मुंबईतील सर्वच स्कायवॉकवर उभारणार सरकते जिने; स्थायी समिती सदस्यांनी केली मागणी

मुंबई: बोरीवली रेल्वे स्थानकाच्या पश्चिमेला असलेल्या स्कायवॉकवर सरकता जिना बांधला जाणार असून अशाप्रकारे महापालिकेच्या ताब्यात असलेल्या सर्वच स्कायवॉकवर सरकते जिने बांधले जावेत अशाप्रकारची मागणी महापालिकेतील स्थायी समिती सदस्यांनी केली.


बोरीवली पश्चिमेला रेल्वे स्थानकासमोर गोरा गांधी हॉटेल समोरील स्कायवॉकला जोडण्यासाठी सरकता जिना बसविण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. याबाबतचा प्रस्तावाला स्थायी समितीने मान्यता देताना झालेल्या चर्चेत सदस्यांनी ही मागणी केली. हा प्रस्ताव मंजुरीला आला असता सभागृहनेते गणेश खणकर यांनी या स्कायवॉकला जोडणारा सरकता जिना आवश्यक आहे. त्यामुळे महापालिकेच्या ताब्यात असलेल्या सर्वच स्कायवॉकवर सरकते जिने बसवले जावेत अशी मागणी करत मुंबईत अशाप्रकारे किती सरकते जिने बसवले आहेत याची विचारणा केली. अशाप्रकारच्या सरकत्या जिन्यांची सुरुवात रेल्वेत झाली. त्यामुळे तेथील वारंवार बंद पडत असलेल्या या जिन्यांचा अनुभव घेता स्कायवॉकला जोडणाऱ्या सरकत्या जिन्यांसोबतच त्यांची दैनंदिन देखभालीचीही सेवा त्यात अंतर्भूत असावी अशी सूचना केली. तर भाजपचे ऍड मकरंद नार्वेकर यांनी मरिन लाईन्स येथे सरकते जिने बसवण्यासाठी अडीच वर्षांपासून प्रयत्न सुरु आहेत, तरीही बसवले जात नसल्याबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली. तर भाजपच्या शितल गंभीर देसाई यांनी माहिम मोरी रोड आणि सेनापती बापट मार्गावरील जंक्शनवरील पुलावर सरकते जिने आणून ठेवले आहेत, पण अजुनही पॅकिंगमधून बाहेरच काढलेले नाही असे सांगितले. तर वाकोला येथील स्कायवॉकला सरकत्या जिन्यांसह वर छप्परही बसवण्याची सूचना तुलिफ मिरांडा यांनी केली. अंधेरी पश्चिम येथील हरी मस्जिद येथील स्कायवॉवर सरकत्या जिन्याची आवश्यकता असल्याचे यशोधर फणसे यांनी सांगितले. यावेळी झालेल्या चर्चेत श्रध्दा जाधव, डॉ सईदा खान, प्रकाश दरेकर,जमीर कुरेशी आदींनी चर्चेत भाग घेतला.

Comments
Add Comment

Mumbai CNG Price : सीएनजी आणि पीएनजी महागला, नवे दर १ सप्टेंबरपासून लागू

मुंबई : महानगर गॅस लिमिटेडने (एमजीएल) सीएनजीच्या दरात प्रति किलो २ रुपयांची वाढ जाहीर केली आहे. ही दरवाढ मंगळवार १

Anna Hazare : अण्णा हजारेंची प्रकृती खालावली, मुंबईच्या बॉम्बे हॉस्पिटलमध्ये दाखल

मुंबई : ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना प्रकृती खालावल्यामुळे मुंबईतील बॉम्बे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात

Central Railway : मध्य रेल्वे २६२ गणपती विशेष गाड्यांची सेवा पुरवणार

मुंबई : मध्य रेल्वेने आगामी गणपती उत्सवाच्या काळात प्रवाशांची ये-जा सुलभ करण्यासाठी आणि गर्दीचे नियोजन

Nepal Flood : नेपाळ आपत्तीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील ६७ जणांच्या संपर्कासाठी प्रयत्न

मुंबई : नेपाळ-तिबेट प्रदेशात २६ ऑगस्ट २०२६ रोजी आलेल्या महापुरामध्ये महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांतील पर्यटक

Western Railway : पश्चिम रेल्वेचे सुधारित उपनगरीय वेळापत्रक आजपासून लागू; ६ नव्या लोकल

वातानुकूलित लोकलच्या सेवांमध्येही वाढ मुंबई : ३१ ऑगस्ट२०२६ पश्चिम रेल्वेचे सुधारित उपनगरीय वेळापत्रक मंगळवार

JNPA : 'जेएनपीए' ठरले जगातील सर्वात वेगाने विकसित होणारे कंटेनर बंदर

- जागतिक मानांकनात २१ व्या स्थानी झेप; मंत्री नितेश राणे यांनी केले अभिनंदन मुंबई : भारतातील सर्वात मोठे कंटेनर