Vijaypat Singhania : कोणत्याही परिस्थितीत यश मिळवण्याचा संदेश देणाऱ्या विजयपत सिंघानिया यांचा प्रेरणादायी जीवनप्रवास जाणून घ्या

मुंबई : उद्योगविश्वातील दिग्गज व्यक्तिमत्व डॉ. विजयपत सिंघानिया (vijay singhania) यांचं शनिवारी सायंकाळी मुंबईत दुख:द निधन झालं. विजयपत सिंघानिया यांच्या निधनानं उद्योग आणि समाजकारण, विमानचालन क्षेत्रात पोकळी निर्माण झालीय.


प्रसिद्ध उद्योजक विजयपत सिंघानिया हे एक यशस्वी उद्योगजक असण्याबरोबरच ते पद्मभूषण पुरास्काराने समान्मित रेमंड ग्रूपचे माजी अध्यक्ष, वैमानिक आणि 'द कम्प्लीट मॅन' या ब्रँडचे निर्मातेही होते. त्यांनी रेमंड कंपनी एका जागतिक दर्जाच्या ब्रँडमध्ये रूपांतरित केली, परंतु आयुष्याच्या अखेरच्या वर्षांत त्यांना कौटुंबिक आणि व्यावसायिक आव्हानांना सामोरं जावं लागलं. त्यांचा जीवनप्रवास म्हणजे यश, धैर्य, उत्कटता आणि दुःखद असं अनोखं मिश्रण असलेलं जगाला शिकवण देणारा आहे. चला तर जाणून घेऊयात दिवंगत विजयपत सिंघानिया यांच्या जीवनप्रवासातील या १० शिकवणींबद्दल



विजयपत सिंघानिया यांचा प्रेरणादायी जीवनप्रवास


वारसा जपणं आणि काळानुसार बदलणं


विजयपत यांनी रेमंड या सामान्य कंपनीचं रूपांतर एका जगप्रसिद्ध ब्रँडमध्ये केलं असून त्यांच्या जीवनप्रवासातून ही शिकवण मिळते की वारशाचा आदर केला पाहिजे, पण त्याचबरोबर प्रयोग करणं आणि काळानुसार बदलणंदेखील महत्त्वाचं आहे.


कामाला महत्वं देण्याबरोबरोच छदं जोपासणं


विजयपत सिंघानिया यांनी वयाच्या ६७ व्या वर्षी हॉट एअर बलूनमध्ये विश्वविक्रम प्रस्थापित केला आणि लंडन ते दिल्ली मायक्रोलाइट विमान उडवलं. यातून ही प्रेरणा मिळते की आपल्याला शिकवतात की कामासोबतच आपण आपले छंद आणि आवड जोपासली पाहिजे. यामुळे जीवनातील ऊर्जा टिकून राहण्यास मदत होते.


मेहनत आणि संयमला महत्व देणं


रेमंडला नव्या उंचीवर नेण्यासाठी त्यांनी घेतलेली मेहनत आणि दूरदृष्टी आपल्याला शिकवते की यश एका रात्रीत मिळत नाही. त्यासाठी सातत्यपूर्ण मेहनत आणि संयम आवश्यक आहेत.


चूकांचा स्वीकार करणं


विजयपत सिंघानिया यांनी कंपनीमधील त्यांचा ३७ टक्के भाग मुलगा गौतमला भेट म्हणून दिला. यानंतर त्यांनी याला आपली सर्वात मोठी चूक म्हटलं. यावरून आपल्याला आयुष्यातील महत्त्वाचे निर्णय घेताना सावधगिरी बाळगण्याची शिकवणं मिळते.


धैर्य आणि आत्मविश्वासानं आव्हानावर मात करणं


ज्या वयात अनेक लोक साधारणपणे निवृत्तीची योजना आखतात, त्या वयात विजयपत सिंघानिया यांनी एक नवा विक्रम रचला. यातून आपल्याला अशी शिकवण मिळते की, आपलं वय हे फक्त आकडा आहे. धैर्य आणि आत्मविश्वासानं कोणत्याही आव्हानावर मात करता येते.


