकेटर संजय बांगर यांची मुलगी अनाया बांगर हिने स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली आहे. अनायाचा जन्म झाला तेव्हा ती मुलगा आर्यन होती. मात्र कालांतराने तिने लिंगबदल शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला. नुकतच थायलँडमध्ये अनायाने जेंडर अफर्मिंग सर्जरी केली. सध्या तिची प्रकृती सुधारत आहे. अनायाने रुग्णालयातील एक फोटो शेअर केला असून यासोबत एक भावुक करणारी नोटही लिहिली आहे. दरम्यान अनायाबद्दल एक हैराण करणारी बाब समोर आली आहे.


अनाया बांगर हिची जेंडर अफर्मिंग सर्जरी यशस्वीपणे पार पडली आहे. आता अनाया बांगर सरोगसीद्वारे आई होऊ शकते. गर्भाशय नसल्याने शारिरीक संबंधाद्वारे ती आई होऊ शकत नाही. मात्र स्त्री प्रमाणे शरीरसंबंध ठेऊ शकते. विशेष म्हणजे यापूर्वीच अनाया बांगरने स्वत:चे शुक्राणू गोठवून ठेवल्याची चर्चा सोशल मीडियावर सुरू आहे. म्हणजे भविष्यात स्वतःच्या शुक्राणूंपासून तिला जैविक अपत्य होऊ शकतं. जेव्हा बाळ जन्माला येईल तेव्हा अनाया त्या बाळाची आई आणि बाबा दोन्ही असेल. कदाचित इतिहासातील ही पहिलीच घटना असेल अशीही चर्चा सुरू आहे.





सोशल मीडियावर चर्चांणा उधाण


एका वृत्त माध्यमानुसार, राईज अँड फॉल या रिअॅलिटी टेलिव्हिजन (२०२५) शोदरम्यान अनायाने आपल्या सहस्पर्धकाशी बोलताना मातृत्वाबद्दलचा उल्लेख केला होता. यामध्ये तिने शुक्राणू गोठवून ठेवल्याचंही म्हटलं आहे. तिने घेतलेल्या या मोठ्या निर्णयामुळे भविष्यात तिला बाळ हवं असेल तर जैविक अपत्य होऊ शकतं. सोशल मीडियावर यासंदर्भात मोठी चर्चा सुरू आहे. अनेकांनी हे प्रकरण अनोखं असेल असं म्हटलं आहे. तर काहींनी इतिहासातील ही पहिलीच घटना असेल जिथं आई आणि बाबा एकच व्यक्ती असेल असं म्हटलं आहे.


अनाया बांगर हिने घेतलेल्या निर्णयामुळे समाजातून तिचं मोठं कौतुक केलं जात आहे. लिंगबदल शस्त्रक्रियेचा निर्णय मोठा होता. समाजाच्या द्वेषाकडून दुर्लक्ष करीत तिने स्वत:च्या मनाचं ऐकलं. यावेळी कुटुंबाने मोठा आधार दिल्याचं अनायाने सांगितलं.




Comments
Add Comment

MahaIT : महाआयटीच्या प्रणाली अद्ययावतीकरणामुळे शासकीय ऑनलाइन सेवा १६ ते २० ऑक्टोबरदरम्यान तात्पुरत्या बंद

मुंबई : महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ मर्यादित (महाआयटी) मार्फत विकसित आणि देखरेख करण्यात येणाऱ्या राज्य

महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा २०२६ जाहीर; हाँगकाँग, उत्तराखंड आणि सांगलीच्या मंडळांची बाजी!

मुंबई : राज्यात उत्साहात पार पडलेल्या ‘म

Ram Mansion Purchase : सिद्धिविनायक मंदिराजवळीम राम मेन्शनच्या खरेदी व्यवहाराला परवानगी

मुंबई : प्रभादेवी येथील श्री सिद्धिविनायक गणपती मंदिराला लागून असलेल्या राम मेन्शन सहकारी गृहनिर्माण

मतदार यादीत नाव नोंदणीसाठी राज्यात विशेष मोहीम; 17, 18 आणि 24, 25 ऑक्टोबर रोजी मतदान केंद्रांवर शिबिरे

मुंबई : राज्यातील एकाही पात्र नागरिकाचे नाव मतदार यादीत समाविष्ट होण्यापासून वंचित राहू नये, या महत्त्वाच्या

BMC News : वरळीतील सांडपाण्यावर बायोगॅसपासून वीज निर्मिती; प्रकल्प काम 63 टक्के पूर्ण

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई मलनिस्सारण प्रकल्पांतर्गत वरळी येथे उभारण्यात येत असलेल्या 500 दशलक्ष लीटर

मुंबई उपनगरातील तीन नवीन कोळीवाड्यांचे होणार सीमांकन; राज्य सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय

मुंबई शहर व उपनगरातील कोळीवाड्यांचे सीमांकन अधिक स्पष्ट व सर्वसमावेशक करण्याच्या दृष्टीने फडणवीस सरकारने