सौरव गांगुली बनला जॅक्सन ग्रुपचा पहिल्या ब्रँड अ‍ॅम्बेसेडर

 नेतृत्‍व स्‍थान अधिक दृढ करण्‍यासह शाश्वत विकासाला गती देणार


मुंबई : जॅक्‍सन ग्रुप या भारतातील आघाडीच्‍या ऊर्जा व पायाभूत सुविधा समूहाने माजी भारतीय क्रिकेट कर्णधार व प्रख्‍यात लीडर सौरव गांगुली यांच्‍यासोबत धोरणात्‍मक सहयोगाची घोषणा केली. भारत झपाट्याने आपल्‍या अक्षय ऊर्जा महत्त्वाकांक्षांना पूर्ण करण्‍याच्‍या दिशेने वाटचाल करत असताना हा सहयोग करण्‍यात आला आहे. या सहयोगामधून नाविन्‍यता, व्‍याप्‍ती आणि शाश्वत उपाययोजनांच्‍या माध्‍यमातून देशाच्‍या ऊर्जा परिवर्तनाला गती देण्‍याप्रती जॅक्‍सनची कटिबद्धता दिसून येते.


आठ दशकांहून अधिक काळाचा वारसा असलेल्‍या जॅक्‍सन ग्रुपने विश्वास, स्थिरता आणि दूरगामी नाविन्‍यतेला सतत पाठिंबा दिला आहे. गांगुली यांचे परिवर्तनात्‍मक नेतृत्‍व आणि मापदंडांना नव्‍या उंचीवर घेऊन जाण्‍याच्‍या क्षमतेमधून प्रेरणा घेत कंपनीचा सुस्‍पष्‍टता व अंमलबजावणी उत्‍कृष्टतेसह भविष्‍याकरिता सुसज्‍ज ऊर्जा व पायाभूत सुविधा सोल्‍यूशन्‍स देणारी विश्वासार्ह सहयोगी म्‍हणून आपले स्‍थान अधिक दृढ करण्‍याचा मनसुबा आहे.


या सहयोगाचा भाग म्‍हणून सौरव गांगुली प्रमुख ब्रँड मोहिमा आणि धोरणात्‍मक उपक्रमांमध्‍ये जॅक्‍सन ग्रुपचे प्रतिनिधीत्‍व करतील, ज्‍यासह अधिक शुद्ध व अधिक शाश्वत ऊर्जा परिसंस्‍था सक्षम करण्‍याच्‍या कंपनीच्‍या दृष्टिकोनाला अधिक दृढ करतील.


या सहयोगाबाबत मत व्‍यक्त करत जॅक्‍सन ग्रुपचे अध्‍यक्ष श्री. समीर गुप्‍ता म्‍हणाले, ''आम्‍हाला जॅक्‍सन परिवारामध्‍ये 'दादा' यांचे स्‍वागत करताना आनंद होत आहे. सौरव गांगुली नेतृत्‍व, स्थिरता व कार्यक्षमतेचे प्रतीक आहेत आणि ही मूल्‍ये आमच्‍याशी सखोलपणे संलग्‍न आहेत. या सहयोगामधून पुढे राहण्‍यासह सतत उत्तम कामगिरी करत राहण्‍याप्रती आमचा समान विश्वास दिसून येतो. त्‍यांच्‍या विश्वसनीयतेसह आम्‍हाला विश्वास आहे की हा सहयोग आमच्‍या ब्रँडला अधिक प्रबळ करेल, तसेच भारतात व जगभरात आमच्‍या शाश्वत उपाययोजनांच्‍या अवलंबनाला गती देईल.'' ते पुढे म्‍हणाले, ''आमचा विकास प्रबळ नेतृत्‍वामध्‍ये सामावलेला आहे, ज्‍याला उपाध्‍यक्ष श्री. संदीप गुप्‍ता आणि जॅक्‍सन ग्रीनचे उपाध्‍यक्ष व ग्‍लोबल सीईओ श्री. बिकेश ओग्रा यांचे पाठबळ आहे. तसेच, पुढील पिढी ग्रुपला पुढे घेऊन जात आहे.''


