PM Narendra Modi : जगात मोदींचीच हवा! पंतप्रधान मोदी पुन्हा एकदा बनले जगातील सर्वात लोकप्रिय नेते

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा एकदा जागतिक स्तरावर सर्वाधिक लोकप्रिय नेते म्हणून समोर आले आहेत. अमेरिकेतील डेटा अॅनालिटिक्स संस्था मॉर्निंग कन्सल्टच्या ताज्या सर्वेक्षणानुसार, पंतप्रधान मोदींना ६८ टक्के अप्रूव्हल रेटिंग मिळून ते जगातील अव्वल नेत्यांच्या यादीत पहिल्या स्थानावर कायम आहेत.



पुन्हा एकदा पंतप्रधान मोदी अव्वल :


२ ते ८ मार्चदरम्यान मॉर्निंग कन्सल्टने केलेल्या सर्वेक्षणात पंतप्रधान मोदी आपल्या जागतिक समकक्षांपेक्षा मोठ्या फरकाने आघाडीवर असल्याचे दिसून आले. सलग तिसऱ्यांदा सत्तेत असूनही त्यांची लोकप्रियता आणि मजबूत नेतृत्व कायम असल्याचे या क्रमवारीतून स्पष्ट होते. तर दुसरीकडे, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना या यादीतील टॉप-१० मध्येही स्थान मिळू शकलेले नाही.



स्वित्झर्लंड - दक्षिण कोरियामध्ये टाय :


पंतप्रधान मोदींनंतर दुसऱ्या स्थानावर स्वित्झर्लंडचे राष्ट्राध्यक्ष गाय पार्मेलिन आणि दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष ली जे-म्युंग यांचा क्रमांक लागतो. या दोघांनाही ६२-६२ टक्के अप्रूव्हल रेटिंग मिळाली आहे. तिसऱ्या आणि चौथ्या स्थानावर अनुक्रमे झेक प्रजासत्ताक आणि अर्जेंटिनाचे नेते असून त्यांना अनुक्रमे ५७ आणि ५६ टक्के अप्रूव्हल रेटिंग मिळाली.


इतर जागतिक नेत्यांबद्दल बोलायचे झाल्यास, ब्रिटनचे पंतप्रधान कीअर स्टार्मर यांना २४ टक्के तर फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रों यांना केवळ १७ टक्के अप्रूव्हल रेटिंग मिळाली असून ते यादीत खूप मागे राहिले आहेत.



सर्वाधिक काळ सेवा देणारे प्रमुख :


दरम्यान, पंतप्रधान मोदींनी अलीकडेच भारतीय राजकारणात एक ऐतिहासिक टप्पा गाठला आहे. गुजरातचे मुख्यमंत्री आणि भारताचे पंतप्रधान म्हणून त्यांच्या कार्यकाळाचा एकत्रित कालावधी ८,९३१ दिवसांवर पोहोचला असून ते देशातील सर्वाधिक काळ सेवा देणारे प्रमुख ठरले आहेत.


मॉर्निंग कन्सल्टची ही रेटिंग विविध देशांतील प्रौढ नागरिकांच्या मतांवर आधारित सात दिवसांच्या ‘मूव्हिंग अॅव्हरेज’ पद्धतीने तयार केली जाते.

Comments
Add Comment

प्रेमासाठी काय पण ! 75 वर्षीय रामसुगर 30 वर्षांच्या रानी राजपूतशी बांधणार लग्नगाठ, साखपुड्याचा व्हिडीओ व्हायरल

उत्तर प्रदेश : प्रेमाला वयाचं बंधन नसतं, असं म्हटलं जातं. उत्तर प्रदेशातील औरैया जिल्ह्यातील एका अनोख्या

Saurabh Rajput Murder Case : सौरभ राजपूत हत्या प्रकरणात फाशीची शिक्षा; निर्भया प्रकरणातील जल्लाद पवन यांची प्रतिक्रिया, म्हणाले...

Saurabh Rajput Murder Case: मेरठमधील सौरभ राजपूत हत्या प्रकरणात मुस्कान रस्तोगी आणि साहिल शुक्ला यांना फाशीची शिक्षा सुनावण्यात

Supreme Court Verdict : धर्मांतरानंतर आरक्षण मिळणार का? सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय

नवी दिल्ली : धर्मांतर केलेल्या व्यक्तीला पूर्वीच्या धर्मातील सामाजिक मागासलेपणाच्या आधारे आरक्षण किंवा विशेष

दिवाळीपूर्वी रेल्वे कर्मचाऱ्यांची चांदी! ७८ दिवसांच्या बोनसची घोषणा

रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! केंद्रीय मंत्रिमंडळाने बुधवारी (१४ ऑक्टोबर) सुमारे ११.४ लाख रेल्वे

PM Modi : सुवर्णपदकाची ऐतिहासिक कमाई! जपानमधील विजयानंतर पंतप्रधान मोदींनी घेतली भारतीय क्रिकेट संघांची भेट

नवी दिल्ली : जपानमधील आयची-नागोया येथे नुकत्याच पार पडलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धा २०२६ (Asian Games 2026) मध्ये भारताच्या

भीषण रस्ते अपघात! ओडिसामध्ये कार, ट्रक आणि दुचाकींच्या धडकेत एका महिलेचा मृत्यू, 7-8 जण गंभीर जखमी

ओडिसा : ओडिसातील गंजाम जिल्ह्यात बुधवारी एक अत्यंत भीषण आणि मनावढावा टाकणारा रस्ते अपघात घडला. चामाखंडी