रेमंड समुहाच्या विजयपत सिंघानियांचे मुंबईत निधन

मुंबई : रेमंड समुहाचे (Raymond Group) माजी अध्यक्ष (चेअरमन) विजयपत सिंघानिया (Vijaypat Singhania) यांचे मुंबईत (Mumbai) निधन झाले. ते ८७ वर्षांचे होते. विजयपत सिंघानिया यांचे पुत्र उद्योगपती गौतम सिंघानिया (Gautam Singhania) यांनी ही माहिती दिली. मुंबईच्या चंदनवाडी स्मशानभूमीत रविवारी दुपारी विजयपत सिंघानिया यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत.


विजयपत सिंघानिया हे एक दूरदृष्टी असलेले उद्योगपती, नेता, समाजसेवक होते. त्यांचा वारसा पुढील पिढीला प्रेरणा देईल, असा विश्वास उद्योगपती गौतम सिंघानिया यांनी व्यक्त केला.


भारतीय वस्त्रोद्योग क्षेत्रात रेमंड हा एक नावाजलेला उद्योग समूह आहे. या समुहाचे नेतृत्व अनेक वर्षे विजयपत सिंघानिया यांनी केले. सिंघानिया यांनीच निवृत्ती होत काही वर्षांपूर्वी समुहाची जबाबदारी मुलाकडे अर्थात गौतम सिंघानिया यांच्याकडे सोपवली. पण लवकरच मुलाचे आणि त्यांचे वाद सुरू झाले. संपत्तीच्या मुद्यावरून वाद विकोपाला गेला. यानंतर विजयपत सिंघानिया आणि गौतम सिंघानिया या पितापुत्रात कायमचा दुरावा निर्माण झाला.


मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला शोक

उद्योगपती विजयपत सिंघानिया यांच्या निधनाचे वृत्त कळताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शोक प्रकट केला.


कोण होते विजयपत सिंघानिया ?


श्रीमंत व्यक्ती. रेमंड समुहाचे माजी अध्यक्ष (चेअरमन). विमान वाहतूक आणि चित्रपट उद्योगातही प्रभाव होता.


सुटिंग आणि शर्टिंगसाठी जगभर प्रसिद्ध असलेल्या रेमंडची स्थापना १९२५ मध्ये आणि पहिले रिटेल शोरूम १९५८ साली मुंबईत


वस्त्रोद्योग, अभियांत्रिकी आणि विमान वाहतूक क्षेत्रात विजयपत सिंघानिया यांच्या नेतृत्वात समुहाने चांगली कामगिरी केली.


विजयपत सिंघानिया यांनी १९८० पासून रेमंड समुहाचे नेतृत्व केले आणि या समुहाला आधुनिक उद्योगसमुहाच्या रुपात विकसित केले.


रेमंड समुहाने १९८६ मध्ये 'पार्क अव्हेन्यू' हा प्रीमियम ब्रँड सादर केला. फॅशनेबल ब्रँड्स आणि नवीन शैलींच्या शोधात असलेल्या पुरुषांसाठी कपड्यांची संपूर्ण श्रेणी उपलब्ध करून दिली.


मायक्रोलाइट विमानातून लंडन ते नवी दिल्ली असा एकट्याने २३ दिवसांत प्रवास करून 'वेग आणि वेळेचा उत्कृष्ट ताळमेळ राखण्याचा विक्रम विजयपत सिंघानिया यांनी १९८८ मध्ये केला.


रेमंड समुहाने १९९० मध्ये ओमानमध्ये पहिली परदेश शोरूम सुरू केली. समुहाने १९९६ मध्ये देशात एअर चार्टर सेवा सुरू केली.


भारतीय हवाई दलाने ५००० तासांहून अधिक उड्डाणाच्या अनुभवाबद्दल विजयपत यांना १९९४ मध्ये मानद एअर कमोडोर या पदाने गौरविले.


विजयपत सिंघानिया यांना पद्मभूषण, तसेच तेनझिंग नोर्गे राष्ट्रीय साहसी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.


नोव्हेंबर २००५ मध्ये, वयाच्या ६७ व्या वर्षी, विजयपत यांनी हॉट एअर बलूनमधून सुमारे ६९,००० फूट उंची गाठून जागतिक विक्रम केला.


विजयपत २००६ मध्ये मुंबईचे शेरिफ झाले.


विजयपत यांनी 'ॲन एंजल इन अ कॉकपिट' नावाचे एक पुस्तक लिहिले


विजयपत सिंघानिया यांनी कंपनीची सूत्रे २०१५ मध्ये मुलाकडे सोपवली. पण लवकरच त्यांचे मुलाशी टोकाचे वाद सुरू झाले. अखेर विजयपत यांनी २०१७ मध्ये एका मुलाखतीत स्वतःच सांगितले की, मुलगा गौतम सिंघानिया याने त्यांना जेके हाऊसमधून बाहेर काढले होते. अनेक माध्यमांच्या वृत्तांनुसार ते भाड्याच्या घरात राहत होते.

Comments
Add Comment

स्मृती मंधानाच्या नेतृत्वात भारतीय संघाचा पहिला मालिका विजय, झिम्बाब्वेला नऊ विकेट्सने केलं पराभूत

मुंबई: भारत आणि झिम्बाब्वे यांच्यात तीन सामन्यांची टी 20 मालिका सुरू आहे. या मालिकेतील सलग 2 सामन्यांत भारताने विजय

Tiger Shroff: टायगर श्रॉफच्या गाडीवर मुंबईत गोळीबार! सुदैवाने अभिनेता सुरक्षित; लॉरेन्स बिश्नोई गँगचा कथित दावा?

मुंबई: बॉलिवूड चित्रपटसृष्टीतून एक अत्यंत धक्कादायक आणि खळबळजनक बातमी समोर आली आहे. प्रसिद्ध अभिनेता टायगर

Amrit Bharat Express: मुंबई ते अयोध्या 11 जनरल डब्यांसह अमृत भारत एक्स्प्रेस… महाराष्ट्रात कुठे कुठे असेल थांबा?

मुंबई: दिवाळी आणि छठ पूजा या सणानिमित्त मुंबईहून उत्तर भारतात मोठ्या प्रमाणावर प्रवासी जात असतात. दरवर्षीची

DCM Eknath Shinde: सरनाईकांच्या विजयाची जबाबदारी आमची; शिक्षकांचे प्रलंबित प्रश्न नक्की सोडवणार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेची ग्वाही

अमरावती, ता 18 : अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार किरण सरनाईक यांनी शाळा आणि शिक्षकांसाठी

FDA Action: छत्रपती संभाजीनगर आणि पुण्यातही FDA ची धडक कारवाई, रिलायन्स स्टोरेज आणि ब्लिंकिटच्या कोल्ड स्टोरेजवर धाड सत्र

महाराष्ट्र: छत्रपती संभाजीनगर, पुण्यासह इतरत्र जिल्ह्यामध्ये अन्न- औषध प्रशासनाने धडक कारवाई करत लाखोंचा

Deputy Chief Minister Eknath Shinde: अमरावती शिक्षक मतदारसंघात शिंदेंचा ‘डॅमेज कंट्रोल’; सरनाईकांसाठी बंडखोरी शमवली

अमरावती, ता 18 : अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत महायुतीचे उमेदवार किरण सरनाईक यांच्या प्रचाराला