इंधन संकटकाळात भारताची श्रीलंकेला मदत; पंतप्रधान मोदींचे केले आभार व्यक्त

मुंबई : इंधन पुरवठ्याच्या अडचणींना सामोरे जात असलेल्या श्रीलंकेच्या मदतीच्या हाकेला भारताने तत्काळ प्रतिसाद देत मदतीचा हात पुढे केला. भारत सरकारच्या या सकारात्मक भूमिकेबद्दल श्रीलंकेचे राष्ट्रपती अनुर कुमार दिसानायके यांनी आभार व्यक्त केले आहेत.


राष्ट्रपती दिसानायके यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर याबाबत आपली प्रतिक्रिया दिली. त्यांनी सांगितले की काही दिवसांपूर्वीच त्यांची भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा झाली होती. या चर्चेदरम्यान मध्यपूर्वेतील संघर्षामुळे श्रीलंकेला इंधन पुरवठ्यात येत असलेल्या अडचणींबाबत त्यांनी माहिती दिली होती. त्यांनी लिहिले की भारताने तात्काळ मदतीचा हात पुढे केला आणि त्यासाठी ते भारताचे आभारी आहेत.


शनिवारी कोलंबो येथे ३८,०००  मेट्रिक टन इंधन पोहोचले. सध्याच्या संकटाच्या काळात परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांच्या पूर्ण सहकार्याचाही त्यांनी उल्लेख करत त्यांचे आभार मानले.दरम्यान भारताने श्रीलंकेला मदत करण्याची ही पहिलीच वेळ नसून, यापूर्वीही ‘नेबरहुड फर्स्ट’ धोरणांतर्गत अनेकदा मदत केली आहे.

Comments
Add Comment

MahaIT : महाआयटीच्या प्रणाली अद्ययावतीकरणामुळे शासकीय ऑनलाइन सेवा १६ ते २० ऑक्टोबरदरम्यान तात्पुरत्या बंद

मुंबई : महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ मर्यादित (महाआयटी) मार्फत विकसित आणि देखरेख करण्यात येणाऱ्या राज्य

महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा २०२६ जाहीर; हाँगकाँग, उत्तराखंड आणि सांगलीच्या मंडळांची बाजी!

मुंबई : राज्यात उत्साहात पार पडलेल्या ‘म

Ram Mansion Purchase : सिद्धिविनायक मंदिराजवळीम राम मेन्शनच्या खरेदी व्यवहाराला परवानगी

मुंबई : प्रभादेवी येथील श्री सिद्धिविनायक गणपती मंदिराला लागून असलेल्या राम मेन्शन सहकारी गृहनिर्माण

मतदार यादीत नाव नोंदणीसाठी राज्यात विशेष मोहीम; 17, 18 आणि 24, 25 ऑक्टोबर रोजी मतदान केंद्रांवर शिबिरे

मुंबई : राज्यातील एकाही पात्र नागरिकाचे नाव मतदार यादीत समाविष्ट होण्यापासून वंचित राहू नये, या महत्त्वाच्या

BMC News : वरळीतील सांडपाण्यावर बायोगॅसपासून वीज निर्मिती; प्रकल्प काम 63 टक्के पूर्ण

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई मलनिस्सारण प्रकल्पांतर्गत वरळी येथे उभारण्यात येत असलेल्या 500 दशलक्ष लीटर

मुंबई उपनगरातील तीन नवीन कोळीवाड्यांचे होणार सीमांकन; राज्य सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय

मुंबई शहर व उपनगरातील कोळीवाड्यांचे सीमांकन अधिक स्पष्ट व सर्वसमावेशक करण्याच्या दृष्टीने फडणवीस सरकारने