अंबरनाथमध्ये चिमुकलीवर भटक्या कुत्र्याचा हल्ला; पण भावाला वाचवलं

अंबरनाथ : भटक्या कुत्र्यांच्या वाढत्या त्रासाचे आणखी एक गंभीर उदाहरण अंबरनाथमधून समोर आले आहे. श्वानाने लहान भावावर हल्ला केला त्यावेळी बहीण पुढे सरसावली. बहिणीने धाकट्या भावाचे रक्षण केले. भावाला वाचवण्याच्या प्रयत्नात बहीण जखमी झाली.


मंगळवारी (१० मार्च ) सकाळच्या सुमारास ही घटना घडली. भाऊ-बहिण घरी परतत असताना अचानक एका भटक्या कुत्र्याने लहान मुलावर झडप घातली. प्रसंगावधान राखत बहिणीने तात्काळ भावाला दूर केले.याच दरम्यान कुत्र्याने आपला रोख बदलत तिच्यावर हल्ला केला. तरीही तिने भावाला सुरक्षित ठेवण्याचा प्रयत्न सुरूच ठेवला. या झटापटीत ती गंभीर जखमी झाली.


मुलीने आणि तिच्या भावाचा आरडाओरडा ऐकून परिसरातील नागरिकांनी तातडीने धाव घेतली आणि दोन्ही मुलांची सुटका केली. संपूर्ण प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला असून त्याचा व्हिडीओही समोर आला आहे.


या घटनेनंतर स्थानिक नागरिकांनी प्रशासनाच्या कामकाजावर प्रश्न उपस्थित करत नाराजी व्यक्त केली. भटक्या कुत्र्यांवर नियंत्रणासाठी ठोस उपाययोजना करण्याची मागणी करण्यात येत आहे.


दरम्यान, नगर परिषद प्रशासनाने घटनेची दखल घेत परिसरातील काही कुत्र्यांना ताब्यात घेऊन त्यांच्या निर्बीजीकरण आणि लसीकरणाची प्रक्रिया सुरू केली आहे. मात्र शहरातील वाढत्या भटक्या श्वानांच्या समस्येवर दीर्घकालीन उपाययोजना करण्याची गरज पुन्हा अधोरेखित झाली आहे.

Comments
Add Comment

Mumbai Railway Megablock: प्रवाशांनो कृपया लक्ष असुद्या! रविवारी तीन मार्गिकेवर 'मेगा ब्लॉक'; जाणून घ्या सर्व अपडेट

मुंबई: मध्य रेल्वेच्या मुंबई विभागात विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे करण्यासाठी रविवार दिनांक 18 ऑक्टोबर

BMC News : गोरेगाव-मुलुंड जोड रस्ता प्रकल्पासाठी मोठी कारवाई! मुलुंडमध्ये आणखी २१५ बांधकामे हटवली

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबईच्या पश्चिम आणि पूर्व उपनगरांना जोडून उपनगरांतील वाहतूक कोंडी कमी करण्याच्या

संविधानाची मूल्ये विद्यार्थ्यांमध्ये रुजविणे ही काळाची गरज, मुख्यमंत्र्यांचे प्रतिपादन

मुंबई (विशेष प्रतिनिधी): भारतीय संविधान हे केवळ एक दस्तऐवज नसून त्यातील तत्वे प्रत्यक्ष जीवनात उतरविणे महत्चसचे

Saudi Arabia Flight Update : सौदी अरेबियासाठी विमानसेवा रद्द! IndiGo आणि Akasa Air चा मोठा निर्णय; प्रवाशांनी लक्ष द्या

नवी दिल्ली : पश्चिम आशियातील वाढत्या तणाव आणि सुरक्षा परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर, इंडिगो आणि अकासा एअर या

Weather Alert: हवामानाचा मोठा इशारा! उद्या 16 राज्यांत पावसाचा रेड अलर्ट, नागरिकांना सतर्कतेचा इशारा

देश: हवामान विभागाने पुन्हा एकदा 16 राज्यांना रेड अलर्ट जारी केला आहे. हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार, 17

Palm Jaggery Export : भारताच्या सेंद्रिय पामिरा गुळाची बल्गेरियाला पहिली निर्यात; 1.755 टनांची खेप रवाना

नवी दिल्ली : भारताच्या पारंपरिक आणि पौष्टिक अन्नपदार्थांनी आता जागतिक पातळीवर आपली पाळेमुळे घट्ट करण्यास