जालन्यात इंधन वितरणावर निर्बंध; पोलीस बंदोबस्तात पेट्रोल-डिझेल वाटप

जालना: जालना शहरात पेट्रोल आणि डिझेलच्या तुटवड्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. साठा कमी पडत असल्यामुळे शहरातील अनेक पेट्रोल पंप बंद ठेवण्यात आले आहेत. दरम्यान, चौधरी नगर भागातील एका पेट्रोल पंपावर मोठी गर्दी उसळल्याने तेथे पोलीस बंदोबस्तात पेट्रोल-डिझेलचे वितरण सुरू करण्यात आले आहे.


जालना जिल्हा पुरवठा विभागाने परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी काही निर्बंध लागू केले आहेत. दुचाकी वाहनांसाठी दोनशे रुपयांपर्यंत तर तीन आणि चारचाकी वाहनांसाठी सातशे रुपयांपर्यंत पेट्रोल-डिझेल देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तसेच कॅन आणि बाटल्यांमध्ये इंधन देण्यासही बंदी घालण्यात आली आहे.


सध्याच्या परिस्थितीवर बोलताना पंप व्यवस्थापकांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, प्रत्येकाला पेट्रोल आणि डिझेल मिळणार आहे. मात्र अनावश्यक गर्दीमुळे गोंधळाची परिस्थिती निर्माण होत आहे. त्यामुळेच पोलिसांना पाचारण करावे लागत आहे. शासनाने ठरवून दिलेल्या नियमांनुसारच इंधन वाटप केले जाईल, त्यामुळे नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये आणि प्रशासनाला सहकार्य करावे.


दरम्यान, शेतकऱ्यांनीही प्रशासनाच्या कामकाजावर नाराजी व्यक्त केली आहे. सध्या पिकांच्या काढणीचा हंगाम सुरू असताना ट्रॅक्टरसाठी डिझेलची मोठी गरज आहे. मात्र डिझेल उपलब्ध होत नसल्याने शेतीची कामे अडचणीत आली आहेत. जिल्हा पुरवठा विभागाच्या निर्बंधांमुळे शेतकऱ्यांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. “ट्रॅक्टर थेट शेतातून पेट्रोल पंपावर आणायचा का आणि केवळ दोनशे रुपयांचे डिझेल भरून परत न्यायचा का?” असा सवाल उपस्थित करत त्यांनी प्रशासनाविरोधात नाराजी व्यक्त केली आहे.


रामेश्वर सोळुंके, पंप व्यवस्थापक म्हणाले की, "शासनाने घालून दिलेल्या नियमांनुसारच आम्ही पेट्रोल आणि डिझेल देत आहोत. प्रत्येकाला इंधन मिळणार आहे, त्यामुळे नागरिकांनी घाबरून गर्दी करू नये. अफवांवर विश्वास ठेवू नये आणि प्रशासनाला सहकार्य करावे."


शेतकरी म्हणाले की, "सध्या शेतीच्या कामासाठी डिझेलची खूप गरज आहे. मात्र निर्बंधांमुळे आम्हाला पुरेसे डिझेल मिळत नाही. अशा परिस्थितीत शेतीची कामे कशी करायची, असा प्रश्न निर्माण झाला आहे. शासनाने यावर तातडीने उपाययोजना करावी."

Comments
Add Comment

शाळा प्रवेशासाठी बालकांचे किमान वय निश्चित; २०२७-२८ पासून टप्प्याटप्प्याने लागू होणार नवीन निकष

मुंबई : राज्य शासनाने पूर्व-प्राथमिक ते

समान नागरी संहितेबाबत नागरिकांकडून १५ नोव्हेंबरपर्यंत मागवल्या सूचना; विशेष पोर्टलचा शुभारंभ

महाराष्ट्रात समान नागरी संहिता (UCC) लागू करण्याच्या अनुषंगाने राज्य शासनाने नेमलेल्या समितीने नागरिकांकडून

Maharashtra Weather Update: येत्या पाच दिवसांत हवामानात होणार बदल! उकाड्यापासून होणार सुटका; पहा कोणत्या जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता?

भारतीय हवामान विभागाने (IMD) गुरुवारी जारी केलेल्या हवामान अंदाजानुसार, राज्यातील कोकण विभागात काही ठिकाणी उष्ण

Ban On Firecrackers: दिवाळीत सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्यास बंदी; मुंबई हायकोर्टाचा आदेश

सणासुदीच्या पार्श्वभूमीवर मुंबई उच्च न्यायालयाने गुरुवारी १५ ऑक्टोबर २०२६ रोजी सार्वजनिक ठिकाणी आणि

महाराष्ट्रात डिजिटल शासनसेवांना मिळणार नवी गती ! डिजिटल शासनसेवा प्लॅटफॉर्म तात्काळ सुरु करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

मुंबई : राज्यातील नागरिकांना शासकीय सेवा अधिक जलद, सुलभ आणि पारदर्शक पद्धतीने ऑनलाइन उपलब्ध करून देण्यासाठी

Jalgaon : जळगावमध्ये भीषण अपघात ! ट्रकच्या धडकेत एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू

Jalgaon : जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. मालदाभाडी गावाजवळ ट्रक आणि दुचाकी