मुंबईच्या डब्बेवाल्यांची पाच दिवसांची सुट्टी, मुंबईकरांना करावी लागणार डब्याची सोय

मुंबई : मुंबई लाईफलाईन म्हटली की दोन गोष्टी नजरेसमोर येतात एक म्हणजे मुंबईची लोकल ट्रेन आणि दुसरी म्हणजे मुंबईचे डब्बेवाले. १३० वर्षांपासून संपूर्ण मुंबईकरांना सकाळी, दुपारी वेळेत डब्बा पोहोचवण्याचं काम हे मुंबईचे डब्बेवाले गेली अनेक वर्ष करत आले आहेत.



मुंबईचे डब्बेवाले जाणार सुट्टीवर


परंतु मुंबईचे डब्बेवाले आता सुट्टीवर जाणार अशी माहिती समोर आली आहे, हिंदू कालगणनेनुसार पहिल्या चैत्र महिन्यात अनेक सण उत्सव असतात, अनेक जण आपल्या गावी आपल्या देवाच्या जत्रेसाठी जात असतात. त्यामुळेच मुंबईचे डब्बेवालेही आजपासून म्हणजे ३० मार्चपासून ४ दिवस सुट्टीवर जाणार आहेत. म्हणजे डब्बेवाले ३० मार्च २०२६ ते ४ एप्रिल २०२६ पर्यंत सेवा देऊ शकणार नाही.



ग्रामदेवतेच्या उत्सवासाठी सुट्टी


दरवर्षी चैत्र महिन्यात डबेवाले आपल्या मूळ गावी होणाऱ्या ग्रामदेवतेच्या वार्षिक उत्सवांना आणि जाताना उपस्थित राहण्यासाठी सहा दिवसांची सुट्टी घेतात. ही त्यांची पारंपरिक वार्षिक सुट्टी असल्याचे नमूद करत, डबेवाले असोसिएशनने सर्व ग्राहक आणि मुंबईकरांना या रजेच्या काळात डबेवाल्यांचे मानधन न कापण्याचे आवाहन केले आहे.



५००० डब्बेवाल्यांची मुंबईकरांना सेवा


मुंबईत सुमारे ५,००० डबेवाले हे सध्या हे कार्यरत आहेत. डब्बेवाल्यांनी घेतलेल्या या सहा दिवसाच्या सुट्टीमुळे मुंबईकरांना दुपारच्या जेवणाचे थोडे हाल सोसावे लागणार तर आहेच. हा परिणाम जवळपास मुंबईतील सुमारे ८०,००० ते २ लाख नोकरदार वर्गावर होणार आहे. तोपर्यंत लोकांना स्वतःला डब्बे आणावे लागणार आहेत.

Comments
Add Comment

MahaIT : महाआयटीच्या प्रणाली अद्ययावतीकरणामुळे शासकीय ऑनलाइन सेवा १६ ते २० ऑक्टोबरदरम्यान तात्पुरत्या बंद

मुंबई : महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ मर्यादित (महाआयटी) मार्फत विकसित आणि देखरेख करण्यात येणाऱ्या राज्य

महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा २०२६ जाहीर; हाँगकाँग, उत्तराखंड आणि सांगलीच्या मंडळांची बाजी!

मुंबई : राज्यात उत्साहात पार पडलेल्या ‘म

Ram Mansion Purchase : सिद्धिविनायक मंदिराजवळीम राम मेन्शनच्या खरेदी व्यवहाराला परवानगी

मुंबई : प्रभादेवी येथील श्री सिद्धिविनायक गणपती मंदिराला लागून असलेल्या राम मेन्शन सहकारी गृहनिर्माण

मतदार यादीत नाव नोंदणीसाठी राज्यात विशेष मोहीम; 17, 18 आणि 24, 25 ऑक्टोबर रोजी मतदान केंद्रांवर शिबिरे

मुंबई : राज्यातील एकाही पात्र नागरिकाचे नाव मतदार यादीत समाविष्ट होण्यापासून वंचित राहू नये, या महत्त्वाच्या

BMC News : वरळीतील सांडपाण्यावर बायोगॅसपासून वीज निर्मिती; प्रकल्प काम 63 टक्के पूर्ण

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई मलनिस्सारण प्रकल्पांतर्गत वरळी येथे उभारण्यात येत असलेल्या 500 दशलक्ष लीटर

मुंबई उपनगरातील तीन नवीन कोळीवाड्यांचे होणार सीमांकन; राज्य सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय

मुंबई शहर व उपनगरातील कोळीवाड्यांचे सीमांकन अधिक स्पष्ट व सर्वसमावेशक करण्याच्या दृष्टीने फडणवीस सरकारने