Iran-US-Israel War : कुवैत इंटरनॅशनल विमानतळावर ड्रोन हल्ला; इंधन टाकीला आग

आखाती देशाच्या उड्डाण मंत्रालयाने बुधवारी (२५ मार्च) दिलेल्या माहितीनुसार कुवेत इंटरनॅशनल विमानतळावर ड्रोनद्वारे हल्ला करण्यात आला. यावेळी इंधन टाकीला आग लागली. या घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही.


प्राथमिक माहितीनुसार, नागरी उड्डाण महासंचालनालयाने ऑनलाइन जारी केलेल्या निवेदनात सांगितले की या हल्ल्यात फक्त “मर्यादित” नुकसान झाले आहे. प्रवक्ते अब्दुल्ला अल-राजही यांनी सांगितले की संबंधित अधिकाऱ्यांनी तात्काळ आपत्कालीन प्रक्रिया लागू केल्या आणि आग नियंत्रणात आणण्यासाठी अग्निशमन दलाला तैनात करण्यात आले.


इराण अमेरिका इस्रायल यांच्यात युद्ध सुरु झाल्यापासून कुवैत विमानतळावर अनेक वेळा हल्ले झाले आहेत. १४ मार्च रोजी नागरी उड्डाण प्राधिकरणाने सांगितले होते की अनेक ड्रोनद्वारे करण्यात आलेल्या हल्ल्यात विमानतळाला लक्ष्य करण्यात आले आणि त्याच्या रडार प्रणालीवरही हल्ला झाला. त्या घटनेतही कोणतीही जीवितहानी झाली नव्हती.


यापूर्वी ८ मार्च रोजी ड्रोनने विमानतळावरील इंधन टाक्यांना लक्ष्य केले होते. तसेच त्याआधी प्रवासी टर्मिनलवर झालेल्या एका हल्ल्यात काही लोक किरकोळ जखमी झाले होते आणि काही प्रमाणात नुकसानही झाले होते.

Comments
Add Comment

Nepal Floods : मृतांचा आकडा ९०३ वर तर ४,२४७ बेपत्ता; बचावकार्य युद्धपातळीवर सुरू

काठमांडू : नेपाळच्या रसुवा जिल्ह्यात आलेल्या विनाशकारी पुरानंतर मदत, शोध आणि बचावकार्य सातत्याने सुरू आहे.

Nepal Floods : नेपाळच्या महापुरात बँक बुडाली, पण आत सापडला कोट्यवधींचा खजिना; ५० कोटींचे सोने, रोकड आणि चांदी सुरक्षित बाहेर

काठमांडू : नेपाळमध्ये भोटेकोशी नदीला आलेल्या भीषण पुरामुळे मोठ्या प्रमाणात हाहाकार माजला आहे. पूर आणि

PM Modi SCO Summit : बिश्केकमध्ये पंतप्रधान मोदींची पुतीन, पेझेश्कियन यांच्याशी भेट; वर्ल्ड नोमॅड गेम्सच्या उद्घाटन सोहळ्यालाही उपस्थिती

बिश्केक : पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या किर्गिस्तानच्या दौऱ्यावर असून, बिश्केक येथे होणाऱ्या शांघाय कोऑपरेशन

US Iran Conflict : अमेरिकेच्या हल्ल्याला इराणचा पलटवार; जॉर्डनमधील अमेरिकन लष्करी तळांवर क्षेपणास्त्र हल्ला, होर्मुजमध्ये तणाव वाढला

तेहरान : अमेरिका आणि इराणमधील संघर्ष पुन्हा एकदा चिघळला आहे. अमेरिकेने इराणच्या लारक बेटावरील दोन रॉकेट

North Cyprus Ferry Accident : मोठी बातमी! २७० प्रवाशांना घेऊन जाणारी फेरी बोट उलटली; १०० हून अधिक जणांची सुटका, बचावकार्य सुरू

उत्तर सायप्रस : उत्तर सायप्रसच्या किनाऱ्याजवळ आज दुपारी मोठी दुर्घटना घडली. २७० प्रवाशांना घेऊन जाणारी प्रवासी

Switzerland Rave Shooting : स्वित्झर्लंडमध्ये रेव्ह पार्टीत अंदाधुंद गोळीबार; एकाचा मृत्यू, पाच गंभीर जखमी

बर्न : स्वित्झर्लंडमधील आराऊ शहरात रविवारी पहाटे रेव्ह पार्टीदरम्यान झालेल्या अंदाधुंद गोळीबारात एका