या सहयोगाबाबत मत व्‍यक्त करत श्री. सौरव गांगुली म्‍हणाले, ''वितरित ऊर्जा, सौर ऊर्जा, ग्रीन मॉलिक्युल्स आणि वीज, मेट्रो, नागरी बांधकाम व पाणी यांचा समावेश असलेल्‍या पायाभूत सुविधा या संपूर्ण मूल्य साखळीतील जॅक्सनचा दृष्टिकोन अत्‍यंत प्रभावी असण्‍यासोबत अत्‍यंत योग्‍य वेळी आखण्‍यात आला आहे. भारताच्या ऊर्जा परिवर्तन आणि हरित भविष्यासाठी अर्थपूर्ण योगदान देणाऱ्या या ब्रँडसोबत सहयोग करताना मला खूप आनंद होत आहे.''


हा उपक्रम जॅक्सनच्या एकात्मिक व्यवसाय मॉडेलला अधिक दृढ करतो, ज्यामध्ये उत्पादन, प्रकल्प विकास, ईपीसी आणि ओअँडएम सेवांचा समावेश आहे. आपल्या विस्तार धोरणाला अनुसरून कंपनी दीर्घकालीन शाश्वततेसाठी कर्मचारी आणि तंत्रज्ञान यांवर देखील विशेष लक्ष केंद्रित करत आहे.


आठ दशकांहून अधिक काळाचा वारसा असलेला जॅक्सन ग्रुप नाविन्‍यता, ग्राहक-केंद्रित दृष्टिकोन आणि स्वच्छ भविष्य घडवण्याच्या दृढ कटिबद्धतेच्‍या माध्‍यमातून भारताच्या बदलत्या ऊर्जा आणि पायाभूत सुविधांच्या क्षेत्रात महत्त्वपूर्ण भूमिका बजावत आहे.

Comments
Add Comment

India vs Zimbabwe Women T20: स्मृती मंधानाच्या नेतृत्वात पहिली टी20 मालिका, कधी आहे सामना जाणून घ्या सर्वकाही

भारत आणि झिम्बाब्वे महिला क्रिकेट संघात आंतरराष्ट्री क्रिकेटमध्ये पहिल्यांदाच टी20 मालिका खेळली जाणार आहे. तीन

अर्शदीप सिंगला दुखापत; सुनील गावस्कर शमार जोसेफवर संतापले! नेमकं काय म्हणाले?

हैदराबाद : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील रंगतदार मालिकेतील चौथ्या टी-20 सामन्यात वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगला

भारतीय फुटबॉलचे भविष्य बदलणार? केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे आणि रोनाल्डो नाझारिओ भेट चर्चेत

नवी दिल्ली : भारतातील क्रीडा परिसंस्थेला अधिक बळकट करण्यासाठी आणि तरुण फुटबॉलपटूंना जागतिक स्तरावर

AUS vs SA Test : ऑस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण आफ्रिकेचा मोठा निर्णय! ब्रिट्झकेला संधी, रबाडाचे पुनरागमन?

डर्बन (दक्षिण आफ्रिका) : ऑस्ट्रेलियाविरुद्ध डर्बन येथे झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यात दक्षिण आफ्रिकेला 214

PM Modi : सुवर्णपदकाची ऐतिहासिक कमाई! जपानमधील विजयानंतर पंतप्रधान मोदींनी घेतली भारतीय क्रिकेट संघांची भेट

नवी दिल्ली : जपानमधील आयची-नागोया येथे नुकत्याच पार पडलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धा २०२६ (Asian Games 2026) मध्ये भारताच्या

BGMI खेळताना मोबाईल हँग होतोय? आता टेन्शन विसरा! भारतात लवकरच येतोय BGMI Air; प्री रजिस्ट्रेशनला सुरुवात

भारतात BGMI या गेमचे तरुणांमध्ये प्रचंड वेड आहे. २०२१ मध्ये जेव्हा हा गेम लाँच झाला अगदी तेव्हापासून