KKRvsMI : कोलकाता नाईट रायडर्सला हरवत मुंबई इंडियन्सने वानखेडेवर मिळवला ऐतिहासिक विजय

मुंबई : मुंबई इंडियन्सने कोलकाता नाईट रायडर्स विरुद्धचा सामना सहा विकेट राखून जिंकला. तब्बल १३ वर्षांनंतर मुंबई इंडियन्सने सलामीचा सामना जिंकला आहे.


आयपीएलचा हा १९ वा सीझन आहे. मुंबई इंडियन्सने याआधीच्या १८ पैकी १४ सीझनमध्ये सलामीचा सामना गमावला आहे. यातही मागील सलग १३ वर्ष मुंबई इंडियन्सची टीम सलामीच्या साखळी सामन्यात हरत होती. यामुळे मुंबई पहिला साखळी सामना हरतेच अशी नको असलेली ओळख निर्माण झाली होती. अखेर ही पराभवाची मालिका खंडीत झाली आहे.


यंदाच्या आयपीएलच्या दुसऱ्या आणि मुंबई इंडियन्सच्या पहिल्या साखळी सामन्यात वानखेडेवर रंगतदार सामना झाला. कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध मुंबई इंडियन्स अशा या सामन्यात प्रथम फलंदाजी करत कोलकाता नाईट रायडर्स अर्थात केकेआरने २२० धावा केल्या. मुंबईला हे आव्हान पार करणे जमेल का अशी शंका अनेकांच्या मनात असताना रोहित शर्मा आणि रयान रिकेल्टन यांनी पहिल्या विकेटसाठी ७१ चेंडूत १४८ धावांची भागीदारी केली. रोहित शर्माने ३८ चेंडूत सहा षटकार आणि सहा चौकार मारत ७८ धावा केल्या. तो वैभव अरोराच्या चेंडूवर झेलबाद झाला. त्यानंतर ‘इम्पॅक्ट प्लेयर’ म्हणून आलेल्या सूर्यकुमार यादवने आठ चेंडूत सोळा धावा केल्या. अखेरच्या षटकात मुंबई इंडियन्सने चार लक्ष्य गाठले. मुंबईने चार बाद २२१ धावा केल्या. कर्णधार हार्दिक पंड्या १८ तर नमन धीर पाच धावांवर नाबाद राहिला.


याआधी मुंबई इंडियन्सने नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला. कोलकाता नाईट रायडर्सने पॉवरप्लेमध्ये ७८ धावा केल्या. कर्णधार अजिंक्य रहाणेने ४० चेंडूत ६७ धावा केल्या. पण दुसऱ्या बाजूस विकेट जात होत्या. यामुळे केकेआरला २०० धावांच्या टप्पा ओलांडणे कठीण जाईल असे वाटत होते. पण अंगकृष रघुवंशीने २९ चेंडूत ५१ धावा केल्या. यामुळे केकेआरने २० षटकांत २२० धावा केल्या. मुंबईकडून शार्दुल ठाकूरने ३, हार्दिक पंड्याने १ विकेट घेतली.


वैशिष्ट्ये




  1. मुंबई इंडियन्सने आयपीएलच्या इतिहासात केकेआर विरुद्ध २५ वा विजय मिळवला

  2. लक्ष्याचा पाठलाग करताना २२१ धावा करणे आणि सामना जिंकणे अशी दुहेरी यशस्वी कामगिरी मुंबईने केली. याआधी २०११ मध्ये मुंबईने चेन्नई विरुद्धच्या सामन्यात २१९ धावा करून विजय मिळवला होता. ही मुंबईची आधीची लक्ष्याचा पाठलाग करतानाची सर्वोत्तम कामगिरी होती.

  3. वानखेडे स्टेडियमवर नोंदवला गेलेला हा आतापर्यंतचा सर्वात मोठा यशस्वी लक्ष्याचा पाठलाग आहे.

Comments
Add Comment

India vs Zimbabwe Women T20: स्मृती मंधानाच्या नेतृत्वात पहिली टी20 मालिका, कधी आहे सामना जाणून घ्या सर्वकाही

भारत आणि झिम्बाब्वे महिला क्रिकेट संघात आंतरराष्ट्री क्रिकेटमध्ये पहिल्यांदाच टी20 मालिका खेळली जाणार आहे. तीन

अर्शदीप सिंगला दुखापत; सुनील गावस्कर शमार जोसेफवर संतापले! नेमकं काय म्हणाले?

हैदराबाद : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील रंगतदार मालिकेतील चौथ्या टी-20 सामन्यात वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगला

भारतीय फुटबॉलचे भविष्य बदलणार? केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे आणि रोनाल्डो नाझारिओ भेट चर्चेत

नवी दिल्ली : भारतातील क्रीडा परिसंस्थेला अधिक बळकट करण्यासाठी आणि तरुण फुटबॉलपटूंना जागतिक स्तरावर

AUS vs SA Test : ऑस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण आफ्रिकेचा मोठा निर्णय! ब्रिट्झकेला संधी, रबाडाचे पुनरागमन?

डर्बन (दक्षिण आफ्रिका) : ऑस्ट्रेलियाविरुद्ध डर्बन येथे झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यात दक्षिण आफ्रिकेला 214

PM Modi : सुवर्णपदकाची ऐतिहासिक कमाई! जपानमधील विजयानंतर पंतप्रधान मोदींनी घेतली भारतीय क्रिकेट संघांची भेट

नवी दिल्ली : जपानमधील आयची-नागोया येथे नुकत्याच पार पडलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धा २०२६ (Asian Games 2026) मध्ये भारताच्या

BGMI खेळताना मोबाईल हँग होतोय? आता टेन्शन विसरा! भारतात लवकरच येतोय BGMI Air; प्री रजिस्ट्रेशनला सुरुवात

भारतात BGMI या गेमचे तरुणांमध्ये प्रचंड वेड आहे. २०२१ मध्ये जेव्हा हा गेम लाँच झाला अगदी तेव्हापासून