अपूर्ण गोष्टींचा स्वीकार करून पुढे जाणं


विजयपत सिंघानिया यांनी त्यांच्या 'अ‍ॅन इनकम्प्लीट लाईफ' या आत्मचरित्रात लिहिलं आहे की, आयुष्य कधीच पूर्ण झाल्यासारखं वाटत नाही. आयुष्यात नेहमीच काहीतरी अपूर्ण राहतं आणि ते स्वीकारून पुढे जायला हवं.


यशाच शिखर गाठूनही नम्रपणा जपणं


विजयपत सिंघानिया यांनी आपल्या जीवनात मोठी कामगिरी केलीय. मात्र, यशाच शिखर गाठूनही त्यांनी आपली नम्रता कधीही सोडली नाही. आपणही साधेपणा आणि नम्रता यांना आपल्या जीवनाचा पाया बनवलं पाहिजे.


चुकीच्या निर्णयांची जबाबदारी घेणं


विजयपत सिंघानिया यांनी ज्या पद्धतीनं आपल्या चुकीच्या निर्णयांची जाहीरपणे जबाबदारी स्वीकारली, त्यातून आपल्याला हा धडा मिळतो की आपण आपल्या चुका मान्य कराव्यात आणि इतरांना सावध करावं, जेणेकरून ते त्या चुकांची पुनरावृत्ती करणार नाहीत.


विजयपत सिंघानिया यांचं आयुष्य चढ-उतारांनी भरलेलं होतं. त्यांनी श्रीमंतीतून गरिबीकडे आणि पुन्हा श्रीमंतीकडे असा प्रवास अनुभवला. २८ मार्च २०२६ रोजी त्यांचं निधन झालं असून त्यांनी आपली जीवनकथा सर्वांसाठी मागे ठेवली आहे. शिकण्याची इच्छा असणाऱ्यांना विजयपत सिंघानिया यांच्या जीवनातून प्रेरणा मिळणार आहे.

Comments
Add Comment

Kolkata Stampede: अरुंद प्रवेशद्वार, अंधार अन् अफवा; दुर्गापूजा मंडपातील चेंगराचेंगरीचं कारण काय?

कोलकाता येथील चोरबागान दुर्गा पूजा मंडपात झालेल्या चेंगराचेंगरीनंतर, आयोजकांच्या व्यवस्थेवर गंभीर प्रश्न

Nitesh Rane: दुष्काळात अधिक निकष न लावता मच्छीमारांना मदत करा, मंत्री नितेश राणे यांचे निर्देश

मुंबई: राज्यातील दुष्काळी परिस्थितीमुळे संकटात सापडलेल्या मच्छीमारांना दिलासा देण्यासाठी मदतीचे निकष अधिक

Relationship Tips: पहिल्या डेटवर या 4 गोष्टींचे अतिस्पष्टीकरण देणे टाळा; अन्यथा होऊ शकतो चुकीचा समज

Relationship Tips: पहिल्या डेटवर अनेकांना थोडे अस्वस्थ वाटते. समोरच्या व्यक्तीवर चांगली छाप पाडण्याच्या प्रयत्नात काही जण

Lifestyle News : तुम्हीही रोज नाश्ता स्किप करताय? थांबवा ही सवय, नाहीतर 'या' भयंकर आजाराला स्वतःहून द्याल आमंत्रण

सकाळची घाई, कामाची वेळ, वजन कमी करण्याचा प्रयत्न किंवा सकाळी भूक न लागणे यामुळे अनेकजण नाश्ता टाळतात. 'दुपारच्या

Post Office Scheme: पोस्ट ऑफिसच्या 'या' योजनेत 10 लाखांची गुंतवणूक; 5 वर्षांत मिळणार 4.49 लाख व्याज

मुंबई : सुरक्षित ठिकाणी पैसे गुंतवून चांगला परतावा मिळवण्याचा विचार करत असाल, तर पोस्ट ऑफिसच्या छोट्या बचत योजना

पूजा, दिवाळी आणि छठ उत्सवासाठी प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी खुशखबर! आता धावणार 162 अतिरिक्त गाड्या

आगामी पूजा, दिवाळी आणि छठ उत्सव काळात प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! प्रवाशांच्या सोयीसाठी विविध