नगर पथ विक्रेता समिती' निवडणूक निकाल होणार जाहीर

मुंबई : नगर पथविक्रेत्यांची (फेरीवाला) शिखर समिती आणि परिमंडळीय समिती निवडणुकीबाबतचा पेच अखेर सुटला आहे. उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार, या निवडणुकीची मतमोजणी उद्या, शनिवार २८ मार्च २०२६ रोजी पार पडणार असून त्याच दिवशी निकाल जाहीर करण्यात येणार आहेत. न्यायालयाच्या निर्देशानुसार शुक्रवारी झालेल्या गटनेत्यांच्या सभेत चर्चा झाल्यानंतर महापौरांनी दिलेल्या आदेशानंतर प्रशासनाने याबाबतची कार्यवाही केली आहे


मुंबईतील नगर पथविक्रेत्यांची एक शिखर समिती आणि सात परिमंडळाच्या प्रत्येकी एक याप्रमाणे (सात समित्या) एकूण आठ समित्यांच्या निवडणुकीसाठी २९ ऑगस्ट २०२४ रोजी शांततेत आणि सुरळीतपणे मतदान पार पडले. त्यात सरासरी ४९.४६ टक्के मतदान झाले होते. न्यायालयात दाखल विविध याचिकांमुळे, सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशांनुसार, मतदान प्रक्रिया राबवून मतमोजणी आणि निकाल राखून ठेवण्यात आले होते. दरम्यान, सर्व मतपेट्या स्ट्राँग रुममध्ये सुरक्षित ठेवण्यात आल्या होत्या. परिणामी, मागील दीड वर्ष मतपेट्या मोहोरबंद अवस्थेत होत्या.


सोमवार, २३ मार्च २०२६ रोजी मुंबई उच्च न्यायालयाने (याचिका क्रमांक २९३३९/२०२४ व इतर) या प्रकरणावर अंतिम निकाल दिला. माननीय न्यायालयाने सन २०२४ मध्ये पार पडलेली निवडणूक प्रक्रिया 'विधिग्राह्य' ठरवत, मतमोजणीवरील स्थगिती उठवली आहे. तसेच, विनाविलंब निकाल जाहीर करण्याचे निर्देश प्रशासनाला दिले. त्यानुसार आता मतमोजणी प्रक्रिया तातडीने करण्यात येणार आहे.या निवडणुकीशी संबंधित सर्व उमेदवार, त्यांचे प्रतिनिधी, याचिकाकर्ते, संबंधित संघटना आणि इतर भागधारकांनी या प्रक्रियेसाठी उपस्थित राहावे, असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात येत आहे.


दरम्यान, नगर पथविक्रेता समिती निवडणूक निकालाबाबत न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार महापालिका प्रशासनाच्यावतीने तत्काळ निकाल जाहीर करण्याबाबतच महापौरांच्या अध्यक्षतेखाली गटनेत्यांच्या सभेत चर्चा करण्यात आली होती. यामध्ये नगर पथविक्रेता समितीमध्ये नगसेवकांना सदस्य म्हणून घेण्याची मागणी गटनेत्यांनी केली असून त्याबरोबरच या सभेमध्ये फेरीवाला समितीच्या निवडणुकीचा निकालासोबतच ९९,४३५ अर्जदारांच्या पात्रतेबाबतही चर्चा करून यावर त्वरीत निर्णय घेण्यासाठी महापौर रितू तावडे यांनी प्रशासनाकडे अभिप्रायसाठी प्रस्ताव पाठवला होता.


मतमोजणीसाठी खालीलप्रमाणे नियोजन केले आहे:


मतमोजणी दिनांक: शनिवार, २८ मार्च २०२६


मतमोजणी वेळ: दुपारी १२.०० वाजता


मतमोजणी स्थळ: महानगरपालिका समिती सभागृह क्रमांक १ व २, बृहन्मुंबई महानगरपालिका मुख्यालय, महापालिका मार्ग, मुंबई - ४०० ००१.

Comments
Add Comment

Mumbai CNG Price : सीएनजी आणि पीएनजी महागला, नवे दर १ सप्टेंबरपासून लागू

मुंबई : महानगर गॅस लिमिटेडने (एमजीएल) सीएनजीच्या दरात प्रति किलो २ रुपयांची वाढ जाहीर केली आहे. ही दरवाढ मंगळवार १

Anna Hazare : अण्णा हजारेंची प्रकृती खालावली, मुंबईच्या बॉम्बे हॉस्पिटलमध्ये दाखल

मुंबई : ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना प्रकृती खालावल्यामुळे मुंबईतील बॉम्बे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात

Central Railway : मध्य रेल्वे २६२ गणपती विशेष गाड्यांची सेवा पुरवणार

मुंबई : मध्य रेल्वेने आगामी गणपती उत्सवाच्या काळात प्रवाशांची ये-जा सुलभ करण्यासाठी आणि गर्दीचे नियोजन

Nepal Flood : नेपाळ आपत्तीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील ६७ जणांच्या संपर्कासाठी प्रयत्न

मुंबई : नेपाळ-तिबेट प्रदेशात २६ ऑगस्ट २०२६ रोजी आलेल्या महापुरामध्ये महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांतील पर्यटक

Western Railway : पश्चिम रेल्वेचे सुधारित उपनगरीय वेळापत्रक आजपासून लागू; ६ नव्या लोकल

वातानुकूलित लोकलच्या सेवांमध्येही वाढ मुंबई : ३१ ऑगस्ट२०२६ पश्चिम रेल्वेचे सुधारित उपनगरीय वेळापत्रक मंगळवार

JNPA : 'जेएनपीए' ठरले जगातील सर्वात वेगाने विकसित होणारे कंटेनर बंदर

- जागतिक मानांकनात २१ व्या स्थानी झेप; मंत्री नितेश राणे यांनी केले अभिनंदन मुंबई : भारतातील सर्वात मोठे कंटेनर