आरोग्य समिती अध्यक्षांचा पहिला वहिला अनोखा प्रयोग

मुंबई: मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून देण्यात येणाऱ्या आरोग्य सुविधांची माहिती आरोग्य समितीच्या नवनिर्वाचित सदस्यांना मिळावी, या उद्देशाने २४ मार्च २०२६ रोजी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाच्या यंत्रणेचा भाग असलेल्या प्रमुख रुग्णालये, सार्वजनिक आरोग्य विभाग, उपनगरीय रुग्णालये अशा विविध विभागांच्या प्रमुखांनी आरोग्य समिती सदस्यांसमोर सविस्तर सादरीकरण केले. यावेळी महानगरपालिकेमार्फत पुरविण्यात येणाऱ्या आरोग्य सुविधांचा प्रचार, प्रसार स्थानिक पातळीवर अधिक प्रभावीपणे करण्याच्या सूचना आरोग्य समितीचे अध्यक्ष हरिश भांदिर्गे यांनी मुंबई महानगरपालिका प्रशासनाला दिल्या. आरोग्य समिती अध्यक्षांनी अशाप्रकारे पहिल्या आरोग्य समितीच्या बैठकीत स्वत:सह सर्व सदस्यांना आरोग्य विभागाची माहिती देण्यासाठी प्रशासनाला करावयाला लावलेल्या सादीकरणाचा हा पहिलाच प्रयोग आहे.


या बैठकीला सर्व आरोग्य समिती सदस्य, उपायुक्त (सार्वजनिक आरोग्य) शरद उघडे, संचालक (प्रमुख रुग्णालये व वैद्यकीय महाविद्यालये) डॉ. शैलेश मोहिते, सर्व प्रमुख रुग्णालयांचे अधिष्ठाता, आरोग्य विभागातील विविध उपविभागांचे संबंधित अधिकारी उपस्थित होते.


बृहन्मुंबई महानगरपालिका संचलित प्रमुख रुग्णालये आणि वैद्यकीय महाविद्यालये, सार्वजनिक आरोग्य विभाग, उपनगरीय रुग्णालये यांच्या माध्यमातून पुरविण्यात येणा-या आरोग्य क्षेत्रातील सेवा सुविधांची माहिती विस्तृतपणे सादरीकरणाच्या माध्यमातून मांडण्यात आली. आरोग्य यंत्रणेतील रुग्णालयांच्या ठिकाणची सुसज्जता, रुग्णशय्यांची संख्या, कर्मचारी वर्गाची क्षमता आदी माहिती यावेळी सादर करण्यात आली. त्यासोबतच आरोग्य यंत्रणेच्या सक्षमीकरणासाठी प्रगतिपथावर असणारी पायाभूत सुविधा विकासाची कामे, रुग्णालयाच्या क्षमता विकासासाठीची अभियांत्रिकी कामे, रुग्णशय्या क्षमतावाढ आदींची माहिती सादरीकरणाच्या निमित्ताने देण्यात आली. तसेच सार्वजनिक आरोग्य विभागाच्या यंत्रणेच्या माध्यमातून झोपडीपट्टी भागात पुरविण्यात आरोग्य सुविधा याबाबतच्या माहितीचे सादरीकरण करण्यात आले. तसेच रक्तदाब, मधुमेह, सकस आहार, योग यासाठीच्या विविध पुढाकारांची माहितीही सदस्यांना देण्यात आली. आरोग्य यंत्रणेच्या माध्यमातून पुरविण्यात येणा-या विविध वैद्यकीय सुविधांची माहिती सर्वसामान्य नागरिकांना आरोग्य संस्थांच्या ठिकाणी उपलब्ध करून द्यावी. त्याअनुषंगाने आरोग्य सुविधांचा स्थानिक पातळीवर अधिक प्रचार आणि प्रसार करण्याची सूचना आरोग्य समिती अध्यक्ष हरिश भांदिर्गे यांनी बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाला केली.


क्षयरोगासारख्या आजाराबाबत अधिक जनजागृती करतानाच उपलब्ध सुविधा आणि उपचार तसेच निदानाच्या अनुषंगाने काही प्रभागांमध्ये विशेष प्रयत्न करण्याची गरज असल्याची सूचना आरोग्य समिती सदस्यांनी यावेळी केली. हिंदुह्दयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखान्यांची संख्या आणखी वाढवण्याचीही सूचना सदस्यांमार्फत बैठकीदरम्यान करण्यात आली.


 
Comments
Add Comment

Nitesh Rane : 'मोदी एक्सप्रेस'च्या तारखेत बदल

- कोकणवासीयांच्या मागणीनुसार गणपती स्पेशल ट्रेन आता ११ व १३ सप्टेंबरला धावणार; मंत्री नितेश राणे यांची

Mumbai News : मुंबईतील जगजीवन राम रुग्णालयाच्या रक्तपेढीचा परवाना दोन दिवसांसाठी निलंबित

मुंबई : रक्तदानाच्या नोंदींमधील त्रुटी, अपुरे दस्तऐवजीकरण आणि विहित क

Nitesh Rane : सिंधुदुर्गात कुक्कुटपालनाला चालना देण्यासाठी प्रभावी कार्यवाहीचे निर्देश; मंत्री नितेश राणे यांची माहिती

कुक्कुटपालनाला 'कृषी समकक्ष' दर्जा दिल्याने युवकांसाठी रोजगाराच्या नवीन संधी मुंबई : सिंधुदुर्ग जिल्ह्यात

Shri Ganesha Aarogyacha : श्रीगणेशोत्सवात मुंबईतील सार्वजनिक श्रीगणेश मंडळांच्या सभा मंडपात ‘श्रीगणेशा आरोग्याचा’ उपक्रम राबविणार

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : यंदाच्या श्रीगणेशोत्सवाच्या मंगलमय वातावरणात नागरिकांच्या आरोग्याची काळजी

Nitesh Rane : मालेगावमध्ये आधुनिक मासळी बाजार उभारणीला गती

- सांगलीतील प्रकल्पाचे काम वेळेत पूर्ण करण्याचे मंत्री नितेश राणे यांचे निर्देश मुंबई : वाशिम जिल्ह्यातील

Disha Salian Case : दिशा सालियन मृत्यूप्रकरणाचा उद्या निकाल

- आदित्य ठाकरे प्रतिवादी; मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयाकडे संपूर्ण देशाचे लक्ष मुंबई : दिशा सालियन