Indian Railway Rules: रेल्वे तिकीट आठ दिवसांपूर्वी रद्द केल्यावर रिफंड...; रेल्वेच्या नियमांत महत्त्वाचा बदल

नवी दिल्ली: केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी मंगळवारी रेल्वे तिकीट प्रणाली आणि प्रवाशांच्या सुविधासंबंधित मोठी घोषणा केली आहे. त्यांनी सांगितलं की, यापुढे ट्रेन सुटण्याच्या ८ तासांपूर्वीपर्यंत तिकीट रद्द केल्यानंतर कोणताही रिफंड मिळणार नाही. हा नवीन नियम १ ते १५ एप्रिल २०२६ दरम्यान लागू होईल.


याशिवाय दुसऱ्या रिफंड स्लॅबमध्येही बदल करण्यात आला आहे. आता २४ ते ८ तासांदरम्यान तिकीट रद्द केल्यास तिकीटाची रक्कम ५० टक्क्यांपर्यंत कापली जाईल. यापूर्वी हा कालावधी १२ ते ४ तासांपर्यंत होता. तर ट्रेन सुटण्याच्या ७२ ते २४ तासांपूर्वी तिकीट रद्द केल्यास तिकीटातील २५ टक्के रक्कम कापली जाईल. तर ७२ तासांपूर्वी तिकीट रद्द केल्यास संपूर्ण रक्कम परत दिली जाईल. यादरम्यान रेल्वे प्रवाशांकडून केवळ फ्लॅट चार्ज घेण्यात येईल.


रेल्वे मंत्र्‍यांनी सांगितलं की, नवीन रिफंड नियम ब्लॅक मार्केटिंग आणि एजंटद्वारा शेवटच्या टप्प्यात तिकीट बुकिंग रोखण्यासाठी लागू करण्यात आला आहे. जानेवारी २०२६ पासून सुरू झालेली वंदे भारत स्लीपर आणि अमृत भारत II ट्रेनसाठी हा नियम आधीपासून लागू आहे. त्यांनी काऊंटर तिकीट खरेदीदारांसाठी क्लास अपग्रेडची सुविधादेखील वाढवली आहे. आता ट्रेन रवाना होण्याच्या ३० मिनिटांपर्यंत प्रवासी आपल्या प्रवासाचा क्लास अपग्रेड करू शकतात.

Comments
Add Comment

Supreme Court Verdict : धर्मांतरानंतर आरक्षण मिळणार का? सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय

नवी दिल्ली : धर्मांतर केलेल्या व्यक्तीला पूर्वीच्या धर्मातील सामाजिक मागासलेपणाच्या आधारे आरक्षण किंवा विशेष

दिवाळीपूर्वी रेल्वे कर्मचाऱ्यांची चांदी! ७८ दिवसांच्या बोनसची घोषणा

रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! केंद्रीय मंत्रिमंडळाने बुधवारी (१४ ऑक्टोबर) सुमारे ११.४ लाख रेल्वे

PM Modi : सुवर्णपदकाची ऐतिहासिक कमाई! जपानमधील विजयानंतर पंतप्रधान मोदींनी घेतली भारतीय क्रिकेट संघांची भेट

नवी दिल्ली : जपानमधील आयची-नागोया येथे नुकत्याच पार पडलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धा २०२६ (Asian Games 2026) मध्ये भारताच्या

भीषण रस्ते अपघात! ओडिसामध्ये कार, ट्रक आणि दुचाकींच्या धडकेत एका महिलेचा मृत्यू, 7-8 जण गंभीर जखमी

ओडिसा : ओडिसातील गंजाम जिल्ह्यात बुधवारी एक अत्यंत भीषण आणि मनावढावा टाकणारा रस्ते अपघात घडला. चामाखंडी

Uttar Pradesh News : भदोहीमध्ये विकृत शिक्षकाचा चिमुरडीवर अमानुष अत्याचार; तिसरीत शिकणाऱ्या चिमुरडीचे केस उपटले आणि...व्हायरल व्हिडिओने खळबळ

भदोही : लहान मुलांना ज्ञानाचे धडे देणारे आणि त्यांना योग्य वळण लावणारे शिक्षक जेव्हा स्वतःच हिंसक आणि नराधम

WhatsApp Guest Call Feature : व्हॉट्सॲपचा मोठा धमाका! आता अकाउंट नसेल तरीही करता येणार व्हिडिओ अन् व्हाईस कॉल; जाणून घ्या नवीन ‘गेस्ट कॉल’ फिचरबद्दल...

जगभरात सर्वाधिक वापरल्या जाणाऱ्या व्हॉट्सॲप (WhatsApp) या मेसेजिंग ॲपने आपल्या युझर्ससाठी एक अत्यंत महत्त्वाचे आणि