वर्सोवा-वांद्रे सागरी सेतू प्रकल्पग्रस्त मच्छिमारांना दिलासा; नुकसानभरपाईसाठी विशेष अभ्यासगट स्थापन करण्याचे मंत्री नितेश राणे यांचे निर्देश

मुंबई: वर्सोवा-वांद्रे सागरी सेतू बांधकाम प्रकल्पामुळे मच्छीमार बांधवांच्या होणाऱ्या नुकसान भरपाईसंदर्भात आज मंत्रालयात मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वपूर्ण बैठक पार पडली.


या बैठकीस माजी आमदार किरण पावसकर, मत्स्यव्यवसाय विभागाचे सचिव एन रामास्वामी, एमएमआरडीएचे वरिष्ठ अधिकारी, संबंधित विभागांचे अधिकारी तसेच विविध मच्छीमार संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते.


बैठकीत मत्स्यव्यवसाय आयुक्त कार्यालयाच्या ३० ऑक्टोबर २०२५ रोजीच्या पत्रानुसार तसेच ०९ मार्च २०२३ च्या शासन निर्णयात प्रस्तावित करण्यात आलेल्या सुधारणांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. या प्रकल्पामुळे मच्छीमार बांधवांच्या दैनंदिन जीवनावर होणाऱ्या परिणामांचा आढावा घेण्यात आला.


यावेळी मंत्री नितेश राणे यांनी सांगितले की, वर्सोवा कोस्टल रोड व भविष्यातील वाढवण पर्यंत होणारा कोस्टल रोड प्रकल्प एमएमआरडीए च्या माध्यमातून पूर्णत्वास येणार आहे. या पार्श्वभूमीवर या भागातील बाधित होणाऱ्या मच्छिमारांना योग्य नुकसानभरपाई मिळावी यासाठी विशेष अभ्यासगट स्थापन करून महिन्याभरात त्याचा अहवाल सादर करावा, असे निर्देश यावेळी मंत्री नितेश राणे यांनी अधिकाऱ्यांना दिले.

Comments
Add Comment

Western Railway New Timetable : मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी! १ सप्टेंबरपासून पश्चिम रेल्वेचे नवे वेळापत्रक लागू; जाणून घ्या नवीन बदल

मुंबई : मुंबईकरांच्या दैनंदिन प्रवासाचा अविभाज्य भाग असलेल्या पश्चिम रेल्वेच्या लोकल सेवांमध्ये १ सप्टेंबर

Kalwa Hospital News : कळवा रुग्णालयातील रुग्णाच्या जेवणात झुरळ? संतापाची लाट; कंत्राटदारावर कारवाईची मागणी

ठाणे : ठाण्यातील कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात रुग्णाला देण्यात आलेल्या जेवणात झुरळ आढळल्याचा

Chemical Leak : चेंबूरमध्ये टँकरमधून बेन्झीनची गळती; म्हैसूर कॉलनी परिसरात भीतीचे वातावरण

मुंबई : चेंबूरच्या म्हैसूर कॉलनी परिसरात उभ्या असलेल्या टँकरमधून बेन्झीन केमिकलची गळती झाल्याने खळबळ उडाली.

Mumbai CNG Price : सीएनजी आणि पीएनजी महागला, नवे दर १ सप्टेंबरपासून लागू

मुंबई : महानगर गॅस लिमिटेडने (एमजीएल) सीएनजीच्या दरात प्रति किलो २ रुपयांची वाढ जाहीर केली आहे. ही दरवाढ मंगळवार १

Anna Hazare : अण्णा हजारेंची प्रकृती खालावली, मुंबईच्या बॉम्बे हॉस्पिटलमध्ये दाखल

मुंबई : ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना प्रकृती खालावल्यामुळे मुंबईतील बॉम्बे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात

Central Railway : मध्य रेल्वे २६२ गणपती विशेष गाड्यांची सेवा पुरवणार

मुंबई : मध्य रेल्वेने आगामी गणपती उत्सवाच्या काळात प्रवाशांची ये-जा सुलभ करण्यासाठी आणि गर्दीचे नियोजन