तीन कोटींपेक्षा अधिक मुद्रांक शुल्क बुडविल्याप्रकरणी मुंबईचे सह-दुय्यम निबंधक निलंबित

मुंबई : शासनाचे ३ कोटी ८२ लाख रुपयांचे मुद्रांक शुल्क (स्टॅम्प ड्युटी) बुडवून नियमबाह्य नोंदणी केल्याप्रकरणी मुंबई ३१ चे सह-दुय्यम निबंधक ईश्वर डी. देवशी यांना निलंबित करण्यात येत असल्याची घोषणा महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज विधानसभेत केली. या प्रकरणाची विभागीय चौकशी येत्या तीन महिन्यांत पूर्ण करून दोषींवर कठोर कारवाई केली जाईल, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
आमदार रत्नाकर गुट्टे यांनी लक्षवेधी सूचनेद्वारे या गंभीर घोटाळ्याकडे सभागृहाचे लक्ष वेधले होते. यावर उत्तर देताना महसूलमंत्र्यांनी सरकारची भूमिका मांडली.


जुहू येथील एका मिळकतीचे मुद्रांक शुल्क मुंबई ३१ चे सह-दुय्यम निबंधक ईश्वर डी. देवशी यांनी पदाचा गैरवापर करत वसुली न करता चुकीच्या पद्धतीने रजिस्ट्रेशन केले होते. यामध्ये शासनाचा ३ कोटी ८२ लाख रुपयांचा महसूल बुडाला असल्याचे प्राथमिक तपासात आढळले आहे. या गंभीर दोषारोपामुळे देवशी यांना निलंबित करून त्यांची चौकशी सुरू करण्यात आली आहे.


* विभागीय चौकशी आणि फौजदारी कारवाई :  निलंबन ही केवळ प्रक्रियेचा भाग असून चौकशीत अडथळा निर्माण होऊ नये म्हणून ही कारवाई केली आहे. खरा दोष विभागीय चौकशीत सिद्ध होईल. तीन महिन्यांत अहवाल प्राप्त झाल्यानंतर देवशी यांच्यावर केवळ निलंबनच नव्हे, तर त्यापेक्षाही कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल," असे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले. या प्रकरणात फौजदारी गुन्हे दाखल करण्याबाबतही सरकार सकारात्मक विचार करत असल्याचे बावनकुळे यांनी सांगितले.


* १०० कोटींची मालमत्ता शासनजमा करणार : घोटाळ्याशी संबंधित असलेल्या मालमत्तेची बाजारपेठीय किंमत सुमारे १०० कोटी रुपये आहे. हे मुद्रांक शुल्क वसूल करण्यासोबतच ती मालमत्ता शासनजमा कशी करता येईल, यादृष्टीने प्रशासकीय कार्यवाही सुरू झाली आहे. बुडालेला ३ कोटी ८२ लाखांचा महसूल सरकार कोणत्याही परिस्थितीत वसूल करेल, असेही महसूलमंत्र्यांनी ठामपणे सांगितले.

Comments
Add Comment

Ram Mansion Purchase : सिद्धिविनायक मंदिराजवळीम राम मेन्शनच्या खरेदी व्यवहाराला परवानगी

मुंबई : प्रभादेवी येथील श्री सिद्धिविनायक गणपती मंदिराला लागून असलेल्या राम मेन्शन सहकारी गृहनिर्माण

मतदार यादीत नाव नोंदणीसाठी राज्यात विशेष मोहीम; 17, 18 आणि 24, 25 ऑक्टोबर रोजी मतदान केंद्रांवर शिबिरे

मुंबई : राज्यातील एकाही पात्र नागरिकाचे नाव मतदार यादीत समाविष्ट होण्यापासून वंचित राहू नये, या महत्त्वाच्या

BMC News : वरळीतील सांडपाण्यावर बायोगॅसपासून वीज निर्मिती; प्रकल्प काम 63 टक्के पूर्ण

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई मलनिस्सारण प्रकल्पांतर्गत वरळी येथे उभारण्यात येत असलेल्या 500 दशलक्ष लीटर

मुंबई उपनगरातील तीन नवीन कोळीवाड्यांचे होणार सीमांकन; राज्य सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय

मुंबई शहर व उपनगरातील कोळीवाड्यांचे सीमांकन अधिक स्पष्ट व सर्वसमावेशक करण्याच्या दृष्टीने फडणवीस सरकारने

BMC School News : राज्याचे मुख्यमंत्री तसेच सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त सर न्यायाधीश साकारणार शिक्षकांची भूमिका

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : स्मार्ट नागरिक’ हा नागरिकशास्त्र आणि घटनात्मक मूल्यांवरील अभ्यासक्रम तसेच डॉ.

शिवसेनेचा यंदाचा ऐतिहासिक दसरा मेळावा दुष्काळग्रस्तांना समर्पित; शेतकऱ्यांच्या मदतीसाठी विविध उपक्रमांची घोषणा

मुंबई : राज्यात सध्या भीषण दुष्काळाचे सावट पसरले असून, या गंभीर संकटाचा सामना करणाऱ्या बळीराजाच्या पाठीशी