दक्षिण मुंबईतील कामाठीपुरा आणि उमरखाडीचा चेहरामोहरा बदलणार; गृहनिर्माण प्रकल्पांना मिळणार वेग

मुंबई: दक्षिण मुंबईतील अत्यंत गजबजलेल्या कामाठीपुरा आणि उमरखाडी परिसरातील हजारो रहिवाशांचे पुनर्वसनाचे स्वप्न लवकरच पूर्ण होणार आहे. या भागातील जुन्या आणि मोडकळीस आलेल्या इमारतींच्या पुनर्विकासाला गती देण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध असून, लवकरच प्रत्यक्ष कामाला सुरुवात होईल, अशी ग्वाही राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी आज विधानसभेत दिली. आमदार अमीन पटेल यांनी उपस्थित केलेल्या लक्षवेधीला ते उत्तर देत होते.


८ हजार कुटुंबांना मिळणार हक्काची घरे


कामाठीपुरा परिसरातील सुमारे ८ हजार कुटुंबांना सुरक्षित आणि सुसज्ज घरे उपलब्ध करून देण्यासाठी १२ जानेवारी २०२३ रोजी समूह पुनर्विकासाचा (Cluster Development) निर्णय घेण्यात आला होता. यासाठी विशेष नियोजन प्राधिकरण नियुक्त करण्यात आले असून पात्र विकासकांची निवडही पूर्ण झाली आहे. या प्रकल्पाचे गांभीर्य लक्षात घेऊन याला ‘व्हायटल प्रोजेक्ट’ (अति-महत्त्वाचा प्रकल्प) म्हणून घोषित करण्यासाठी मुख्यमंत्री आणि गृहनिर्माण मंत्र्यांच्या स्तरावर कार्यवाही सुरू असल्याचे डॉ. भोयर यांनी सांगितले.


उमरखाडी येथील एकूण ८१ इमारतींच्या पुनर्विकासासाठी टप्प्याटप्प्याने काम केले जाईल. पहिल्या टप्प्यात ३६ इमारतींचे काम हाती घेतले जाणार असून, १२ इमारतींच्या तातडीच्या दुरुस्तीसाठी १२ कोटी रुपयांचा निधी खर्च करण्यात आला आहे. गरज भासल्यास अधिक निधी उपलब्ध करून दिला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

Comments
Add Comment

Mumbai Crime News : ओला कारमधून उतरले अन् थेट गोळीबार! वडाळ्यात नेमकं काय घडलं?

वडाळा: मुंबईतील वडाळा पश्चिम परिसरात एसआयडब्ल्यूएस कॉलेजजवळ शनिवारी रात्री गोळीबाराची घटना घडली. ओला कॅबमधून

Flex Free Mumbai : फ्लेक्समुक्त मुंबई… महापौर निघाल्या मैलाचा दगड पार करायला!

सचिन धानजी मुंबईच्या महापौर रितू तावडे यांनी अनधिकृत फ्लेक्स बॅनर्स, पोस्टर्स आणि स्टिकर्स हटविण्यासाठी

BMC Banner Removal Drive : मागील १५ दिवसांमध्ये ५२ हजार ४४८ बॅनर, फ्लेक्स, पोस्टर्स हटवले

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबईचे विद्रूपीकरण रोखण्यासाठी आणि सार्वजनिक ठिकाणी अनधिकृत जाहिरात फलक

Mumbai Footpath Encroachment : पदपथांचा व्यावसायिक वापर करणाऱ्यांवर कठोर कारवाई करणार, महापालिका आयुक्तांनी दिले कारवाईचे थेट आदेश

मुंबई (विशेष प्रतिनिधी) पदपथांचा कोणत्याही प्रकारे व्यावसायिक वापर होता कामा नये, काटेकोर दक्षता घ्यावी.

BMC : मुंबईतील ५०० किलोमीटर रस्ते अतिक्रमणमुक्त,‘पादचारी प्रथम’ विशेष अभियानात आतापर्यंत हटवली २८०३ अतिक्रमणे

मुंबई (विशेष प्रतिनिधी) मुंबई महानगरपालिकेने ‘पादचारी प्रथम’ (पेडिस्ट्रीयन फर्स्ट) हे विशेष अभियान हाती असून या

कांदिवली रेल्वे स्थानकात हायव्होल्टेज ड्रामा! हुज्जत घालताना महिला टीसीचे कपडे फाटले; GRP, RPF पोलिसांचा हस्तक्षेप

मुंबई: पश्चिम रेल्वे मार्गावर महिला टीसीची आणि विनातिकिट प्रवास करणाऱ्या महिलेमध्ये जोरदार वाद झाल्याची घटना