नाशिक म्हाडाच्या २० टक्के घरकुल योजनेतील कारभाराचे उच्चस्तरीय चौकशीचे आदेश

 महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची घोषणा


दोनशेपेक्षा अधिक विकासकांवर गुन्हे


मुंबई :  नाशिक शहरात गरिबांसाठीच्या हक्काच्या घरांवर डल्ला मारण्यासाठी विकासक आणि महसूल अधिकाऱ्यांनी संगनमताने 'कार्टेल' तयार करून मोठा घोटाळा केल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. या प्रकरणी २०० हून अधिक विकासकांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात आले असून, या संपूर्ण प्रकरणाची एका महिन्याच्या आत उच्चस्तरीय समितीमार्फत चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई केली जाईल, अशी घोषणा महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज विधानसभेत केली.


आमदार देवयानी फरांदे यांनी लक्ष्यवेधी सूचनेद्वारे नाशिकमधील म्हाडाच्या २० टक्के राखीव भूखंड प्रकरणातील भ्रष्टाचाराचा मुद्दा उपस्थित केला होता. त्यावर उत्तर देताना महसूलमंत्र्यांनी या प्रकरणाची व्याप्ती मोठी असल्याचे मान्य केले.



काय आहे 'प्लॉट स्प्लिटिंग' घोटाळा ?


शासनाच्या २०१३ च्या धोरणानुसार, ४००० चौरस मीटरपेक्षा जास्त क्षेत्राच्या लेआऊटमध्ये २० टक्के जागा आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक (EWS) आणि अल्प उत्पन्न गटासाठी (LIG) म्हाडाला देणे बंधनकारक आहे. मात्र, नाशिकमध्ये विकासकांनी ही जागा द्यावी लागू नये म्हणून जमिनीचे ४००० मीटरपेक्षा कमी क्षेत्राचे लहान तुकडे पाडले. विशेष म्हणजे, जमिनीचा मालक एकच असतानाही केवळ कागदोपत्री तुकडे करून २० टक्के आरक्षणातून पळवाट काढण्यात आली. "एकाच दिवशी जमिनीचे पाच-पाच तुकडे करून मंजुरी मिळवण्याची मग्रूरी या कार्टेलने दाखवली आहे," असे मंत्री बावनकुळे यांनी यावेळी सभागृहात सांगितले.



उच्चस्तरीय चौकशी समितीची स्थापना


या घोटाळ्याची सखोल चौकशी करण्यासाठी महसूलमंत्र्यांनी पाच ते सात वरिष्ठ अधिकाऱ्यांची समिती जाहीर केली आहे. यामध्ये पुणे विभागाचे विभागीय आयुक्त, जमाबंदी आयुक्त (पुणे), नाशिकचे पोलीस आयुक्त ( संदीप कर्णिक ), नगररचना विभागाचे संचालक (ADTP) यांचा समावेश असेल. ही समिती महिनाभरात आपला अहवाल सादर करेल.



अधिकाऱ्यांवरही होणार कठोर कारवाई


"केवळ विकासकच नव्हे, तर या प्रकरणाला खतपाणी घालणारे भूमी अभिलेख विभाग, नगररचना विभाग आणि म्हाडाचे अधिकारीही तितकेच दोषी आहेत. ज्या अधिकाऱ्यांच्या सह्यांनी हे बनावट नकाशे मंजूर झाले, त्यांच्यावरही गुन्हे दाखल केले जातील. गरिबांचा हक्क हिरावून घेणाऱ्या एकाही व्यक्तीला सोडले जाणार नाही," असा इशारा महसूलमंत्री बावनकुळे यांनी दिला.

Comments
Add Comment

MahaIT : महाआयटीच्या प्रणाली अद्ययावतीकरणामुळे शासकीय ऑनलाइन सेवा १६ ते २० ऑक्टोबरदरम्यान तात्पुरत्या बंद

मुंबई : महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ मर्यादित (महाआयटी) मार्फत विकसित आणि देखरेख करण्यात येणाऱ्या राज्य

महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा २०२६ जाहीर; हाँगकाँग, उत्तराखंड आणि सांगलीच्या मंडळांची बाजी!

मुंबई : राज्यात उत्साहात पार पडलेल्या ‘म

Ram Mansion Purchase : सिद्धिविनायक मंदिराजवळीम राम मेन्शनच्या खरेदी व्यवहाराला परवानगी

मुंबई : प्रभादेवी येथील श्री सिद्धिविनायक गणपती मंदिराला लागून असलेल्या राम मेन्शन सहकारी गृहनिर्माण

मतदार यादीत नाव नोंदणीसाठी राज्यात विशेष मोहीम; 17, 18 आणि 24, 25 ऑक्टोबर रोजी मतदान केंद्रांवर शिबिरे

मुंबई : राज्यातील एकाही पात्र नागरिकाचे नाव मतदार यादीत समाविष्ट होण्यापासून वंचित राहू नये, या महत्त्वाच्या

BMC News : वरळीतील सांडपाण्यावर बायोगॅसपासून वीज निर्मिती; प्रकल्प काम 63 टक्के पूर्ण

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई मलनिस्सारण प्रकल्पांतर्गत वरळी येथे उभारण्यात येत असलेल्या 500 दशलक्ष लीटर

मुंबई उपनगरातील तीन नवीन कोळीवाड्यांचे होणार सीमांकन; राज्य सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय

मुंबई शहर व उपनगरातील कोळीवाड्यांचे सीमांकन अधिक स्पष्ट व सर्वसमावेशक करण्याच्या दृष्टीने फडणवीस सरकारने