IPL 2026 : ...म्हणून आयपीएलचा उद्घाटन सोहळा रद्द; बीसीसीआयने घेतला मोठा निर्णय

मुंबई : आयपीएल २०२६ ची सुरुवात २८ मार्चपासून होणार असली तरी यंदा स्पर्धा कोणत्याही उद्घाटन सोहळ्याशिवाय सुरू होणार आहे. बंगळुरूच्या एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू (RCB) आणि सनरायझर्स हैदराबाद (SRH) यांच्यात पहिला सामना खेळला जाणार आहे. मात्र, बीसीसीआयने यंदा ओपनिंग सेरिमनी रद्द करण्याचा महत्वाचा निर्णय घेतला आहे.



म्हणून उद्घाटन सोहळा रद्द :


मिळालेल्या माहितीनुसार, ४ जून २०२५ रोजी बंगळुरूमध्ये घडलेल्या चेंगराचेंगरीच्या दुर्दैवी घटनेत ११ जणांचा मृत्यू झाला होता. या घटनेतील मृतांना श्रद्धांजली वाहण्यासाठी बीसीसीआयने आयपीएलच्या १९व्या हंगामाचा उद्घाटन सोहळा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.



उद्घाटन सोहळा रद्द मात्र समारोप सोहळ्याचे भव्य आयोजन :


बीसीसीआयचे सचिव देवजित सैकिया यांनी स्पष्ट केले की, या दुःखद घटनेच्या पार्श्वभूमीवर उद्घाटन दिवशी कोणताही सांस्कृतिक किंवा मनोरंजन कार्यक्रम आयोजित केला जाणार नाही. मात्र, स्पर्धेच्या अखेरीस म्हणजेच ३१ मे रोजी अंतिम सामन्यादिवशी भव्य समारोप सोहळा आयोजित करण्याची योजना आहे.


विशेष म्हणजे, यापूर्वीही २०१९ मध्ये पुलवामा हल्ला झाल्यानंतर आयपीएलचा उद्घाटन सोहळा रद्द करण्यात आला होता आणि त्या निधीचा उपयोग शहीद जवानांच्या कुटुंबीयांसाठी करण्यात आला होता.


आता आयपीएल २०२६ ची सुरुवात सध्या पद्धतीने होणार असली तरी समारोप सोहळा मात्र भव्य स्वरूपात होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Comments
Add Comment

India vs Zimbabwe Women T20: स्मृती मंधानाच्या नेतृत्वात पहिली टी20 मालिका, कधी आहे सामना जाणून घ्या सर्वकाही

भारत आणि झिम्बाब्वे महिला क्रिकेट संघात आंतरराष्ट्री क्रिकेटमध्ये पहिल्यांदाच टी20 मालिका खेळली जाणार आहे. तीन

अर्शदीप सिंगला दुखापत; सुनील गावस्कर शमार जोसेफवर संतापले! नेमकं काय म्हणाले?

हैदराबाद : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील रंगतदार मालिकेतील चौथ्या टी-20 सामन्यात वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगला

भारतीय फुटबॉलचे भविष्य बदलणार? केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे आणि रोनाल्डो नाझारिओ भेट चर्चेत

नवी दिल्ली : भारतातील क्रीडा परिसंस्थेला अधिक बळकट करण्यासाठी आणि तरुण फुटबॉलपटूंना जागतिक स्तरावर

AUS vs SA Test : ऑस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण आफ्रिकेचा मोठा निर्णय! ब्रिट्झकेला संधी, रबाडाचे पुनरागमन?

डर्बन (दक्षिण आफ्रिका) : ऑस्ट्रेलियाविरुद्ध डर्बन येथे झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यात दक्षिण आफ्रिकेला 214

PM Modi : सुवर्णपदकाची ऐतिहासिक कमाई! जपानमधील विजयानंतर पंतप्रधान मोदींनी घेतली भारतीय क्रिकेट संघांची भेट

नवी दिल्ली : जपानमधील आयची-नागोया येथे नुकत्याच पार पडलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धा २०२६ (Asian Games 2026) मध्ये भारताच्या

BGMI खेळताना मोबाईल हँग होतोय? आता टेन्शन विसरा! भारतात लवकरच येतोय BGMI Air; प्री रजिस्ट्रेशनला सुरुवात

भारतात BGMI या गेमचे तरुणांमध्ये प्रचंड वेड आहे. २०२१ मध्ये जेव्हा हा गेम लाँच झाला अगदी तेव्हापासून