Ashok Kharat Case : भोंदू बाबाचा मोठा पर्दाफाश! खरातचा सीएही रडारवर, १५०० कोटींच्या मालमत्तेचा होणार तपास

मुंबई : स्वतःला ज्योतिषी म्हणवत भविष्य सांगण्याच्या नावाखाली महिलांना जाळ्यात ओढून त्यांच्यावर लैंगिक अत्याचार करणारा आणि आर्थिक फसवणूक करणारा भोंदू बाबा अशोक खरात (Ashok Kharat) याच्याविरोधातील तपास अधिक गतीने सुरू आहे. गेल्या दोन आठवड्यांपासून पोलिस कोठडीत असलेल्या खरातची सखोल चौकशी सुरू असून त्याच्याशी संबंधित अनेक व्यक्तीही आता पोलिसांच्या रडारवर आल्या आहेत.


तपासात खरातने फसवणूक करून कोट्यवधींची संपत्ती उभी केल्याचे समोर आले आहे. त्याच्याकडे मोठ्या प्रमाणावर मालमत्ता, जमीन-जुमला असल्याची माहिती पुढे आली आहे.


याच प्रकरणात आता नवी घडामोड समोर आली असून खरातचे आर्थिक व्यवहार पाहणारा चार्टर्ड अकाउंटंट (सीए) पोलिसांच्या चौकशीत आहे. खरातच्या सुमारे १५०० कोटींपेक्षा अधिक मालमत्तेवर एसआयटीची करडी नजर असून या सीएकडून महत्त्वाची आर्थिक माहिती समोर येण्याची शक्यता आहे. हा सीए केवळ खरातचेच नव्हे, तर शिवनिका संस्थानच्या आजी-माजी सदस्यांचेही आर्थिक व्यवहार पाहत होता.


शिवनिका ट्रस्टच्या व्यवहारांवरही संशय व्यक्त होत आहे. २०१८ मध्ये अवघी चार लाखांची उलाढाल असलेल्या या ट्रस्टने २०२४ पर्यंत कोट्यवधींची झेप घेतल्याने तपास यंत्रणा अधिक सतर्क झाली आहे. या व्यवहारांची सखोल चौकशी केली जाणार आहे.


दरम्यान खरातविरोधात अनेक महिलांनी पुढे येत तक्रारी नोंदवल्या असून प्रकरणाची व्याप्ती दिवसेंदिवस वाढत आहे. आता शिवनिका संस्थेच्या सर्व आजी-माजी सदस्यांची चौकशी होणार असून रुपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांचीही चौकशी होण्याची शक्यता आहे. एसआयटीकडून संबंधितांना समन्स बजावण्यात आले असून या चौकशीतून आणखी मोठे खुलासे होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Comments
Add Comment

शाळा प्रवेशासाठी बालकांचे किमान वय निश्चित; २०२७-२८ पासून टप्प्याटप्प्याने लागू होणार नवीन निकष

मुंबई : राज्य शासनाने पूर्व-प्राथमिक ते

समान नागरी संहितेबाबत नागरिकांकडून १५ नोव्हेंबरपर्यंत मागवल्या सूचना; विशेष पोर्टलचा शुभारंभ

महाराष्ट्रात समान नागरी संहिता (UCC) लागू करण्याच्या अनुषंगाने राज्य शासनाने नेमलेल्या समितीने नागरिकांकडून

Maharashtra Weather Update: येत्या पाच दिवसांत हवामानात होणार बदल! उकाड्यापासून होणार सुटका; पहा कोणत्या जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता?

भारतीय हवामान विभागाने (IMD) गुरुवारी जारी केलेल्या हवामान अंदाजानुसार, राज्यातील कोकण विभागात काही ठिकाणी उष्ण

Ban On Firecrackers: दिवाळीत सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्यास बंदी; मुंबई हायकोर्टाचा आदेश

सणासुदीच्या पार्श्वभूमीवर मुंबई उच्च न्यायालयाने गुरुवारी १५ ऑक्टोबर २०२६ रोजी सार्वजनिक ठिकाणी आणि

महाराष्ट्रात डिजिटल शासनसेवांना मिळणार नवी गती ! डिजिटल शासनसेवा प्लॅटफॉर्म तात्काळ सुरु करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

मुंबई : राज्यातील नागरिकांना शासकीय सेवा अधिक जलद, सुलभ आणि पारदर्शक पद्धतीने ऑनलाइन उपलब्ध करून देण्यासाठी

Jalgaon : जळगावमध्ये भीषण अपघात ! ट्रकच्या धडकेत एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू

Jalgaon : जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. मालदाभाडी गावाजवळ ट्रक आणि दुचाकी