चार सहायक आयुक्तांच्या बदल्या, गजानन बेल्लाळे यांची घाटकोपर मधून बदली, कुलाबा,नरिमन पॉइंटची जबाबदारी

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई महानगरपालिकेच्या सहायक आयुक्तांची खांदे पालट करण्यात आली असून मुंबईच्या महापौर प्रतिनिधित्व करत असलेल्या एन प्रशासकीय कार्यालयाचे सहायक आयुक्त गजानन बेल्लाळे यांची बदली ए विभागाच्या सहायक आयुक्तपदी करण्यात आली आहे. तर त्यांच्याकडील करनिर्धारण व संकलन विभागाचा अतिरिक्त कार्यभार कायम ठेवला आहे. तर तीन कार्यकारी अभियंता यांच्यापैकी दोघांना नगर अभियंता विभागात परत पाठवले आहे. एकाची बदली करण्यात आली आहे तर एका नवीन कार्यकारी अभियंत्यावर सहाय्यक आयुक्त पदाचा प्रभारी भार सोपवण्यात आला आहे.


मुंबई महापालिका आयुक्त डॉ.भूषण गगराणी येत्या ०१ एप्रिल रोजी सेवानिवृत्त होत असून निवृत्ती पूर्वी त्यांनी काही सहाय्यक आयुक्त पदावरील अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. महापालिका आयुक्तांच्या आदेशानुसार करण्यात आलेल्या बदल्यांमध्ये सहाय्यक आयुक्त गजानन बेल्लाळे यांच्याकडील ‘एन’ विभागाची जबाबदारी काढून ए विभागाची जबाबदारी सोपवली आहे. मात्र, या कार्यभारासोबतच करनिर्धारक व संकलक पदाचा अतिरिक्त कार्यभार कायम ठेवण्यात आला आहे.


‘ई’ विभागातील सहाय्यक आयुक्त पदाचा अतिरिक्त कार्यभार असलेल्या कार्यकारी अभियंता रोहित त्रिवेदी यांची व बदली ‘आर/उत्तर’ विभागात करण्यात आली आहे.


घनकचरा व्यवस्थापन खात्याचे कार्यकारी अभियंता आनंद कंकाळ यांच्यावर ‘ई’ विभागाच्या सहाय्यक आयुक्त पदाचा पूर्णकालिक कार्यभार सोपविण्यात आला आहे.


याशिवाय, कार्यकारी अभियंता नयनीश वेंगुर्लेकर यांच्याकडे आर उत्तर विभागाचा अतिरिक्त कार्यभार होता, तर कार्यकारी अभियंता जयदीप मोरे यांच्याकडे ए विभागाचा अतिरिक्त कार्यभार होता. त्या दोघांकडून अनुक्रमे दोन्ही विभागाच्या सहायक आयुक्त पदाचा अतिरिक्त कार्यभार काढून त्यांना पुन्हा नगर अभियंता म्हणजे त्यांच्या मूळ जागेवर परत पाठवले आहे.


सहायक आयुक्त रूपाली सरमळकर यांच्याकडे अतिक्रमणाची विभाग


महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून शिफारस करण्यात आलेल्या, रुपाली प्रसाद सरमळकर (पूर्वाश्रमीच्या रुपाली अशोक शिंदे) यांची सहायक्त आयुक्तपदी निवड झाल्यानंतर आता त्यांच्यावर अतिक्रमण निर्मूलन (शहर) विभागाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.


अधिकारी आणि बदलीची जागा




  1. गजानन बेल्लाळे, बदलीचे ठिकाण सहायक आयुक्त (ए विभाग) तसेच करनिर्धारण व संकलन पदाचा अतिरिक्त कार्यभार

  2. रोहित त्रिवेदी, सहायक आयुक्त (आर/उत्तर विभाग) अतिरिक्त कार्यभार

  3. आनंद कंकाळ (कार्यकारी अभियंता) बदलीचे ठिकाण सहाय्यक आयुक्त (ई विभाग) पूर्णकालिक कार्यभार

  4. नयनीश वेंगुर्लेकर, बदलीचे ठिकाण:नगर अभियंता विभागाकडे परत

  5. जयदीप मोरे , बदलीचे ठिकाण: यांना नगर अभियंता विभागाकडे परत

Comments
Add Comment

Mumbai CNG Price : सीएनजी आणि पीएनजी महागला, नवे दर १ सप्टेंबरपासून लागू

मुंबई : महानगर गॅस लिमिटेडने (एमजीएल) सीएनजीच्या दरात प्रति किलो २ रुपयांची वाढ जाहीर केली आहे. ही दरवाढ मंगळवार १

Anna Hazare : अण्णा हजारेंची प्रकृती खालावली, मुंबईच्या बॉम्बे हॉस्पिटलमध्ये दाखल

मुंबई : ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना प्रकृती खालावल्यामुळे मुंबईतील बॉम्बे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात

Central Railway : मध्य रेल्वे २६२ गणपती विशेष गाड्यांची सेवा पुरवणार

मुंबई : मध्य रेल्वेने आगामी गणपती उत्सवाच्या काळात प्रवाशांची ये-जा सुलभ करण्यासाठी आणि गर्दीचे नियोजन

Nepal Flood : नेपाळ आपत्तीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील ६७ जणांच्या संपर्कासाठी प्रयत्न

मुंबई : नेपाळ-तिबेट प्रदेशात २६ ऑगस्ट २०२६ रोजी आलेल्या महापुरामध्ये महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांतील पर्यटक

Western Railway : पश्चिम रेल्वेचे सुधारित उपनगरीय वेळापत्रक आजपासून लागू; ६ नव्या लोकल

वातानुकूलित लोकलच्या सेवांमध्येही वाढ मुंबई : ३१ ऑगस्ट२०२६ पश्चिम रेल्वेचे सुधारित उपनगरीय वेळापत्रक मंगळवार

JNPA : 'जेएनपीए' ठरले जगातील सर्वात वेगाने विकसित होणारे कंटेनर बंदर

- जागतिक मानांकनात २१ व्या स्थानी झेप; मंत्री नितेश राणे यांनी केले अभिनंदन मुंबई : भारतातील सर्वात मोठे कंटेनर