रामनवमी भंडाऱ्यासाठी मंत्री लोढा यांच्याकडून मंडळांना गॅसची मद

गिरगावच्या ओम श्री सदगुरू साईनाथ मंडळाकडून मंत्री मंगलप्रभात लोढा यांचे आभार


धार्मिक कार्यात सहकार्याची आवश्यकता असल्यास संपर्क करा, मंत्री लोढा यांचे कार्यकर्त्यांना आवाहन


मुंबई : गिरगाव येथील ओम श्री सदगुरू साईनाथ रामनवमी पदयात्रा मंडळाच्या वतीने आयोजित भंडाऱ्यासाठी आवश्यक असलेल्या गॅसची व्यवस्था करून दिल्याबद्दल राज्याचे कॅबिनेट मंगलप्रभात लोढा यांचे मंडळातर्फे आभार व्यक्त करण्यात आले. रामनवमी निमित्त मंडळाच्या वतीने दरवर्षी पदयात्रा आणि भंडाऱ्याचे आयोजन करण्यात येते. यंदाही मोठ्या संख्येने भाविक सहभागी होणार असल्याने भंडाऱ्याची व्यापक तयारी करण्यात आली होती. या पार्श्वभूमीवर गॅसची आवश्यकता भासल्याने मंडळाने मंत्री लोढा यांच्याकडे विनंती केली होती असे मंडळच्या उत्सव समितीचे पालखी प्रमुख राजू बोडके यांनी सांगितले.


इराण आणि अमेरिकादरम्यान सुरू असलेल्या युद्धामुळे सध्या राज्यात इंधन पुरवठ्यावर परिणाम झाल्याचे बोलले जात आहे. या पार्श्वभूमीवर भंडारा कार्यक्रम होणार की नाही, अशा चिंतेत कार्यकर्ते होते. मात्र मंत्री लोढा यांनी तात्काळ दखल घेत संबंधित यंत्रणेला निर्देश देत गॅसची व्यवस्था करून दिली. त्यामुळे भंडाऱ्याचे नियोजन सुरळीत पार पडण्यास मदत झाली असल्याचे बोडके यांनी सांगितले.


यासंदर्भात मंत्री लोढा यांना विचारले असता ते म्हणाले की, आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशभरात नागरिकांची गैरसोय होणार नाही, याची काळजी घेतली जात असल्याचे म्हटले आहे. कुठेही इंधन पुरवठ्यात बाधा येणार नाही. तसेच आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही राज्यात आवश्यक तेवढा गॅसचा साठा उपलब्ध आहे. अफवांवर विश्वास ठेवू नये असे जनतेला आवाहन केले आहे. धार्मिक कार्यात मला माझ्या मलबार हिल मतदार संघात सहकार्य करता आले, याचा मला अत्याधिक आनंद असल्याचेही लोढा यांनी सांगितले. त्याचबरोबर कोणत्याही धार्मिक कार्यात सहकार्याची गरज असल्यास निःसंकोचपणे माझ्या मलबार हिल विधानसभेतील कार्यकर्त्यांनी संपर्क साधावा, असे आवाहन मंत्री लोढा यांनी केले आहे. काही लोक केवळ या स्थितीत राजकारण करू पाहत आहेत. स्थानिक आमदार आणि मंत्री या नात्याने समरसता जपत मी धार्मिक कार्यात सहकार्य करत असल्याचे ही मंत्री लोढा यांनी स्पष्ट केले.

Comments
Add Comment

Mumbai CNG Price : सीएनजी आणि पीएनजी महागला, नवे दर १ सप्टेंबरपासून लागू

मुंबई : महानगर गॅस लिमिटेडने (एमजीएल) सीएनजीच्या दरात प्रति किलो २ रुपयांची वाढ जाहीर केली आहे. ही दरवाढ मंगळवार १

Anna Hazare : अण्णा हजारेंची प्रकृती खालावली, मुंबईच्या बॉम्बे हॉस्पिटलमध्ये दाखल

मुंबई : ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना प्रकृती खालावल्यामुळे मुंबईतील बॉम्बे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात

Central Railway : मध्य रेल्वे २६२ गणपती विशेष गाड्यांची सेवा पुरवणार

मुंबई : मध्य रेल्वेने आगामी गणपती उत्सवाच्या काळात प्रवाशांची ये-जा सुलभ करण्यासाठी आणि गर्दीचे नियोजन

Nepal Flood : नेपाळ आपत्तीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील ६७ जणांच्या संपर्कासाठी प्रयत्न

मुंबई : नेपाळ-तिबेट प्रदेशात २६ ऑगस्ट २०२६ रोजी आलेल्या महापुरामध्ये महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांतील पर्यटक

Western Railway : पश्चिम रेल्वेचे सुधारित उपनगरीय वेळापत्रक आजपासून लागू; ६ नव्या लोकल

वातानुकूलित लोकलच्या सेवांमध्येही वाढ मुंबई : ३१ ऑगस्ट२०२६ पश्चिम रेल्वेचे सुधारित उपनगरीय वेळापत्रक मंगळवार

JNPA : 'जेएनपीए' ठरले जगातील सर्वात वेगाने विकसित होणारे कंटेनर बंदर

- जागतिक मानांकनात २१ व्या स्थानी झेप; मंत्री नितेश राणे यांनी केले अभिनंदन मुंबई : भारतातील सर्वात मोठे कंटेनर