रामनवमीनिमित्त पुण्यातील वाहतुकीत बदल, 'हे' रस्ते बंद राहतील

पुणे: देशभरात आज रामनवमीचा सण मोठ्या उत्सहात आणि भक्तिमय वातावरणात साजरा केला जात आहे. प्रभू श्रीरामचंद्र जन्मोत्सवानिमित्त मंदिरे गर्दीने फुलून गेली असून शहरांमध्ये मिरवणुका, मोठ्या धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. पुणे शहरातही विविध संघटना आणि राजकीय पक्षांकडून कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. रामनवमी निमित्त होणाऱ्या कार्यक्रमांमुळे पुणे शहरातील वाहतुकीत मोठे बदल करण्यात आले आहेत.


प्रभू श्रीरामचंद्र जन्मोत्सवानिमित्त पुणे शहरात विविध धार्मिक आणि राजकीय संघटनांच्या वतीने भव्य मिरवणुका काढण्यात येणार आहेत. या मिरवणुकांमुळे शहराच्या मध्यभागासह लष्कर आणि पिंपरी-चिंचवड परिसरातील वाहतूक व्यवस्थेत व्यापक बदल करण्यात आले आहेत. उद्या दुपारी ४ ते रात्री १० या वेळेत बाजीराव रस्ता आणि लष्कर परिसरातील वाहतूक पूर्णपणे बंद किंवा वळवण्यात येणार असल्याची माहिती वाहतूक शाखेने दिली आहे.



बाजीराव रस्ता बंद



शहरातील मुख्य मानला जाणारा बाजीराव रस्ता मिरवणुकीच्या काळात वाहतुकीसाठी बंद असेल. पुरम चौकातून शिवाजीनगरच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांना प्रवेश नाकारण्यात आला आहे. ही वाहतूक टिळक रस्ता, अलका टॉकीज चौक आणि खंडोजी बाबा चौक मार्गे वळवण्यात येईल.



​लष्कर आणि छावणी परिसर



लष्कर भागातील एम.जी. रोड आणि परिसरातील अंतर्गत रस्त्यांवरही निर्बंध असतील. वाय जंक्शन येथील वाहतूक बंद करून ती १५ ऑगस्ट चौकातून वळवण्यात येईल. तसेच महंमद रफी चौकाकडून येणारी वाहने ईस्ट स्ट्रीट मार्गे मार्गस्थ होतील. कोहिनूर हॉटेल परिसरातील वाहतूक भोपळे चौकाकडे वळवण्यात आली आहे.



भोसरी चाकण परिसरातही महत्त्वाचा रस्ता बंद



भोसरीतील हरिओम स्वीट चौक ते भोसरी ओव्हरब्रिज हा मार्ग बंद राहील. विदर्भ मित्र मंडळ आणि आळंदी रोड हा पर्यायी मार्ग असेल. चाकणमध्ये आंबेठाण चौक आणि मार्केट यार्ड परिसरातील रस्ते बंद असून, वाहनचालकांनी मेदनकरवाडी आणि शिक्रापूर रोडचा वापर करावा, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

Comments
Add Comment

ST Bus NCMC Card : एसटी प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी! १ सप्टेंबरपासून ज्येष्ठ नागरिक, महिलांना NCMC कार्ड अनिवार्य

मुंबई : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) बसमधून प्रवास करणाऱ्या ज्येष्ठ नागरिक आणि महिला

Ravindra Chavan : भाजपा प्रदेश कार्यकारिणी बैठकीत रविंद्र चव्हाणांचे कार्यकर्त्यांना मोठे आवाहन

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली विकसित महाराष्ट्र

Pune Crime News : पुण्यातील खराडीत २३ वर्षीय IT इंजिनिअर तरुणीने आयुष्य संपवलं; प्रियकराला पोलिसांकडून अटक, नेमकं प्रकरण काय ?

पुणे : पुण्यातील खराडी परिसरात एका २३ वर्षीय आयटी इंजिनिअर तरुणीने आयुष्य संपवल्याची धक्कादायक घटना समोर आली

Ambajogai : स्लीपर हातात धरली अन् लेकीच्या शिक्षणासाठी अनवाणी धावली आई, रमाबाईंची मॅरेथॉन राज्यात चर्चेत

Ambajogai Marathon : ना पायात महागडे बूट, ना अंगावर ट्रॅक सूट, साधी साडी अन् रोजच्या वापरातली चप्पल एवढंच काय तर त्या माऊलीकडे.

Maharashtra Zilla Parishad Elections : उर्वरित २२ जिल्हा परिषदा राष्ट्रवादी स्वबळावर लढणार?

- कोअर कमिटीच्या बैठकीत चर्चा; दिलीप वळसेंकडे नेतृत्व, २७ सप्टेंबरला नाशिकमध्ये राज्यव्यापी शिबिर मुंबई : आगामी

Neelam Gorhe : भटके-विमुक्त समाजाने शिक्षणाच्या बळावर प्रगती साधावी : डॉ. नीलम गोऱ्हे

पुणे : भटके-विमुक्त समाजाच्या विकासासाठी केंद्र आणि राज्य सरकारकडून विविध योजना राबवल्या जात आहेत. या योजनांचा