Pune : पुण्यात कोट्यवधींचे ड्रग जप्त, विमानतळावर कस्टम्सची कारवाई

पुणे : लोहगावच्या पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावर कस्टम्स विभागाने २६ कोटी ८० लाख रुपयांचा 'हायड्रोपोनिक गांजा' केला. एवढ्या मोठ्या प्रमाणात ड्रग जप्त झाल्यामुळे पुण्यात चाललंय काय अशी चर्चा सर्वत्र होत आहे. एअर कार्गो विभागात गुरुवारी कस्टम्स विभागाने ही कारवाई केली. या प्रकरणी आवश्यक ती कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर अखेर कस्टम्सने प्रसारमाध्यमांना ही माहिती दिली.


थायलंडहून पुण्याच्या विमानतळावर एक कंटेनर आला. कागदपत्रांमध्ये चिनी खाद्यपदार्थांचा कंटेनर असा उल्लेख होता. पण संशय आल्यामुळे तपासणी करण्यात आली. 'मँडरिन ऑरेंज सॅक्स' असे लेबल थर्माकोलच्या बॉक्सवर होते. पण कस्टम्सने तपासणी करण्याचा निर्णय घेतला आणि बॉक्स तपासल्यावर त्यात सील असलेले टीनचे डबे आढळले. हे डबे उघडताच त्यात मीठसदृश्य पांढरी पावडर दिसली. ही पावडर बाजूला करताच टीनमध्ये हवाबंद पाकिटात भरून लपवलेला 'हायड्रोपोनिक गांजा' सापडला. एकूण ७६.५८ किलो वजनाचा २६ कोटी ८० लाख रुपयांचा 'हायड्रोपोनिक गांजा' कस्टम्सने जप्त केला. या प्रकरणी पुढील तपास सुरू आहे. ड्रग कोणी कोणासाठी पाठवले आहे ? याचा शोध सुरू आहे.

Comments
Add Comment

Nashik : नाशिकला जागतिक स्तरावर नेण्याची तयारी ! ‘५० यस सिटीज्’ उपक्रमासाठी महापालिका प्रस्ताव देणार, सिंगापूरसोबतही करणार करार

Nashik : कुंभनगरी नाशिकच्या विकासाला जागतिक स्तरावर नवी ओळख मिळवून देण्यासाठी नाशिक महानगरपालिकेने महत्त्वपूर्ण

BMC News : पाच वर्षांतच गारोडिया नगरमधील पाच रस्त्यांचा पुन्हा विकास; तब्बल साडेचार कोटी रुपये केले जाणार खर्च

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : पूर्व उपनगरातील घाटकोपर (पूर्व) मधील गारोडिया नगर वसाहतील खासगी रस्त्यांचा विकास पाच

रशियन तेल खरेदीवर भारताला टॅरिफमधून सूट, ट्रम्प यांचा मोठा निर्णय, भारतासह 'या' पाच देशांना दिलासा

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी रशियाकडून तेल आणि वायू खरेदी करणाऱ्या भारतासह पाच देशांना

BMC : महापालिका तथा ग्रीन बाँड्सच्या हालचाली जोरात; बाँड्स जारी करण्यासाठी सल्लागार नियुक्तीकरता महापालिकेची निविदा

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : महानगरपालिका ग्रीन बाँडस् सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प, क्षार निर्मूलन प्रकल्प

School Bus Fire : उन्नावमध्ये शालेय बसला भीषण आग! 60 विद्यार्थी थोडक्यात बचावले; महामार्गावर वाहतुकीचा खोळंबा

उन्नाव : उत्तर प्रदेशातील उन्नाव येथे लखनौ-कानपूर महामार्गावर शुक्रवारी संध्याकाळी शालेय विद्यार्थ्यांना घेऊन

Tesla Roadster : हवेत उडणारी कार खरंच बाजारात येणार ? टेस्लाची नवी Roadster चर्चेत, पण...

Tesla Roadster : जगप्रसिद्ध इलेक्ट्रिक कार निर्माता कंपनी टेस्लाची (Tesla) नवी रोडस्टर कार सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. या