कुलाबा सांडपाणी प्रकल्पातील प्रक्रिया केलेल्या पाण्याच्या खरेदीसाठी संस्थांच्या उड्या; प्रति हजार लिटरसाठी १५ रुपयांचा दर आकारला जाणार

मुंबई: मुंबई महापालिकेच्यावतीने समुद्रात सोडल्या जाणाऱ्या सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी मलजल प्रक्रिया केंद्रांची कामे हाती घेण्यात आली आहे. यातील कुलाबा मल जल प्रक्रिया केंद्रातील ३७ दशलक्ष लिटर क्षमतेच्या प्रकल्पातून १० दशलक्ष लिटर प्रक्रिया केलेल्या पाण्याचा पुनर्वापर केला जात आहे. या पाण्याचा पुनर्वापर करण्यासाठी प्रक्रिया केलेल्या पाण्याची विक्री केली जात असून महापालिकेच्यावतीने हे प्रक्रिया केलेले पाणी प्रति हजार लिटर हे १५ रुपये दराने विकणार आहे. कुलाबा मलजल प्रक्रिया केंद्रामधून प्रक्रिया केलेले सांडपाण्याची खरेदी करण्यासाठी कंपन्या पुढे आल्या असून या खाजगी, निमशासकीय, शासकीय आस्थापना यांना विक्री करण्याचा दर निश्चित केला आहे.


मुंबई मलनिःसारण प्रकल्प भाग २ अंतर्गत कुलाबा मलजल प्रक्रिया केंद्राचे काम २०२० मध्ये पूर्ण झाले आहे. त्यानंतर या केंद्राची दैनदिन देखभाल करण्यासाठी पुढील १५ वर्षांच्या कालावधीसाठी सुएझ इंडिया प्रा. लि. कंपनीची निवड केली आहे. प्रकल्पाची क्षमता प्रति दिन ३७ दशलक्ष लिटर एवढी आहे. त्यापैकी १० दशलक्ष लिटर सांडपाण्यावर तृतीयक प्रक्रिया केली जाते यातील सांडपाणी अधिक शुध्द होऊन त्याचा पुनर्वापर पेयत्तर अर्थात पिण्या व्यतिरिक्त इतर वापरासाठी म्हणजेच बांधकाम, उद्याने, तसेच इतर सफाई कारणासाठी केला जाऊ शकतो.


कुलाबा मलजल प्रकल्पातून प्रक्रिया केलेल्या पाण्यावर प्रति किलो लिटर १२ रुपये खर्च येत आहे. त्यानुसार आता महापालिका प्रति किलोलीटर अर्थात एक हजार लिटर पाण्यासाठी १५ रुपये दर आकारण्याचे निश्चित केले आहे. यासाठी कुलाबा मलजल प्रक्रिया केंद्रामधून प्रक्रिया केलेले सांडपाण्यच्या खरेदीसाठी एस. आर. एंटरप्राजेस ही संस्था पुढे आली असून त्यांना १५ रुपये दराने एक हजार लिटर करता दर आकाराला जाणार आहे. एस.आर. एंटरप्राइजेस महिला बचत गट संस्थेला या केंद्रातून सुमारे ३० लाख लिटर प्रतिदिन (३ किलो लिटर) इतके सांडपाणी प्रक्रिया केलेले पाणी खरेदी करण्याची तयारी दर्शवली आहे. या संस्थेला तसेच नजीकच्या येणाऱ्या काळात इतर खाजगी, निमशासकीय, शासकीय आस्थापना यांना याच दराने विक्री केली जाणार आहे.



महापालिका यापूर्वी कुणा कुणाला किती दराने केला पाणी पुरवठा?


 

मुंबई मेरीटाईम बोर्ड यांना समुद्रकिना-यांची धूप रोखण्यासाठी सन २०२० मध्ये हाती घेतलेल्या टेट्रापॉड टाकण्याच्या कामांसाठी कुलाबा मलजल प्रक्रिया केंद्रांमधून प्रक्रिया केलेले सांडपाणी त्यांच्या मागणीनुसार रुपये २१ प्रति १००० लिटर दराने पुरविले


महानगरपालिकेच्या कोस्टल रोड प्रकल्पाचे कंत्राटदार मेसर्स एल ऍण्ड टी लिमिटेड यांना टनेल बोअरींग यंत्राच्या वापराकरीता २ दशलक्ष लिटर प्रक्रिया केलेल्या पाण्याचा पुरवठा केला होता.. रूपये २१ प्रति १००० लिटर दराने मे ते जून २०२२ या कालावधीत केला.



भारतीय नौसेनेला मागणीनुसार साधारण ०.५ ते १


दशलक्ष लिटर एवढ्या पाण्याचा पुरवठा रुपये १ प्रति १००० लिटर या दराने एप्रिल २०२४ ते मार्च २०२७ या कालावधित केला जात आहे.


दी क्रिकेट क्लब ऑफ इंडिया लिमिटेड यांना क्लब च्या परिसरातील क्रीडा मैदाने आणि वृक्षारोपण अशा पेयत्तर वापरासाठी ३ वर्षाच्या कालावधिकरीता १००००० लीटर प्रतिदिन अर्थात १०० किलोलीटर एवढे सांडपाणी रुपये २१ या दराने प्रति १००० लिटर सांडपाणी प्रक्रिया केलेल्या पाण्याची विक्री

Comments
Add Comment

Mumbai CNG Price : सीएनजी आणि पीएनजी महागला, नवे दर १ सप्टेंबरपासून लागू

मुंबई : महानगर गॅस लिमिटेडने (एमजीएल) सीएनजीच्या दरात प्रति किलो २ रुपयांची वाढ जाहीर केली आहे. ही दरवाढ मंगळवार १

Anna Hazare : अण्णा हजारेंची प्रकृती खालावली, मुंबईच्या बॉम्बे हॉस्पिटलमध्ये दाखल

मुंबई : ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना प्रकृती खालावल्यामुळे मुंबईतील बॉम्बे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात

Central Railway : मध्य रेल्वे २६२ गणपती विशेष गाड्यांची सेवा पुरवणार

मुंबई : मध्य रेल्वेने आगामी गणपती उत्सवाच्या काळात प्रवाशांची ये-जा सुलभ करण्यासाठी आणि गर्दीचे नियोजन

Nepal Flood : नेपाळ आपत्तीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील ६७ जणांच्या संपर्कासाठी प्रयत्न

मुंबई : नेपाळ-तिबेट प्रदेशात २६ ऑगस्ट २०२६ रोजी आलेल्या महापुरामध्ये महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांतील पर्यटक

Western Railway : पश्चिम रेल्वेचे सुधारित उपनगरीय वेळापत्रक आजपासून लागू; ६ नव्या लोकल

वातानुकूलित लोकलच्या सेवांमध्येही वाढ मुंबई : ३१ ऑगस्ट२०२६ पश्चिम रेल्वेचे सुधारित उपनगरीय वेळापत्रक मंगळवार

JNPA : 'जेएनपीए' ठरले जगातील सर्वात वेगाने विकसित होणारे कंटेनर बंदर

- जागतिक मानांकनात २१ व्या स्थानी झेप; मंत्री नितेश राणे यांनी केले अभिनंदन मुंबई : भारतातील सर्वात मोठे कंटेनर